Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

ब्रम्हपुरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ब्रम्हपुरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ऑगस्ट २३, २०१८

जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमध्ये चोरी

जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमध्ये चोरी


Image result for शाळेत चोरी

ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:
ब्रम्हपुरी तालुक्यातील  सुरबोडी व नांदगाव जाणी येथील जिल्हा परिषद शाळांचे अज्ञात चोरट्यांनी  कुलूप तोडून साहित्य चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. २२ ऑगस्टच्या रात्री हि घटना घडली. या आधीसुद्धा १३ ऑगस्टच्या रात्री अरहेर-नवरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे कुलुप तोडून दोन आलमाऱ्या फोडल्याची घटना घडली होती.हि घटना ताजी असतानाच पुन्हा घडलेल्या या घटनांमुळे चोरट्यांनी आता आपला मोर्चा जिल्हा परिषद शाळांकडे वळविल्याचे समजते.
             मिळालेल्या माहिती नुसार ब्रम्हपुरी तालुक्यातील सुरबोडी व नांदगाव जाणी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये २२ ऑगस्टच्या रात्री चोरीच्या घटना घडल्या. ह्या दोन्ही घटना एकाच रात्री घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे यातील सुरबोडी शाळेमधून चोरट्यांनी मॉनिटर व प्रोजेक्टर असे अंदाजे ३५,००० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरले तर दुसऱ्या घटनेत नांदगाव जाणी येथील जिल्हा परिषद शाळेमधून एम्प्लिफायर,माईक,पेनड्राईव्ह व सिपी असे साहित्य चोरीला गेले.याबाबत दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

शुक्रवार, ऑगस्ट ०३, २०१८

 मिशन शौर्य नंतर मिशन शक्ती सुरु;ब्रम्हपुरीचे दोन कराटेपटू जाणारॲथेन्सला

मिशन शौर्य नंतर मिशन शक्ती सुरु;ब्रम्हपुरीचे दोन कराटेपटू जाणारॲथेन्सला

मिशन शक्तीला ना.सुधीर मुनगंटीवार यांचे पाठबळ
आंतरराष्ट्रीय कराटे साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
मिशन शौर्य नंतर मिशन शक्ती सुरु करुन आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रकारात प्रोत्साहन देण्याच्या वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या योजनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी येथील ऋषिकेश येरमे आणि विजयालक्ष्मी येरमे या दोन आदिवासी विद्यार्थ्यांचा ग्रीस देशातील ॲथेन्स येथील प्रवास निश्चित झाला आहे. केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतंर्गत आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पींयनशिप स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपूरीच्या दोन आदिवासी विद्यार्थ्यांना पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर यांच्याकडे हा निधी वळता करण्यात आला आहे. मिशन शौर्यनंतर आणखी दोन मुले आपला पराक्रम विदेशात दाखविण्यासाठी रवाना होत असल्याचा आनंद राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. विशेष बाब म्हणून आदिवासी विकास विभागाने ऋषीकेश व विजया लक्ष्मी येरमे या दोन विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशीप 2018 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकी अडीच लाख अशी एकूण पाच लाख रुपयांच्या खर्चास शासनाने मान्यता दिली आहे.
चंद्रपूर, गडचिरोली व परिसरातील आदिवासी मुलांना काही विशिष्ट खेळामध्ये प्राविण्य देवून त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळविण्यासाठी तयार करण्याचे ना.मुनगंटीवार यांनी जाहिर केले आहे. चंद्रपूर जिल्हयात तयार होणा-या नव्या क्रीडा संकुलाचा व सुविधांचा वापर या भागातील वंचित घटकाला मोठया प्रमाणात व्हावा व त्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्हावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहे. ब्रम्हपूरी परिसरातील या दोन कराटे पटूंनी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपले व आपल्या परिसराचे नांव लौकिक वाढवावे, अशा शुभेच्छा ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.

