Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे २५, २०२०

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सोमवारी २२ वर

चंद्रपूर/खबरबात:

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण २२ झाली आहे. सोमवारी सायंकाळी आणखी एका रुग्णाची त्यामध्ये भर पडली आहे. २३ मे रोजी या महिलेचा स्वॅब नमूना घेण्यात आला होता.

    जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील चिरोली येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातीत २६ वर्षीय महिला पॉझिटीव्ह ठरली आहे.
      चंद्रपूरमध्ये २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) २४ मे ( एकूण रूग्ण २ ) आणि २५ मे ( एकूण रूग्ण एक ) अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण २२ झाले आहेत. 
मूल तालुक्यातील चिरोली येथे पुन्हा एका महिलेचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह - चंद्रपुर जिल्ह्यात रुग्णाची संख्या 22


मूल तालुक्यातील चिरोली गावात 20 तारखेला एका 22 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता, त्यानंतर त्याचाच 27 वर्षीय भाऊ पॉझिटिव्ह निघाला व आज पुन्हा एक महिला कोरोना ग्रस्त आढळल्याने खळबळ उडाली आहे.पहिला पॉझिटिव्ह रुग्ण हा नाशिकच्या मालेगाव येथून 18 मे रोजी चीरोली येथे परत आला होता.

त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते.त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आलेल्या अहवालात चिरोलीच्या पहिल्या कोरोना रुग्णाचा भाऊ पॉझिटिव्ह आल्याने चिरोली गावाला पूर्णपने सील केल होते.मात्र आज पुन्हा त्याच गावात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने आता चंद्रपुर जिल्ह्यात रुग्णाची संख्या 22 झाली आहे.

 तर मूल तालुक्यातील रुग्णांची संख्या तीन  झाली आहे.विशेष म्हणजे नवीन रुग्णाचा इतरांसोबत संपर्क झाला असल्यास प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.