Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

दिनविशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दिनविशेष लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, डिसेंबर ११, २०१७

दिनविशेष

दिनविशेष


११ डिसेंबर दिनविशेष


१८१६ : इंडियाना अमेरिकेचे १९वे राज्य झाले.
जन्म/वाढदिवस
१९६९ : विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर.
१९०९ : नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ.
१९२२ : दिलीपकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
१९३५ : प्रणव मुखर्जी, भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
१९८७ : जी.ए. तथा गुरूनाथ आबाजी कुलकर्णी, मराठी लेखक.
१९९८ : राष्ट्रकवी प्रदीप, हिंदी कवी.
२००४ : एम.एस. सुब्बुलक्ष्मी, गायिका आणि भारतरत्न, रेमन मॅगसेसे पुरस्कारविजेत्या.
१९६३ : कोवलम माधव पणिक्कर, राजकारणी, इतिहासकार.

शनिवार, डिसेंबर ०९, २०१७

दिनविशेष

दिनविशेष

९ डिसेंबर                             
  • दिनविशेष ठळक घटना
  • के. शिवराम कारंथ - (१० ऑक्टोबर, इ.स. १९०२ - ९ डिसेंबर, इ.स. १९९७) हे ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कन्नड भाषेतील साहित्यकार होते.
  • जागतिक दिवस
  • टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) : स्वातंत्र्य दिन
  • ठळक घटना/घडामोडी
  • १७९३ : अमेरिकन मिनर्व्हा, न्यूयॉर्कचे पहिले दैनिक प्रकाशित.
  • १८२४ : अयाकुशोची लढाई - ऍंतोनियो होजे दी सुकरच्या नेतृत्त्वाखाली पेरूच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्पॅनिश दलाला हरवून पेरू स्वतंत्र केले.
  • १८३५ : टेक्सासच्या गणराज्याने सान ऍंतोनियो जिंकले.
  • १८५६ : ईराणमधील बुशहरने ब्रिटीश लश्करासमोर शरणागति पत्करली.
  • १८८८ : अमेरिकन युद्ध खात्यात काम करणाऱया हर्मन हॉलेरिथने स्वत: तयार केलेले गणकयंत्र वापरण्यास सुरूवात केली.
  • १९३७ : दुसरे चीन-जपान युद्ध-नानजिंगची लढाई - लेफ्टेनंट जनरल असाका यासुहिकोच्या नेतृत्त्वाखाली जपानी सैन्याने नानजिंगवर हल्ला केला.
  • १९४० : दुसरे महायुद्ध - रिचर्ड ओ'कॉनोरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय व ब्रिटीश सैनिकांनी ईजिप्तच्या सिद बरानीतील ईटालियन सैन्यावर हल्ला केला.
  • १९४१ : दुसरे महायुद्ध - चीनी गणराज्य, कोरियन गणराज्याचे तात्पुरते सरकार व क्युबाने जर्मनी व जपान विरूद्ध युद्ध पुकारले.
  • १९४५ : जनरल पॅटन जर्मनीमध्ये अपघातात जखमी.
  • १९४६ : न्युरेम्बर्ग खटला सुरू.
  • १९६१ : टांगानिकाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य.
  • १९९० : लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी.
  •  
  • जन्म/वाढदिवस
  • १४४७ : चेंगह्वा, चीनी सम्राट.
  • १५०८ : गेम्मा फ्रिसियस, डच गणितज्ञ व नकाशेतज्ञ.
  • १५९४ : गुस्तावस अडोल्फस, स्वीडनचा राजा.
  • १६०८ : जॉन मिल्टन, इंग्लिश कवी.
  • १९१९ : ई. के. नयनार, केरळचा मुख्यमंत्री.
  • १९२३ : बॉब हॉक, ऑस्ट्रेलियाचा तेविसावा पंतप्रधान.
  • १९४६ : सोनिया गांधी, इटलीत जन्मलेली भारतीय राजकारणी.
  • १९८१ : दिया मिर्झा, भारतीय हिंदी अभिनेत्री.
  •  
  • मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
  • ११६५ : माल्कम चौथा, स्कॉटलंडचा राजा.
  • १४३७ : सिगिस्मंड, पवित्र रोमन सम्राट.
  • १५६५ : पोप पायस चौथा.
  • १६६९ : पोप क्लेमेंट नववा.
  • १७०६ : पेद्रो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
  • १७६१ : ताराबाई, छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी.
  • १९४२ : द्वारकानाथ कोटणीस, मराठी-भारतीय डॉक्टर.
  • १९९७ : के. शिवराम कारंथ, अष्टपैलू कन्नड साहित्यिक.

