Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर २५, २०१७

दुचाकी चोरी करणारी टोळी गजागाड


कळमेश्वर पोलिसांची कामगिरी
कळमेश्वर  गेल्या वर्षभरापासून दुचाकी चोरटयांनी तालुक्यात अक्षरश: हैदोस घातला होता़ चोरटयांनी स्थ्ाानिक पोलिसांसह नागपूर जिल्हा गुन्हे अन्वेशन विभाग आणि नागरिकांच्या नाकात दम आणला होता़ दुचाकी चोरीच्या अनेक तक्रारी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये आल्या होत्या़ तेव्हा पोलिसांनी सखोल तपास करीत दुचाकी चोरी करणाऱ्या या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफश केला असून दोन चोरटयांना 6 ुचाकी वाहन अशा 2 लाख 70 हजारांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले़
नागरिकांच्या दुचाकी चोरीच्या वरचेवर तक्रारी येत असतांना पोलिसांनी तपासाला गती दिली़ दरम्यान खबरींना स्थानिक परिसर तसेच लगतच्या मध्यप्रदेश राज्यात चौकशीसाठी पाठविले़ खबरीच्या माध्यामातून पोलिसांनी गुन्हेगारांबाबत माहिती घेतली़ माहितीनुसार सिसीटीव्ही फुटेजमध्ये एका फिर्यादीने आरोपी गोलू मसदकर सारखा दिसत असल्याचे सांगितले़ त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या मुळ गावाी सालई ढाबा मध्येप्रदेश येथे जाऊन आरोपी गोलू उर्फ अमित अजाबराव मसदकर यास ताब्यात घेतले़ आरोपीने टाटा 207 एमएच 40 4466 क्रमांकाची चारचाकी चोरीकेल्याचे कबुल केले़ तसेच आपल्या सहकाऱ्यांची नावेसुध्दा सांगितली़ त्यानुसार पोलिसांनी सहकारी आरोपी राकेश मनोहरे यास अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील थडीपवनी येथून ताब्यात घेतले़ दुसरा आरोपी विनोद हा अद्याप फरार आहे़ राकेशनने गुन्ह्याची कबुली दिली असून इतरही गुन्हे केल्याचे सांगितले़ पुढील तपास सुरू आहे़ ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश भोयर, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक बी ़ ए़ तांदुळकर, सहायक फौजदार इखार, धुर्वे, पोलिस शिपाई रवी मेश्राम, श्रीकांत बोरकर यांनी केली़


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.