बुधवार, फेब्रुवारी २१, २०१८

कर्जाला कंटाळुन आणखी एका शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

कर्जाला कंटाळुन आणखी एका शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

चंद्रपूर/ब्रम्ह्पुरी: 
ब्रम्हपुरी तालुक्यातील कोथुळना नवेगाव येथील शेतकरी  प्रविण वामन ठाकुर वय 36 वर्ष यांनी 21फरवरीच्या पहाटे सकाळी 04 वाजताच्या सुमारास उटुन सकाळी डब्बल फसल धानरोवनी करीता मोटार पंपाचे पाणी लावण्यासाठी जातो असे घरच्या कुटुंबीयांना सांगून गावालगत असलेले अरविंद नाकतोडे यांच्या शेताशिवात असलेल्या कडु लिंबू च्या झाडाला गळफास लावून आत्महत्या करुन आपली जिवन याञा संपवली ही घटना बुधवारी सकाळी  07:00 वाजताच्या सुमारास  येथील शेतमजुर शेतात काम करण्याकरिता गेला असता समोर आली.
मृतक शेतकरी प्रविण वामन ठाकुर याला अडीच एकर शेती असुन त्यावर सेवा सहकारी संस्था मधुन 40 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते,व श्तातील पिकांवर मावा,अळी, तूळतुळा रोगांनी शेतात नापिकी झाली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी प्रविण वामन ठाकुर हा आर्थिक विवंचनेत दिसत होता.मुत्यक शेतकरी प्रविण वामन ठाकुर यांच्या पाठीमागे आई,पत्नी,एक मुलगी,एक मुलगा,एक भाऊ असा बराच मोठा आपत्य परीवार आहे.सदर मुत्यक शेतकरी प्रविण वामन ठाकुर यांनी गळफास लावून आत्महत्या केल्या ने कोथुळना नवेगाव येथील जनतेत शोककळा पसरली आहे.शासनाकडून सदर पिढीत कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात याव्ही अशी मागणी  सामाजिक कार्यकर्ते विनोद झोडगे,गोविंदराव भेंडारकर,ड्रा .प्रेमलाल मेश्राम विनोद राऊत यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक चव्हाण तहसीलदार चव्हाण साहेब यांना फोन केले व पंचनामा करून त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी विनंती केली.
महाराष्ट्र शासनाने जरी कर्ज माफी केली असली तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्तेवर उपाययोजना सुचविल्या नसल्याने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्म्हत्तेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, यात मात्रालायातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या असोत व शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेली आत्महत्या असो हे आत्मह्तेचे प्रकरण सरकारच्या भविष्यात  चांगलाच जिव्हारी लागू शकते,त्यामुळे आणखी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने लवकरात लवकर उपाययोजना व सूचना करणे गरजेचे झाले आहे.
 

मंगळवार, जानेवारी २३, २०१८

अन पालिकेच्या व्हाट्सअप ग्रुपवर पॉर्न विडिओने उडवली खळबळ:पोलिसात तक्रार दाखल

अन पालिकेच्या व्हाट्सअप ग्रुपवर पॉर्न विडिओने उडवली खळबळ:पोलिसात तक्रार दाखल

whatsapp साठी इमेज परिणामब्रम्हपुरी/प्रतिनिधी:
स्वच्छ सर्वेक्षणात मदत व्हावी या अनुशंघाने ब्रम्हपुरी नगरपालिकेतील एकाने व्हाट्सअप ग्रुप तयार केला .  पालिकेच्या कामकाजाविषयी सर्वजण अवगत व्हावे, हाही या ग्रुप तयार करण्यामागील उद्देश. मात्र एका आंबटशौकीन ग्रुप सदस्याला ग्रुप तयार करण्यामागील गांभीर्य व ग्रुपच्या मर्यादेचे भान राहिले नाही. ग्रुपमध्ये महिला असतानाही या आंबटशौकिनाने चक्क सात-आठ अश्लिल पॉर्न व्हिडीओ ग्रुपवर वायरल केले हे प्रकरण आता थेट पोलीस स्टेशनच्या दारी पोहचले आहे. या प्रकाराबाबद नगरसेवक सुधीर राऊत यांनी पोलिसात तक्रार दाखल  केली आहे

