Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर ०९, २०१७

९ नोव्हेंबर दिनविशेष

धोंडो केशव कर्वे - (एप्रिल १८, इ.स. १८५८ - नोव्हेंबर ९, इ.स. १९६२)महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिले. हे स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते.

जागतिक दिवस
  • स्वातंत्र्य दिन : कंबोडिया.
  • अल्लामा इकबाल दिन : पाकिस्तान.
  • संशोधक दिन : युरोप.
ठळक घटना/घडामोडी
१९०७ : इंग्लंडच्या राजा सातव्या एडवर्डला त्याच्या वाढदिवसानिमित्त कलिनन हीरा भेट देण्यात आला.
१९१३ : अमेरिकेच्या ग्रेट लेक्स सरोवरांत आलेल्या वादळात १९ जहाजे बुडाली व २५०पेक्षा जास्त व्यक्ती मृत्यू पावल्या.
१९१८ : पहिले महायुद्ध - जर्मनीच्या सम्राट विल्हेल्म दुसर्‍याने पदत्याग केल्यावर जर्मनीला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.
१९२३ : म्युनिकमध्ये नाझी पक्षाने आयोजित केलेला बीयर उठाव पोलिस व सैन्याने चिरडून काढला.
१९३७ : जपानने शांघाय शहर जिंकले.
१९३८ : जर्मनीत हर्षल ग्रिंझपानने अर्न्स्ट फोन राथची हत्या केली. हे कारण पुढे करून नाझींनी ज्यूंच्या शिरकाणाला सुरुवात केली.
१९४७ : जुनागढ भारतात विलीन झाले.
१९५३ : कंबोडियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
१९६३ : जपानच्या मीके खाणीत स्फोट होउन ४५८ ठार, ८३९ दवाखान्यात. याच दिवशी जपानमध्ये योकोहामाजवळ तीन रेल्वेगाड्यांच्या अपघातात १६० ठार.
१९८५ : अनातोली कारपोव्हला हरवून गॅरी कास्पारोव्ह सगळ्यात छोटा बुद्धिबळ जगज्जेता झाला.
१९९० : नेपाळने नवीन संविधान अंगिकारले.
१९९० : मेरी रॉबिन्सन आयर्लंडची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्षा झाली.
१९९४ : डार्मश्टाटियम या मूलतत्त्वाचा शोध.
१९९८ : आपल्या गिर्‍हाइकांना एक किंमत दाखवून वेगळ्याच किमतीला रोखे विकल्याबद्दल नॅस्डॅक शेरबाजारातील दलालसंस्थांना १.०३ अब्ज अमेरिकन डॉलरचा दंड.
२००५ : आत्मघातकी दहशतवाद्यांनी जॉर्डनच्या अम्मान शहरात बॉम्बस्फोट करून ६० व्यक्तींना ठार केले.
२०१३ : सुपर टायफून हैयान या प्रचंड चक्रीवादळाने फिलिपाइन्सचा किनारा गाठला. ताशी ३१५ किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह तुफान पावसात शेकडो मृत्युमुखी.


जन्म/वाढदिवस
१८४१ : एडवर्ड सातवा, इंग्लंडचा राजा.
१८७७ : मोहम्मद इक्बाल, भारतीयांच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या ‘सारे जहाँसे अच्छा’चे कवी.
१८८२ : ज्यो हार्डस्टाफ, सिनियर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८८५ : आल्फ्रेड डिपर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९०४ : एडवर्ड व्हान डेर मर्व, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९१८ : स्पिरो ऍग्न्यू, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
१९२३ : डोरोथी डॅन्ड्रिज, श्यामवर्णीय अमेरिकन अभिनेत्री.
१९३१ : टॉमी ग्रीनहाउ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९३४ : कार्ल सेगन, अमेरिकन अंतराळतज्ञ व इंग्लिश लेखक.
१९४३ : जॉन शेफर्ड, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९७५ : मॅथ्यू सिंकलेर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
९४९ : कॉन्स्टन्टाईन सातवा, बायझेन्टाईन सम्राट.
११८७ : गाओझॉँग, चीनी सम्राट.
१५०४ : फर्डिनांड दुसरा, अरागॉनचा राजा.
१९३७ : राम्से मॅकडोनाल्ड, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
१९४० : नेव्हिल चेंबरलेन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
१९५३ : अब्दुल अझीझ अल-सौद, सौदी अरेबियाचा राजा.
१९६२ : धोंडो केशव कर्वे, मराठी समाजसुधारक आणि भारतरत्न पुरस्कर्ते.
१९६७ : बाबूराव पेंढारकर, मराठी रंगभूमीवरचे गाजलेले खलनायक व चित्रपट अभिनेते.
१९७० : चार्ल्स दि गॉल, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
२००३ : बिनोद बिहारी शर्मा, मैथिली भाषेतील लेखक, कवि.
२००५ : के. आर. नारायणन, भारतीय राष्ट्रपती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.