Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

आमदार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आमदार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, जुलै ०३, २०१८

 नागपूरच्या आमदार निवासात आढळला मृतदेह

नागपूरच्या आमदार निवासात आढळला मृतदेह

dead body found in nagpur mla hostelनागपूर/प्रतिनिधी:
राज्य विधीमंडळाचं नागपूर इथं होणाऱ्या पावसाळी अधिवेशन एक दिवसावर असतानाच येथील आमदार निवास भवनात एक मृतदेह आढळून आल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे.आमदार निवास भवनातील ४३ क्रमांकाच्या खोलीत आज सकाळी ते मृतावस्थेत आढळून आले.मिळालेल्या माहितीवरून मृत व्यक्ती ही मुंबईतील उल्हासनगरच्या आमदार ज्योती पप्पू कलानी यांचे स्वीय सचिव यांची स्वीय सहाय्यक (पी.ए.) असल्याचं सांगितलं जातं. विनोद अग्रवाल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची अशी प्राथमिक माहिती आहे. सध्या या प्रकरणी पोलिसअधिक तपास करीत आहेत.

शुक्रवार, जून १५, २०१८

बघा महाराष्ट्रातील आमदारांचा पगार आहे तरी किती?

बघा महाराष्ट्रातील आमदारांचा पगार आहे तरी किती?

mla image cartoon साठी इमेज परिणाममुंबई/प्रतिनिधी:
 महाराष्ट्रातील आमदार जनसेवेचा दावा करतात. त्यासाठी वाट्टेल तो त्याग करण्यासाठी तयार असल्याचंही सांगितलं जातं. मात्र त्याचवेळी जनसेवेसाठी त्यांना मिळणारा पगार नेमका किती ते उघड करण्यासाठी ठाण्यातील आरटीआय कार्यकर्ते प्राजक्त झावरे-पाटील यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज केल्यावर मिळालेली माहिती धक्कादायक आहे.
प्राजक्त झावरे पाटील यांनी आमदारांचा एकूण पगार, मूळ पगार, महागाई भत्ता, इतर भत्ते यांची माहिती मागवली होती. महाराष्ट्र विधानमंडळाकडून त्यांना माहिती माहिती मिळाली. आमदारांना प्रत्येक महिन्याला 67000 मूळ पगार मिळतो. महागाईविरोधात आवाज उठवल्यानंतर सामान्यांना काही फायदा होताना दिसत नाही. पण आमदारांना मात्र महागाई भत्ता म्हणून 91,120 रुपये मिळतात. जियोच्या काळात सर्वांचीच फोन बिलं खंगलीत, मात्र आमदार महोदयांना जुन्या काळासारखाच दूरध्वनी खर्च म्हणून 8000 रुपये दिले जातात. ईमेल, व्हॉट्सअॅपच्या काळातही आमदारांना टपालासाठी 10000 मिळतात. एक खर्च योग्य वाटतो. तो म्हणजे संगणक चालकाच्या पगारासाठी मिळणारी 10000 रुपयांची रक्कम मिळते.

बुधवार, नोव्हेंबर २२, २०१७

उज्वला गॅस योजनेच्या लाभ घेऊन जंगलतोड थांबवा

उज्वला गॅस योजनेच्या लाभ घेऊन जंगलतोड थांबवा

आमदार नानाजी शामकुळे : धानोरा, महाकुर्ला येथे विविध कार्यक्रम

चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये भोगोलिक विकास करण्याचा हेतूने सरकारच्या योजनेच्या लाभ घेऊन विकास करणे सोपी होणार आहे. उज्वला गॅस योजनेच्या लाभ घेऊन जंगलतोड थांबवून प्रदूषण मुक्त गाव करण्याच्या संकल्प सर्वानी करावा असे आवाहन आमदार नानाजी शामकुळे यांनी केले. ते धानोरा येथे उज्वला गॅस वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी धानोरा येथे २६ लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आले तसेच नालीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यासोबतच महाकुर्ला येथे प्रवेशद्वाराचे व एल. इ.  डी. लाईट चे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आमदार नानाजी शामकुळे, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, सभापती प. स. वंदनाताई पिंपळशेन्डे, सरपंच धानोरा हरीश गोखरे, सरपंच पारस पिंपळकर, सरपंच नरेश देवाळकर, शेषराव आस्वले,  विजयजी आगरे, विठोबा खोवले, श्रवण जुनघरे, दिवाकर बोन्डे, उपसरपंच उत्तमजी आमडे, इंदुराताई लोणगाडगे, कल्पनाताई मासिरकार, मंगलाताई गौरकार, मंगलाताई ठावरी, गीताताई आमडे, दशरथ बोन्डे, विठोबा कर्मणकार, विनायक बोबडे, अमोल नागराळे, संजय पटले यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार नानाजी शामकुळे म्हणाले कि, चंद्रपूर विधान सभेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहो. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे होत आहे. पुढे देखील अनेक योजनेच्या माध्यमातून विकास साधला जाईल. ग्रामस्थांनी देखील प्रत्येक योजनेच्या लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे आपल्या भाषणात म्हणाले कि, चंद्रपूर जिल्याचा विकास झपाट्याने होत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी आणून विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले. यावेळी धानोरा, महाकुर्ला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.

