Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर २०, २०१७

‘‘ रंग्या रंगीला रे’’ स्पर्धेतील पाचवे पुश्प ‘‘हाऊस फुल’’

चंद्रपूर - 57 वी महाराश्ट्र राज्य हौषी नाट्य मराठी नाटय स्पर्धा चंद्रपूर केंद्रात दि. 18 नोव्हेंबर 2017 रोजी सायं. 7.00 वा. श्री. योगेष सोमण लिखित व श्री. सुधाकर पाटील दिग्दर्षित ‘रंग्या रंगीला रे’ हे नाटक
सादर झाले. सादरकर्ती संस्था कामगार मनोरंजन केंद्र, चंद्रपूरने स्पर्धेतील पाचवे पुश्प सादर झाले आणि
स्पर्धेतील पहिले हाऊस फुल नाटक ठरले. रसिक प्रेक्षक उभे राहुन व मधल्या रांगांमध्ये बसून नाटकाचा
आस्वाद घेत होते. हे बघता प्रेक्षकांच्या पसंतीस ‘रंग्या रंगीला रे’ उतरले असे म्हणता येईल.


थोडक्यात कथानक असे आहे की, रंग्या हा बंगल्यावर फुकट राहात असतो. त्या बंगल्याचे मालक
परदेषात राहात असतो आणि हा त्या बंगल्यात चोरुन राहात असतो. त्याचं सिमा नावाच्या मुलीवर प्रेम
असते आणि ती स्वतःचे घर सोडून बंगल्यावर येते आणि रंग्याची डोके दुखी वाढते आणि त्याच दिवषी
तिथे मालकाचे कामा-काकु येतात. तिथुन नाटकाची सुरवात होते. एक प्रकरण संपत नाही तर रंग्याची
पे्रयसी सिमा ही प्रकाष व त्याच्या बायकोला पैसे घेवून त्यांना राहायला बंगल्यावर बोलावते. या एकाच
वेळी आलेल्या तिन्ही संकटाला पार करण्यासाठी रंग्याची तारंबळ उडते. ऐकीकडे प्रेयसी तर दुसरीकडे
बंगल्याचा मालकाचे काका - काकु, व किराया देवून आलेले प्रकाष आणि बायको आणि मध्ये बिचारा
रंग्या हा या नाटकाचा मुळ गाभा आहे.
गाजलेले नाटक स्पर्धेमध्ये सादर करणे हे आवाहन चंद्रपूरच्या कामगार मनोरंजन केंद्र या संस्थेने स्विकारले आणि पडदा उघडताच दिगांबर इंगळे यांनी उभारलेलं नेपथ्य व्यवसायीक नाटकापेक्षाही
उत्तमपणे उभारले होते ही यषाची बाब होती. पण कलाकारांनी अभिनयाच्या बाजुने ते षिवधनुश्य
उचलण्याचा प्रयत्न केला. गमतीदार प्रसंगामुळे प्रेक्षकांच्या हष्या मिळवत पसंतीसही उतरलेले दिसलेनेपथ्य,
प्रकाष योजना, संगीताने नाटक बहारदार बनले. फाॅर्सिकल अंगाने जाणाने नाटक
श्री. सुधाकर पाटील, दिग्दर्षक यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांची गर्दी बघता नाटकाचा प्रयोग
चांगला झाला आणि प्रेक्षकांना आवडला असचं म्हणावं लागेल. हाऊस फुलचा बोर्ड ‘रंग्या रंगीला रे’
या नाटकाला निकालाअंती किती बक्षिसांची गर्दी जमवू षकेल ही वेळच ठरवेल

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.