सध्या  सर्वत्र स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चे वारे वाहत आहेत प्रत्येक पालिका अहोरात्र मेहनत घेत आहे.आशतच ब्रम्हपुरी नगरपरिषद देखील कामाला लागली आहे . ब्रह्मपुरीला चांगला क्रमांक मिळून शहर स्वच्छ व सुंदर व्हावे, यासाठी नगरसेवकांनीही पालिका पदाधिकारी या नात्याने आपले कर्तव्य बजावावे, असा पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मानस आहे
यासाठी एक व्हॉट्स अ‍ॅपवर एक ग्रुप तयार केला. पालिकेतील अधिकारी, कर्मचारी व नगरसेवकांना यात समाविष्ट केले. यात महिलांचाही समावेश आहे, कुठल्याही मुद्यावर निष्पक्ष चर्चा व्हावी, पालिकेच्या कामकाजाविषयी सर्वजण अवगत व्हावे, हाही या ग्रुप तयार करण्यामागील उद्देश. मात्र एका आंबटशौकीन ग्रुप सदस्याला ग्रुप तयार करण्यामागील गांभीर्य व ग्रुपच्या मर्यादेचे भान राहिले नाही. ग्रुपमध्ये महिला असतानाही या आंबटशौकिनाने चक्क सात-आठ अश्लिल पॉर्न व्हिडीओ ग्रुपवर वायरल केले.

अश्लिल व्हिडोओ ग्रुपवर येताच प्रथम ग्रुपमधील पालिका अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये आणि नंतर याची सर्वत्र चर्चा होताच संपूर्ण ब्रह्मपुरीतच खळबळ उडाली.रविवारी शहरात दिवसभर नगरपालिकेच्या या ग्रुपची व त्यातील पोस्टचीच चर्चा सुरू राहिली. याबाबत नगरसेवक  सुधीर राऊत यांनी पोलिसात तक्रार दाखल  केली आहे. या तक्रारीत त्यांनी ग्रुप मधील महिलांना मानसिक तसेच नाहक प्रकारची हानी सहन करावी लागली असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. दोषींवर तात्काळ कारवाई करावी असेदेखील त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

गुरुवार, जानेवारी ११, २०१८

ब्रम्हपुरी महाविद्यालयीन निवडणुकीत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची बाजी

ब्रम्हपुरी महाविद्यालयीन निवडणुकीत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची बाजी

ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या होऊ घातलेल्या  महाविद्यालयीन विद्यापीठ प्रतिनिधी निवडणुकीत, ब्रम्हपुरी तालुक्यात पाच महाविद्यालयाची निवडणूक दिनांक ११ जानेवारी २०१८ संपन्न झाली. या महाविद्यालयीन निवडणुकीत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चाच्या युतीने ५ पैकी ४ जागेवर विजय संपादन करीत बाजी मारली. तर एका जागेवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला समाधान मानावे लागले.
   सविस्तर वृत्त असे की, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात विद्यापीठ प्रतिनिधी निवडणुक पार पडली. यात ब्रम्हपुरी तालुक्यातील पाच महाविद्यालयाचा समावेश होता. यात वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चाच्या युतीने शांताबाई भैय्या महिला महाविद्यालयातून मीनाक्षी घनश्याम नाकाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून अविष तुपकर, गंगाबाई तलमले महाविद्यालयातून संतोष रमेश पिलारे, शोभाताई बनसोड कला व वाणिज्य महाविद्यालयातून गोपाल अंतराम बारसागडे यांनी बाजी मारत ४ महाविद्यालयावर आपला झेंडा रोवला.
 तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ने. हि.महाविद्यालयातून प्रशांत राऊत  हा निवडून आल्याने एका जागेवर समाधान व्यक्त केले.या निवडून आलेल्या ४ विद्यापीठ प्रतिनिधीचे वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चाचे युतीचे मोंटू पिलारे, अनुकूल शेंडे, संजू मेश्राम, अमोल ठेंगरी,मिथुन चौधरी,शरद अंबादे, अंकुश मातेरे, विवेक रामटेके यांनी अभिनंदन केले.