लालपेठ मित्र मंडळाचा उपक्रम
चंद्रपुर/प्रतिनिधी:भारताचे पूर्व पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसानिमित्य मुकबधिर व अपंग विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा करण्यात आला. या मुलांना देखील या दिवसाची माहिती व्हावी व त्यांनाही बाहेरचे जग अनुभवता यावे या उद्देशाने लालपेठ मित्र मंडळाच्या युवकांनी चंद्र्पुर शहरातील बायपास रोडवरील मुकबधिर व अपंग विद्यार्थ्यांसोबत ए.पी.जे अब्दुल कलाम उद्यानात सहन नेऊन आनंदाने मुक्त विहार करत बालक बाल दिवस साजरा केला.
यात या मूकबधिर व अपंग विद्यालयाचे तब्बल ८० विध्यार्थ्यानी या सहलीचा आनंद घेतला,यावेळी या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदफ़ुलले होते. बागेत लावलेले झुले ,घसरपट्टी, भुलभुलैय्या या सारखे खेळ खेळण्यात विद्यार्थी गुंग झाले होते .
यावेळी या विद्यार्थ्यांना खानपानासाठी फळ ,अल्पोपहार,व मिठाईची व्यवस्था करण्यात आली होती.
या मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यपिका माधुरी शास्त्रकार यांनी युवकांनी केलेल्या या उपक्रमाबद्दल धन्यवाद व्यक्त केले. या कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी शैलेश दिन्डेवार, आकाश लक्काकुलवार, रघु गुंडला, प्रेम रंगेरी, शुभम मंथनवार, राजेश नुकल, अमोल चटकी, चंदनसींग, दिव्या सोनकर, करिश्मा खनके, प्रगती काटरे, शितल बिलोरिया, राक्षीता शुक्ला, श्वेता नायडु, तृप्ती गटलेवार, अमीत कुलीपाका यांनी अथक परिश्रम घेतले.