शुक्रवार, नोव्हेंबर १७, २०१७

जगाच्या विकासात विज्ञान महत्वाचे

जगाच्या विकासात विज्ञान महत्वाचे


दोन दिवसीय तालुका विज्ञान प्रदर्शन
-आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी


रामटेक /प्रतिनिधी-विज्ञानाचा अर्थ विषेश ज्ञान असा होतो. मानवाने आपल्या गरजा पुर्ण करण्यासाठी नवनविन षोध लावले आहेत. या षोधांमुळे मानवी जीवन अधिक सुखकर झाले आहे. आजचे युग हे विज्ञानयुग आहे. विद्याथ्र्यांनी विज्ञानाच्या सर्वच षाखांमध्ये रूची घ्यावी असे आवाहन रामटेकचे आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केले. ते रामटेकच्या श्रीराम कनिश्ठ महाविद्यालयांत आयोजित तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आपले विचार व्यक्त करीत होते.

तत्पुर्वी त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे विधिवत उद्घाटन संपन्न झाले. यावेळी रामटेक पंचायत समीतीच्या किरण धुर्वे, उपसभापती छाया वंजारी, जि. . सदस्या षांता कुमरे, रामटेकचे नगराध्यक्श दिलीप देशमुख, बांधकाम सभापती संजय बिसमोगरे, . . सदस्या षिल्पा रणदिवे, चित्रा धुरई, वनमाला चैरागडे, प्राचार्य राजेश सिंगरू, पं. . चे सदस्य हरीसिंग सोरते व श्रीराम षिक्शण संस्थेचे अध्यक्श तथा स्वागताध्यक्श अॅड. किषोर नवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्रीराम विद्यालयाच्या विद्याथ्र्यांनी सुमधुर स्वागतगीत व षेतकरी नृत्य सादर केले. प्रषांत जांभुळकर यांच्या मार्गदर्शनात जि. . उच्च प्राथ. षाळा कान्द्री च्या विद्याथ्र्यांनी सामुहीक गीताचे सादरीकरण केले. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर अतिथिंनी प्रदर्शनातील विज्ञान प्रतिकृतींची पाहणी केली. रामटेक तालुक्यातील माध्यमीक व उच्च माध्यमीक अषा दोन गटांमधून 93 विज्ञान प्रतिकृती या प्रदर्शनांत सहभागी झाल्या होत्या.
रामटेक पं. . चे गटषिक्शणाधिकारी नितीन वाघमारे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्तावीक भाशण केले. आपल्या भाशणातून त्यांनी विज्ञान प्रदर्शनामागील भूमीका स्पश्ट केली. उपस्थित सर्वच मान्यवरंाचे यावेळी श्रीराम कनिश्ठ महा. चे प्राचार्य ईष्वर आकट यांनी आभार मानले. दिनांक 16 17 असे दोन दिवस हे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यांत आले होते.


जनतेच्या समस्या तात्काल निकाली काढा:-आ.संजय धोटे

जनतेच्या समस्या तात्काल निकाली काढा:-आ.संजय धोटे

कोरपना /प्रतिनिधी:
कोरपना तालुक्याची आढावा बैठक नुकतीच राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

आरोग्य,कृषी,वीज वितरन,पाणीपुरवठा, दक्षता समिती संदर्भात शिधापत्रिका  व कोरपना तालुक़्यातील रस्ते बांधकाम याविषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.  विविध विभागाच्या पदाधिकारी तसेच कर्मचारी यांच्याकडून माहिती तसेच योग्य सूचना देण्यात आल्या आहेत.व प्रलंबित कामे त्वरित करण्याच्या आदेश आमदार संजयभाऊ धोटे यांनी यावेळी दिल्या.

कार्यक्रमाला अध्यक्ष आमदार संजय धोटे होते तर संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय मुसळे,पंचायत समिती सभापती श्याम रणदिवे,रमेश पाटिल मालेकार,किशोर  बावणे,अरुण मडावी,विनोद नवले,अबिद अली,भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने तसेच बीडीओ घोंसिकर,तहसीलदार गाडे,साळवे सर, इतर पदाधिकारी तसेच प्रदीप पिंपळशेंडे,कवडू जरीले,कोल्हे,,युवा नेते सचिन गुरनुले,तन्वीर शेख,किशोर देवतळे ग्रा.प.सदस्य पुरुषोत्तम भोंगळें,प्रल्हाद पवार,शशिकांत आडकीने,हेटीच्या सरपंच सौ.बालभारती जरिले,येरगव्हान सरपंच सत्यवान आत्राम,अनिल कौरासे,गजानन भोंगले,सत्यवान चामाटे व कोरपना तालुक़्यातील सरपंच,उपसरपंच,ग्राम पंचायत सद्यस्य व नगरिकांची मोठ्या प्रामानात उपस्थित होती.