Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर ०९, २०१७

भारतीय युथ टायगर्स संघटनाच्या वतीने विद्यार्थी दिन साजरा


बल्लारपुर /प्रतिनिधी:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७ नोव्हेंबर १९०० रोजी प्रतापसिंह हायस्कूल, राजवाडा चौक, जि. सातारा या शाळेत प्रवेश झाला. हा दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेताच भारतीय युथ टायगर्स संघटनाच्या वतीने विद्यार्थी दिना नीमीत्य विद्यार्थ्यांना बूंदी व बीस्कीट वाटप करून प्रथम विद्यार्थी दिन साजरा करण्यात केला.
 त्या अनुशंगाने भारतीय युथ टायगर्स संघटने च्या वतीने बल्लारपुर शहरातील यशवंतराव चव्हान प्राथमिक शाळा, व सावित्री बाई फुले बालक मंदिर,छत्रपत्ती शिवाजी प्राथमिक शाळा, लिटिलस्टार कान्वेंट, बुद्धिस्ट इंटरनेशनल स्कुल, भगत सिंह हीन्दि प्राथमिक शाळा, डॉक्टर झाकीर हूसेन ऊर्दू प्राथमिक स्कुल, राणी लक्ष्मी प्राथमिक शाळा  या शाळामध्ये जाऊन जागतीक विद्यार्थी दिना चे महत्व विद्यार्थाना पटवून देत बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल विद्यार्थाना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय युथ टायगर्स संघटनेचे अध्यक्ष प्रशांत झामरे तर  प्रमुख अथीती  आनंद बर्वे , अजय भैया दुबे, ऋषिपाल गहलोत प्रमुख मार्गदर्शन  प्रशांत मेश्राम उपाध्यक्ष भारतीय युथ टायगर्स संघटन, प्रदिप उमरे सचिव भारतीय युथ टायगर्स संघटन, रवीकुमार पुप्पलवार संघटक भारतीय युथ टायगर्स संघटन,
सल्लागार मा. प्रा.राजेश ब्राम्हणे, मा. प्रा. महेन्द्र बेताल असुन कार्यक्रमास यशस्वी करण्या करीता राजमोहनजी ठाकुर, नितेश पाटिल, मोहमद शादाब, सुरज चौबे, निरज मत्ते, पवन झाडे, प्रीतेश शेंडे, देशपाल सौदागर, अवीनाश शेंडे, मिथुन निमसरकार, प्रदिप झामरे, निखील तावाडे, योगेश घडसे, अमोल नळे, शेखर बानोत, किसन फुलझले व इतर सर्व सदस्याचे योगदान होते



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.