मंगळवार, डिसेंबर ०५, २०१७

५ डिसेंबर दिनविशेष

५ डिसेंबर दिनविशेष

  • नेल्सन मंडेला - (जुलै १८, १९१८ - डिसेंबर ५, २०१३) हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेते होते.

  •     आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन
  • ठळक घटना/घडामोडी
  •     १४८४ : पोप इनोसंट आठव्याने समिस देसिदरांतेस हा पोपचा फतवा (papal bull) काढला व त्याद्वारे हाइन्रिक क्रेमर व जेकब स्प्रेन्गर यांची सत्यशोधकपदी नेमणूक केली. त्यांची प्रमुख कामगिरी होती जर्मनी मधील तथाकथित चेटूक व जादूटोणा शोधून त्याचा नायनाट करणे. हे 'सत्यशोधन' म्हणजे जर्मनीच्या ईतिहासातील अतिकठोर प्रकरणांपैकी एक होय.
  •     १४९२ : क्रिस्टोफर कोलंबसने हिस्पॅनियोला बेटावर पाय ठेवला व नव्या जगात पाउल ठेवणारा पहिला युरोपियन ठरला.
  •     १५६० : फ्रांसचा राजा फ्रांसिस दुसरा याचा मृत्यू. चार्ल्स नववा राजेपदी.
  •     १५९० : निक्कोलो स्फोन्द्राती ग्रेगोरी चौदावा म्हणून पोपपदी.
  •     १९३२ : जर्मनीत जन्मलेल्या व स्वित्झर्लंडचे नागरिकत्व असलेल्या अल्बर्ट आइनस्टाइनला अमेरिकेचा व्हिसा प्रदान.
  •     १९४५ : फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब.
  •     १९८९ : फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला.
  • जन्म/वाढदिवस
  •     १३७७ : ज्यान्वेन, चीनी सम्राट.
  •     १४४३ : पोप ज्युलियस दुसरा.
  • मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
  •     ७४९ : दमास्कसचा संत जॉन.
  •     १५६० : फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा.
  •     १७९१ : वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार.
  •     १९२६ : क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार.
  •     २०१३ : नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता.

सोमवार, डिसेंबर ०४, २०१७

४ डिसेंबर दिनविशेष

४ डिसेंबर दिनविशेष

इंद्रकुमार गुजराल - (डिसेंबर ४, इ.स. १९१९ - नोव्हेंबर २९, इ.स. २०१२) हे भारताचे ११ वे पंतप्रधान होते.

