९ डिसेंबर
- दिनविशेष ठळक घटना
- के. शिवराम कारंथ - (१० ऑक्टोबर, इ.स. १९०२ - ९ डिसेंबर, इ.स. १९९७) हे ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कन्नड भाषेतील साहित्यकार होते.
- जागतिक दिवस
- टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) : स्वातंत्र्य दिन
- ठळक घटना/घडामोडी
- १७९३ : अमेरिकन मिनर्व्हा, न्यूयॉर्कचे पहिले दैनिक प्रकाशित.
- १८२४ : अयाकुशोची लढाई - ऍंतोनियो होजे दी सुकरच्या नेतृत्त्वाखाली पेरूच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्पॅनिश दलाला हरवून पेरू स्वतंत्र केले.
- १८३५ : टेक्सासच्या गणराज्याने सान ऍंतोनियो जिंकले.
- १८५६ : ईराणमधील बुशहरने ब्रिटीश लश्करासमोर शरणागति पत्करली.
- १८८८ : अमेरिकन युद्ध खात्यात काम करणाऱया हर्मन हॉलेरिथने स्वत: तयार केलेले गणकयंत्र वापरण्यास सुरूवात केली.
- १९३७ : दुसरे चीन-जपान युद्ध-नानजिंगची लढाई - लेफ्टेनंट जनरल असाका यासुहिकोच्या नेतृत्त्वाखाली जपानी सैन्याने नानजिंगवर हल्ला केला.
- १९४० : दुसरे महायुद्ध - रिचर्ड ओ'कॉनोरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय व ब्रिटीश सैनिकांनी ईजिप्तच्या सिद बरानीतील ईटालियन सैन्यावर हल्ला केला.
- १९४१ : दुसरे महायुद्ध - चीनी गणराज्य, कोरियन गणराज्याचे तात्पुरते सरकार व क्युबाने जर्मनी व जपान विरूद्ध युद्ध पुकारले.
- १९४५ : जनरल पॅटन जर्मनीमध्ये अपघातात जखमी.
- १९४६ : न्युरेम्बर्ग खटला सुरू.
- १९६१ : टांगानिकाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य.
- १९९० : लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी.
- जन्म/वाढदिवस
- १४४७ : चेंगह्वा, चीनी सम्राट.
- १५०८ : गेम्मा फ्रिसियस, डच गणितज्ञ व नकाशेतज्ञ.
- १५९४ : गुस्तावस अडोल्फस, स्वीडनचा राजा.
- १६०८ : जॉन मिल्टन, इंग्लिश कवी.
- १९१९ : ई. के. नयनार, केरळचा मुख्यमंत्री.
- १९२३ : बॉब हॉक, ऑस्ट्रेलियाचा तेविसावा पंतप्रधान.
- १९४६ : सोनिया गांधी, इटलीत जन्मलेली भारतीय राजकारणी.
- १९८१ : दिया मिर्झा, भारतीय हिंदी अभिनेत्री.
- मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
- ११६५ : माल्कम चौथा, स्कॉटलंडचा राजा.
- १४३७ : सिगिस्मंड, पवित्र रोमन सम्राट.
- १५६५ : पोप पायस चौथा.
- १६६९ : पोप क्लेमेंट नववा.
- १७०६ : पेद्रो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १७६१ : ताराबाई, छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी.
- १९४२ : द्वारकानाथ कोटणीस, मराठी-भारतीय डॉक्टर.
- १९९७ : के. शिवराम कारंथ, अष्टपैलू कन्नड साहित्यिक.