Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, सप्टेंबर २४, २०१७

शाळेच्या स्टाफने केला गँगरेप, विद्यार्थिनीने मोदींना लिहिले पत्र


गोहाना (हरियाणा) : येथील एका विद्यार्थिनीने शाळेच्या स्टाफवर तिच्यावर गँगरेप केल्याचा आरोप केला आहे. याबद्दल तिने पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे आणि न्याय देण्याची मागणी केली आहे. पत्रात लिहिले आहे की, ती बदनामीच्या भीतीमुळे पोलिसांत तक्रार देत नाहीये. तथापि, पत्रात तिने शाळा आणि आरोपींची नावे लिहिली आहेत.
जिंद रोडवर आहे ही शाळा असून ओम पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी असल्याचे सांगितले आहे. स्कूलच्या नॉन टीचिंग स्टाफचे दोन जण सुखबीर आणि कर्मवीरने तिला पोर्न व्हिडिओ दाखवून गँगरेप केला. आता सातत्याने तिला टॉर्चर करण्यात येत आहे. कधी शाळेच्या पीआरओ ऑफिसमध्ये तर कधी दुसऱ्या ठिकाणी तिची छेडछाड केली जात आहे.

एकदा तर आरोपी तिला घेऊन गोहानामधील हॉटेलमध्येही गेले. हद्द म्हणजे आरोपींनी तिला तिच्या एका वर्गमैत्रिणीला सोबत आणण्याचे सांगितले. वर्गशिक्षिकेला सांगितले, त्या म्हणाल्या- प्रिन्सिपलशी बोलते, पण काहीच कारवाई झाली नाही.आरोप असाही आहे की, पुन्हा पुन्हा विचारल्या वर्गशिक्षिका म्हणाल्या की, प्रिन्सिपल म्हणाले हे तर होतच असते.पीडितेने पत्रात लिहिले की, मी शाळा संचालकांशी बोलण्याचा विचार केला, पण वाटले काहीच फायदा होणार नाही. यानंतर तुम्हाला (पंतप्रधान) पत्र लिहीत आहे.
हे पत्र पंतप्रधानांशिवाय मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि सोनिपतच्या एसपींनाही लिहिण्यात आले आहे.
पोलिस सूत्रांनुसार, पत्र मिळताच शनिवारी गोहानचे एसआयटी इंचार्ज राजीव कुमार यांच्या नेतृत्वात पथक शाळेत गेले. आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. त्यांचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. तथापि, पोलिसांकडून याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.हा सर्व प्रकार घडल्यानंतर प्रिंसीपल म्हणाले,हा शाळेला बदनाम करण्याचा प्रयत्न आहेआम्हाला पोलिस तपास व्हावा असे वाटते, यामु

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.