Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर ०९, २०१७

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी वरोऱ्यात आ.धानोरकरांच्या नेतृत्वात मुंडन व भीकमांगो आंदोलन

  वरोरा/प्रतिनिधी :
तालुक्यातील पॉवर ग्रीड कंपनीने करारनामा न करता शेतात टॉवर उभारण्याचे काम सुरू केले व त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला न मिळाल्याने गुरुवारी प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या करीता शिवसेनेच्या आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात खांबाळा येथे मुंडन व भीक मांगो आंदोलन अरण्यात आले. या आंदोलनाने चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील वाहतुक चांगलीच प्रभावित झाली होती,

गेल्या  सोमवारी आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना घेराव घालून दोन दिवसांत करारनामा करा आणि त्यानंतरच बांधकामासाठी शेतात पाय ठेवा, असा इशारा शेतकऱ्यानी दिला होता.वर्धा ते नागरी येथे ४०० केव्ही टॉवर उभारली. शिवाय, नागरी ते परळी ७६५ केव्ही टॉवरची उभारणी केली जात आहे. वर्धा ते नागरी मार्गावरील शेतात टॉवर उभारणी करणाऱ्या  शेतकऱ्यांना  प्रति टॉवर १५ लाख रूपये तर नागरी परळी मार्गावरील टॉवरखाली आलेल्या शेताला २५ लाख रूपये प्रति टॉवर मोबइला द्यावा, टॉवर लाईनमुळे अशंत: बाधित झालेल्या शेतकऱ्यांनाही मोबदला देण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली होती .
मात्र ३ दिवस उलटूनही प्रशासनाने यावर तोडगा काढला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना आमदार  बाळू धानोरकर, यांच्या नेतृत्वात चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील खाम्बाडा येथे  मुंडन व भीक मांगो आंदोलन करून ऊर्जामंत्रालयाच्या प्रधानसचिवांना निवेदनाद्वारे तक्रार केली आहे,पहिले संपूर्ण योग्य मोबदला देण्यात यावा त्यानंतरच शेतकऱ्यांच्या शेतात पाय ठेवायचा अश्या शिवसेना स्टाईलने यावेळी आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते किशोर जोरगेवार, सुरेश पचारे, मनोज पॉल ,यासह अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.