  •     नौदल दिन
  • ठळक घटना/घडामोडी

    ७७१ : कार्लोमानचा मृत्यू. शार्लमेन फ्रँकिश सम्राटपदी.
    १८२९ : भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्‍यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला.
    १८७२ : ब्रिटीश आरमारी नौकेला मेरी सेलेस्त हे अमेरिकन जहाज समुद्रात प्रवासी किंवा खलाशांशिवाय तरंगत असलेले आढळले.
    १९१८ : पहिले महायुद्ध : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन व्हर्सायच्या तहासाठी फ्रांसला जाण्यास रवाना. राष्ट्राध्यक्ष असताना युरोपला भेट देणारा विल्सन पहिलाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होता.
    १९२४ : गेटवे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.
    १९४३ : दुसरे महायुद्ध : युगोस्लाव्हियाने परागंदा सरकार स्थापन केले.
    १९५२ : लंडनवर थंड धुके पसरले. पुढील काही आठवड्यांत या धुक्या व प्रदूषणामुळे १२,००० पेक्षा अधिक मृत्यू.
    १९५४ : मायामी, फ्लोरिडा येथे पहिले बर्गर किंग सुरू झाले.
    १९५८ : डाहोमी (आताचे बेनिन)ला फ्रांसच्या आधिपत्याखाली स्वायत्तता.
    १९७१ : भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध - भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून संयुक्त राष्ट्रांनी आणीबाणीची बैठक बोलवली.
    १९७१ : भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध-ऑपरेशन ट्रायडेंट - भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला.
    १९७१ : अल्स्टर व्हॉलंटीयर फोर्सने लावलेल्या बॉम्बच्या स्फोटात बेलफास्टमध्ये १५ ठार, १७ जखमी.
    १९७७ : मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ६५३ या विमानाचे अपहरण. नंतर तांजोंग कुपांग येथे विमान कोसळून १०० ठार.
    १९८४ : चीनने नवीन संविधान अंगिकारले.
    १९८४ : हिझबोल्लाहने कुवैत एरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केले व चार प्रवाशांना ठार मारले.
    १९९१ : ओलिस धरलेल्या अमेरिकन पत्रकार टेरी अँडरसनची बैरुतमध्ये सात वर्षांनी सुटका.
    २००८ : कॅनडाची संसद बरखास्त.

जन्म/वाढदिवस
    १५५५ : हाइनरिक मैबॉम, जर्मन कवी व इतिहासकार.
    १५९५ : ज्यॉँ चेपलेन, फ्रेंच लेखक.
    १६१२ : सॅम्युएल बटलर, इंग्लिश कवी.
    १७९५ : थॉमस कार्लाईल, इंग्लिश लेखक व इतिहासकार.
    १८४० : क्रेझी हॉर्स, अमेरिकेतील ओग्लाला सू जमातीचा नेता.
    १८५२ : ओरेस्ट ख्वोल्सन, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
    १८९२ : फ्रांसिस्को फ्रँको, स्पेनचा हुकुमशहा.
    १९१९ : इंद्रकुमार गुजराल, भारताचे पंतप्रधान.
    १९३२ : रोह तै-वू, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
    १९४३ : फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


    १९७५ : हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका.
    १९८१ : ज. द. गोंधळेकर, मराठी चित्रकार.

रविवार, डिसेंबर ०३, २०१७

३ डिसेंबर दिनविशेष

३ डिसेंबर दिनविशेष


  •  जन्म डॉ. राजेंद्र प्रसाद - (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती होते. पेशाने वकील असलेले व भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद बिहार भागामधील प्रमुख नेते होते.

    जागतिक दिवस
    वकील दिन : भारत.

       १८१८ : इलिनॉय अमेरिकेचे २१वे राज्य झाले.
        १९७१ : पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
        २००९ : सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार.

    जन्म/वाढदिवस

        १३६८ : चार्ल्स सहावा, फ्रांसचा राजा.
        १८५४ : विल्यम मिल्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
        १८८२ : नंदलाल बोस, चित्रकार
        १८८४ : डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती.
        १८८४ : टिब्बी कॉटर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
        १८९९ : इकेदा हयातो, जपानी पंतप्रधान.
        १९०५ : लेस एम्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
        १९२३ : ट्रेव्हर बेली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
        १९२५ : केन फन्स्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
        १९३७ : बिनोद बिहारी वर्मा, मैथिली लेखक.
        १९५८ : रिचर्ड रीड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
        १९६३ : ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
        १९७४ : चार्ल विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
        १९७६ : मार्क बाउचर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

        ११५४ : पोप अनास्तासियस चौथा.
        १७६५ : लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
        १९१२ : प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.