Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर २३, २०१७

आमदाराच्या गाड़ीवर नागपुरात हल्ला


प्रतिनिधी/वाडी -
अमरावतीमधील अपक्ष आमदार रवी राणा यांच्या कारवर नागपूरमध्ये हल्ला करण्यात आला.या हल्यात त्यांच्या कारवर दगड़फेक आणि शाही फेकण्यात आली. या घटनेनंतर वाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून हल्ला कोणी केला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. हल्ला झाला त्यावेळी आमदार रवी राणा कारमध्ये नव्हते.
अमरावतीमधील आमदार रवी राणा यांच्या कारवर शनिवारी हल्ला करण्यात आला. शनिवारी दुपारी रवी राणा नागपूर विमानतळावर येणार होते. त्यांना घेण्यासाठी राणा यांचा कारचालक आणि काही कार्यकर्ते कारने अमरावतीहून नागपूर विमानतळाकडे जात होते. अमरावती रोडवर वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी कार थांबवली. त्यांनी कारवर दगड फेकला आणि तिथून पळ काढला. या घटनेच्या वेळी राणा कारमध्ये नव्हते. याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, रवी राणा हे भाजप समर्थक आमदार असून शुक्रवारी त्यांनी शिवसेनेविषयी महत्त्वपूर्ण विधान केले होते. शिवसेनेने भाजपचा पाठिंबा काढला तरी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील. शिवसेनेचे २० ते २२ आमदार वर्षा बंगल्यावर भाजपत प्रवेश करतील असा दावा त्यांनी केला होता. या घटनेत आमदार रवि राणा यांचा ड्रायव्हर थोडक्यात बचावले

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.