Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर २०, २०१७

चंद्रपूर पोलिस सलग तिसऱ्यांदा ठरले चॅम्पीयन

नागपुर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2017
चंद्रपूर /प्रतिनिधी:
 पोलीस दलामध्ये दैनंदीन असणारे आवाहानात्मक कर्तव्य बजावितांना, खेळामध्ये सुध्दा नैपुण्य दाखविण्याकरीता चंद्रपुर पोलीस दलाने सातत्य राखले आहे. अशीच एक नैपुण्यपुर्ण कामगीरीस चंद्रपुर पोलीस दलातील खेळाडु कर्मचारी यांनी गवसणी घातलेली आहे. सन 2015 मध्ये गोंदिया येथे, सन 2016 मध्ये स्वतःच्या मैदानावर चंद्रपुर येथे आणि नुकतेच नागपुर येथे संपन्न झालेल्या 2017 नागपुर परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा मध्ये सलग तिसऱ्यांदा जनरल चॅम्पीयनशिपवर चंद्रपुर पोलीस दलाने विजयाची मोहर लावली आहे.


नागपुर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2017 चे यजमानपद या वर्षी नागपुर ग्रामीण जिल्हा पोलीस दल यांचे कडे होते.दिनांक 12 नोव्हंेबर ते 17 नोव्हेंबर 2017 पर्यंत पोलीस मुख्यालय नागपुर ग्रामीण येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेमध्ये नागपुर परिक्षेत्रातील नागपुर ग्रामिण, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली व चंद्रपुर या सहा जिल्हयांचा समावेष होता. या सहा ही जिल्हयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस खेळाडू मिळुन एक हजार खेळांडूची या दरम्यान जिल्हयात उपस्थिती होती. या स्पर्धे मध्ये अॅथलेटीक्स, फुटबाॅल, हाॅकी, बास्टेकबाॅल, व्हाॅलीबाॅल, खो-खो, हॅन्डबाॅल, वेट लिफ्टींग, कुस्ती, ज्युडो, बाॅक्सींग, स्विमींग, मॅराथाॅन, क्राॅस कंन्ट्री व कबड््डी या क्रीडा प्रकारांचा समावेश होता.
नागपुर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2017 मध्ये सुध्दा चंद्रपुर पोलीस दलाने जनरल चॅम्पीयनशिप पटकावित पुढिल प्रमाणे स्थान प्राप्त केले आहे. फुटबाॅल-प्रथम, हाॅकी-प्रथम, स्विमींग-प्रथम, वेटलिफटींग-प्रथम, बाॅक्सींग-प्रथम, कुस्ती-प्रथम, ज्युदो-द्वितीय, हाॅलीबाॅल- द्वितीय, कबडड्ी- द्वितीय, बास्केटबाॅल- द्वितीय, हॅन्डबाॅल-तृतीय, खो-खो-तृतीय याप्रमाणे स्थान पटकावित एकुण 160 गुणांची कमाई करून सलग तिसऱ्यांयादा जनरल चॅम्पीयनशिप पटकाविली आहे.
दिनांक 17 नोव्हेबंर रोजी या परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा बक्षिस वितरण व समारोप समारंभ मान्यंवरांच्या उपस्थित पोलीस मुख्यालय नागपुर ग्रामीण येथे पार पडला. यावेळी मा. श्री. सुनिल शुक्रे, न्यायाधिश उच्च न्यायालय मुंबई, खंडपिठ नागपुर, व विशेष पोलीस महानिरिक्षक श्री. प्रकाश मुत्याल व नागपुर परिक्षेत्रातील सर्व जिल्यांचे पोलीस अधीक्षक, आणि खेळाडू व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. श्रीमती नियति ठाकर, पोलीस अधीक्षक चंद्रपुर, श्री. हेमराजसिंह राजपुत अपर पोलीस अधीक्षक चंद्रपुर व चंद्रपुर पोलीस दलातील वरिष्ठ़ खेळाडू यांचे मार्गदर्षनात सलग तिस-यांदा जनरल चॅम्पीयनशिप पटकाविणे ही बाब चंद्रपुर जिल्हा पोलीस दलाकरीता कौतुकास्पद आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.