Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

Tadoba लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Tadoba लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, नोव्हेंबर २८, २०२१

 चंद्रपुर: शिकारीच्या संशयावरून गावकऱ्यांना करंट लावून बेदम मारहाण

चंद्रपुर: शिकारीच्या संशयावरून गावकऱ्यांना करंट लावून बेदम मारहाण

चंद्रपूर:
शिकारीच्या संशयावरून सात ग्रामस्थांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी २४ आणि २५ नोव्हेंबरला करंट लावून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर येथील वनपरिक्षेत्रातील पायली चिंचोली गावात घडली.बुधवारी शिकारीचा संशय आल्याने ८ ते ९ वन कर्मचारी थेट चिंचोली गावात पोहचले आणि संशयितांना ताब्यात घेत बेदम मारहाण केली. ते इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी मारहाणीसोबतच विजेचे शॉक दिल्याचा आरोप पीडित ग्रामस्थांनी केला आहे.

या प्रकरणानंतर संतप्त गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी व पोलिसात तक्रार दाखल केली,यावर कारवाई करत दोन वन कर्मचाऱ्यांवर ३२४,३२४,३४८, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काय घडले त्या दिवशी
गावात एका चितळाची शिकार झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली. चौकशीसाठी वनविभागाने गावातील ईश्‍वर रामटेके, हनुमान आसूटकर, संदीप आसूटकर या तिघांना ताब्यात घेऊन चंद्रपूर येथे चौकशीकरिता घेऊन गेले.तिघांना प्लास्टिकच्या दांड्याने बेदम मारहाण केली. चार्जिंग बॅटरीद्वारे हातापायाला शॉक दिला तर आकाश चांदेकर या ग्रामस्थाच्या गुप्तांगावर चार्जिंग मशीन ठेवली असाही आरोप केला गेलाय.हनुमान आसूटकरला चंद्रपूर येथील रामबाग नर्सरीत नेऊन बेदम मारहाण केली. तसेच संध्याकाळी संदीप व ईश्‍वर यांना तळपायाला करंट लावून दुखापत करण्यात आली. एवढ्यावरच चूप न बसता एक अधिकारी दोन्ही पाय त्याच्या मांडीवर ठेवून उभा राहिला. रात्री आठ वाजता त्यांना सोडून देण्यात आले.

त्यानंतर गुरुवारी पुन्हा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत त्यांना बोलावण्यात आले. आकाश चांदेकर, संदीप नेहारे, मंगेश आसूटकर, राकेश साव यांना बेदम मारहाण करून हातापायाला करंट लावण्यात आला. माणुसकीला काळिमा फासणारे वन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी 'पीडितांसह गावकऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे व दुर्गापूर पोलिसांना गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहे.

याप्रकरणी भिमनवार व यादव या दोन वन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु असून पुरावा नसतांना ग्रामस्थांना अशा प्रकारे बेदम मारहाण करून करंट लावल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.

रविवार, नोव्हेंबर २१, २०२१

वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत, पतीला नोकरी

वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत, पतीला नोकरी

मुख्यमंत्र्यांकडून ढुमणे कुटुंबीयांचे सांत्वन

 चंद्रपुर:
 ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. मृत श्रीमती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे, तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक श्रीमती ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ओढून नेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकाराबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मृत ढुमणे आणि त्यांच्या कुटुंबियाप्रति संवेदना प्रकट केली आहे. वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच श्रीमती ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामवून घेण्याचेही निर्देशित केले आहे.

शनिवार, नोव्हेंबर २०, २०२१

धक्कादायक: ताडोबात महिला वनरक्षकावर वाघाचा हल्ला;महिला वनरक्षक स्वाती ढुमणे जागीच ठार

धक्कादायक: ताडोबात महिला वनरक्षकावर वाघाचा हल्ला;महिला वनरक्षक स्वाती ढुमणे जागीच ठार

 

चंद्रपूर(खबरबात):
 वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबात दाब धरून बसलेल्या वाघाने व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्यावर हल्ला करीत जागीच ठार केले . ताडोबा जंगलातील कोअर झोनमध्ये शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळं वनकर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

हा वाघ पानवठ्याजवळ दबा धरून बसला होता. महिला वनरक्षक स्वाती ढुमणे (वय 43) या चार वनमजुरांसोबत आज सकाळीच कोलारा कोअर झोनच्या कक्ष क्र. 97 मध्ये गेल्या. तिथं वॉटर होलजवळ पाणी आहे की, नाही याची पाहणी त्या करीत होत्या. दरम्यान, पाणवठ्याजवळ दबा धरून बसलेल्या वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. स्वाती यांना पकडून ओढत जंगलात नेले. सोबत असलेल्या वनमजुरांनी वाघाला हुसकवण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत स्वाती यांना वाघानं ठार केलं होतं.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फौजफाटा बोलावली आणि शोधमोहीम सुरू केली. केल्यावर स्वाती यांचा मृतदेह जंगलात सापडला. सध्या व्याघ्रगणनेसाठी देशातील सर्वच जंगलात वनविभागाच्या वतीने पूर्वतयारी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वाती या कोअर झोनमध्ये गेल्या होत्या.स्वाती ढुबळे या महिला वनरक्षक मागील वर्षी विरुर वनपरिक्षेत्रातून बदली होऊन ताडोबात आल्या होत्या. त्यांना दोन लहान मुल आहेत.

या घटनेवरून वनकर्मचाऱ्यांना आता मोठ्या चतुराईने जंगलात काम करावे लागणार आहे.