ब्रम्हपुरी/प्रतिनिधी
ब्रम्हपुरी तालुक्यातील दक्षिण परिसरात अंतर्गत येणाऱ्या आवळगाव येथील धानपीक नष्ट होण्याच्या मार्गावर असूनसुद्धा कृषी अधिकारी निद्रा अवस्थेत आहेत.सदर परिसरात यावर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे शेतीची रोवनी काही ठिकाणी झाली नाही तर काही ठिकाणी रोवनी होऊन पाऊस पड्ल्याने रोवलेली धान पीक करपलीं आहेत.त्यामुळे सदर शेतीची सर्वे करण्याची मागणी शिवसेना जिल्हा उपप्रमुख नीलकंठजी उरकुडे
तसेच तालुका उपप्रमुख संजयजी लोणारे ,ब्रम्हपुरी शहर प्रमुख रविंद्रजी पवार ,उपशहर प्रमुख मंगेशजी माकडे ,राजेंद्र डोमळे,व आवळगाव येथील शेतकरी बांधवानी बँकव्यवस्थापक जि.मध्य.सहकारी बँक आवळगाँव शाखा व्यवस्थापकाला निवेदन देण्यात आले.
प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत सदर शेतीचा पीक विमा शेतकऱ्यांने स्वता उतरविण्यात आला तर काहींचा विमा हा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मार्फतिने बँकेने उतरवीला आहे.सदर पिक विमा योजने सुरक्षित प्रमुख बाबी यामध्ये नैसर्गिक आपत्ती पासून अधीसुचित क्षेत्र पातळीवर विमा, नुकसान भरपाई राज्य शासनानद्वारे दिलेल्या पिक कापनी प्रयोगाच्या आधारित चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न उंबरठाउत्पन्नापेक्षा कमी नोंदले गेल्यास नुकसान भरपाई देय ,हवामान घटकांच्या प्रतिकूल परस्थीतीमुळे पिकांची पेरणी किवा लावणी न झाल्यामुळे होणारी नुकसान पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परस्थीतीमुळे पीकाचे होणारी नुकसान,काढनी पच्छात नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसानीचे संरक्षण इत्यादि घटकाचा समावेश केला आहे.यावर्षी अत्यल्प प्रमाणात पडलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रोवनी झाली नाही.काही ठिकाणी रोवनी झाली तर करपा ,मावा ,तुडतुडा आदी रोगानी शेतीतील भातपीकाची दोन्ही बाजूने नुकसान झाले असून परिणामी पिकविमा मिळावा म्हणून जिल्हा अध्यक्ष यांनी माहिती घेतली असता कृषी अधिकारी यांनी दोन महिन्याचा कालावधी होऊनही शेतीचा सर्वे करण्यासाठी कुणीच अधिकारी आले नाही.
सदर परिसरातील ज्या शेतीच रोवनी झालीत त्या शेतीचे धान्यपिक कापणीच्या मार्गावर आले असून त्या धानपिकावर मावा करपा ,तुडतुडा इत्यादि रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी पूर्णता हवालदिल झाला आहे.
तरी शासनाने ताबडतोब कसल्याही प्रकारची दिरंगाई न करता सदर शेतीच सर्वे करून योग्य त्या नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना शासनानी निसर्ग प्रकोपात नुकसानग्रस्त भात पिकांच्या शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई बरोबर पिक विम्याचा लाभ तात्काळ देण्यात यावी अशी मागणी शिवसेना चंद्रपूर जिल्हा उपप्रमुख निलकंठ उरकूडे यांच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आले.