Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर १७, २०१७

युनिसेफ अधिका-यांनी केली पिपर्डा व मंगीची पाहणी


स्वच्छ भारत मिशनच्या कामाची पाहणी
चंद्रपुर (प्रतिनिधी)- दिनांक 17/11/2017 कोरपना तालुक्यातील पिपर्डा व राजुरा तालुक्यातील मंगी गावाला नुकतीच ईग्लंड देशातील युनिसेफ़च्या महिला अधिकारी इम्मा हेनरीऒन यांनी भेट दिली असुन, गावाची पाहणी केली. गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामाची माहिती जाणुन घेतली.
गावात विदेशी अधिका-यासह युनिसेफ़ मुंबई कार्यालयाचे जयंत देशपांडे, प्रायमो पुणेचे महेश कोडगिरे, उपमुख्य  अधिकारी पांणी व स्वच्छता रविंद्र मोहिते, कोरपणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ संदिप घोन्सीकर, सहाय्यक गटविकास अधिकारी धनंजय साळवे, राजुरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ ओमप्रकाश रामावत, स्वच्छ भारत मिशनचे कृष्णकांत खानझोडे, प्रकाश उमक, साजिद निजामी, पंचायत समिती कोरपनाचे गट समन्वयक रवी लाटेलवार,लारेन्स खोबरागडे युनिसेफ़ चमुसह कोरपना तालुक्यातील पिपर्डा व राजुरा तालुक्यातील मंगी या गावात हजर होते. गावात विदेशातील अधिकारी आल्याचे पाहुन गावक-यांमध्ये आंनदाचे वातावरण  निर्माण झाले होते. आलेल्या विदेशी मान्यवरांचे स्वागत गावांच्या पारंपारीक पध्दतीने करण्यात आले. चमु कडुन गावाची पुर्ण पाहणी करुन गावक-यांशी गावात केलेल्या विकास कामा विषयी चर्चा करुन माहिती जाणुन घेतली. याशिवाय गावातील शाळा,अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केन्द्र,ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी केली. गावातील घरी जावुन शौचालय वापर व स्वच्छतेच्या सवयी विषयी माहिती घेण्यात आली. पिपर्डा या गावातील सामाजिक कार्यकर्ता आबिद अली यांनी विदेशातुन आलेल्या अधिकारी यांचे गावात स्थानिक संस्कृती नुसार स्वागत करण्यात आले व गावाचा संपुर्ण परिसर दाखवुन , गावात केलेल्या विकास कामाची माहीती दिली. यावेळी दोन्ही गावात ग्रामपंचायतचे सरपंच,ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व गावातील महिला ,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यादौ-या दरम्यान युनिसेफ़च्या चमुने जिल्हा परिषदला भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदच्या जनपद सभागृहात छोटे खाणी मिटिंग घेवुन, जिल्हात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चालु असलेल्या कामा विषयी व जिल्हा हागणदारी मुक्त करण्याच्या यशस्वी नियोजना विषयी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)रविन्द्र मोहिते  यांनी सादरीकरण करुन चमुला माहिती  दिली. चंद्रपुर जिल्हा यशस्वीपणे हागणदारीमुक्त कडे वाट्चाल करित असल्याचे पाहुन इंग्लंड वरुन आलेल्या विदेशी महिला अधिकारी इम्मा हेनरीऒन जिल्हा परिषदचे कौतुक केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.