Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर २५, २०१७

‘मॉडेल’ रेल्वे स्थानकाची आश्वासन हवेतच 

कळमेश्‍वर येथे एक्सप्रेस गाड्यांना थांबा,नागपूर – नरखेड – अमरावती ‘पॅसेंजर’ची मागणी

कळमेश्‍वर . नागपूर दिल्ली मार्गावर नागपूर शहरापासून रेल्वे मार्गाने 24 कि.मी. अंतरावर कळमेश्‍वर रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनवर सुविधांचा अभाव असून मॉडेल रेल्वे स्टेशन बनविण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, ही घोषणा हवेतच विरली. या रामटेक लोकसभा क्षेत्रामधून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींकडून फक्त आजपर्यंत आश्‍वासनेच मिळाली आहे. केंद्रामध्ये काँग्रेस राजवटीत रामटेक क्षेत्रामधून निवडून गेलेले मुकूल वासनिक मंत्री असताना त्यांनी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्‍वर काटोल, कामठी व अन्य रेल्वे स्थानके मॉडेल रेल्वे स्थानके बनविण्याची घोषणा केली होती, मात्र, अद्यापही हे काम पुर्णत्वास न आल्याने लोकप्रतिनिधी दिलेली घोषणा फक्त मतदारांचे मन भरविण्यापुर्ती तर होणी नाही ना अशी चर्चा आता स्थानिकांत रंगू लागली आहे़
कळमेश्वर हे औद्योगिक क्षेत्र आहे़ परिसरात अभियांत्रीकी महाविद्यालये , नामवंत शैक्षणिक संस्था व कारखाने आहेत. त्यामुळे रोजगारानिमित्य परप्रातिंयांनी येथे आपले बस्थान मांडले आहे़ येथे इटारशी व आमला पॅसेजरसह आडवड्यातून तिन दिवस चालणाऱ्या नागपूर- भुसावळ दादाधाम एक्सप्रेस व्यतिरिक्त एक्सप्रेसचा थांबा नसल्याने गोंडवाना,दक्षिण एक्सप्रेस्ा,तर आमरावती स्थानकावर गोंडवाना एक्सप्रेम, दक्षिण एक्सप्रेस, जबलपूर, अमरवती, नागपूर, इंदोर या जलद गाड्या येथे थांबाव्या याकरिता डॉ़ पोतदार, नगगराध्यक्ष इखार, रेल्वे प्रवाशी मित्र मंडळाचे चंद्रशेखर श्रीखंडे, आंनद खत्री यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातनू तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांचेकडे निवेदन दिले होते़ परंतु, त्याच्याकडूनही आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही़
जर येथे या गाड्यानां थांबा मिळाल्यास परिसरात असलेल्या परप्रांतीयांना व स्थानिकांना इतर राज्यत जाण्यासाठी सोईचे होईल़ तर सावनेर येथील व्यापारी वर्गाला दिल्ली, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तािमळनाडू इत्यादी राज्यामध्ये जाण्यासाठी 40 कि ़ मी अंतरावर असलेले नागपूर रेल्वे स्थानकावर न जाता 18 कि ़ मी अंतरावर असलेल्या कळमेश्वर स्थानक असल्यामुळे जर ही व्यवस्था उपलब्ध झाल्यास त्याचाही त्रास कमी होणास मदत होईल़
नागपूर – नरखेड – अमरावती पॅसेजर सुरू केल्यास नरखेड मार्गे पुसला, मोवाड, वरूड, हिवरखेड, मोर्शी, सिद्धपूर, चांदूरबाजार, वलगाव, अमरावती जाणार्‍या प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. या सर्व बाबी लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार कृपाल तुमाने, यांनी याकडे लक्ष देवून कळमेश्‍वर रेल्वे स्टेशन योग्य सोयी सुविधांसह जलदगती गांड्यांना थांबा व नागपूर – नरखेड – अमरावती पॅसेजर लकरात लवकर सुरू करावी अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे़


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.