Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सावली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सावली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, जुलै १५, २०१८

व्याहाड खुर्द व सावली येथे कामगार नोंदणीला उत्स्फुर्त प्रतिसाद

व्याहाड खुर्द व सावली येथे कामगार नोंदणीला उत्स्फुर्त प्रतिसाद

अविनाश पाल यांचे हस्ते प्रमाणपञाचे वितरण 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र शासन कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इत्तर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचे सहकार्याने व कृषी ऊत्पन्न बाजार समिती सावली च्या वतिने भाजपा तालुका अध्यक्ष तथा मुख्य प्रशासक अविनाश पाल यांचे वाढदिवसानिमीत्य उपबाजार व्याहाड खुर्द व सावली येथे कामगार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबीराला सावली तालुक्यातील बहुसंख्य कामगारानी नोंदणी करीता उत्स्फुर्त सहभाग दर्शवुन नोंदणी केली व शिबीराची सुरवात यशस्वी केली, या शिबीरात तब्बल एकाच दिवशी 123 कामगारांनी नोदंनी करून चंद्रपुर जिल्हात विक्रम केलेला आहे, आजपर्यंत एकाही तालुक्यानी इतकी नोंदनी केली नाही, नोंदणी केलेल्या कामगांराना प्रमाणपञाचे वाटप बाजार समितीचे मुख्य प्रशासक तथा भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी मिळणा-या लाभाचा पुरेपुर फायदा घ्यावा असे आवाहनही केले.
या शिबीराच्या वेळी भाजपा सावली तालूका अध्यक्ष तथा मुख्य प्रशासक अविनाशभाऊ पाल, पंचायत समितीचे उपसभापती तुकारामजी ठिकरे, अर्जुनजी भोयर प्रशासक तथा कोषाध्यक्ष भाजपा, अरूनजी पाल प्रशासक, दिलीपजी ठिकरे तालुका महामंञी भाजपा तथा प्रशासक, भुवनजी सहारे प्रशासक, पुनम झाडे जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो तथा प्रशासक, शरद सोनवाने प्रशासक, दिनकर घेर सचिव, दौलतजी भोपये, दिवाकर गेडाम जिल्हा सचिव भाजयुमो, तुळशिदास भुरसे प्र. लेखापाल कुमरे तसेच कर्मचारी उईके सरकारी कामगार अधिकारी चंद्रपुर, दुबे मँडम निरीक्षक दुकाने नागपुर,रीना शेख, स्वाती शेगोकर, अश्विनी वांढरे, स्वागत निमगडे, संदीप बुरडकर यांनी कामगार नोंदनीसाठी अथक परिश्रम केले.

बुधवार, मे १६, २०१८

वेल्डर कामगाराचा करंट लागून मृत्यू

वेल्डर कामगाराचा करंट लागून मृत्यू

सावली/प्रतिनिधी:
सावली येथील एका वेल्डिंगच्या दुकानात काम करणाऱ्या कारागिराला विद्युत करंट लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली सुभाष दादाची भोयर ३५ वर्षे राहणार पारडी तालुका सावली असे याचे नाव असून हा वेल्डिंग वर्कशॉप येथे कारागीर म्हणून काम करायचा. गेल्या आठ वर्षांपासून तो या वर्कशॉप मध्ये नियमित वेल्डिंगचे काम करीत होता मात्र बुधवारी अचानकपणे काम सुरू असताना त्याला करंट लागल्याने   त्याचा जागीच मृत्यू झाला त्यांच्यामागे पत्नी मुलगी मुलगा असा आप्त परिवार आहे या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक करावा व त्यांचे सहकारी करीत आहे. 

शनिवार, जानेवारी १३, २०१८

भीमा कोरेगाव प्रकरणाचा सावलीत पडसाद

भीमा कोरेगाव प्रकरणाचा सावलीत पडसाद

प्रतिनिधी / सावली:

महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव येथील शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यासाठीगेलेल्या लोकांवर अचानक काही सजाजकंटकाव्दारे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला. हजारों लोक जखमी झाले. त्यामुळे बौध्द बांधवांच्या भावना दुखावल्या. हल्लोखरांवर कारवाईकरा अशी ठिणगी महाराष्ट्रभर पसरली. अनेक ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले.याचाच एक भाग म्हणून सावलीत सुध्दा महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा महामोर्चा खादी कार्यालयापासून सुरूवात होऊन गावाला वळसा देत चंद्रपूर -गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाने तहसील कार्यालयावर पोहचला.
                                                    महामोर्चाचे रूपांतर निषेध सभेत करण्यात आले.  त्यानंतर शिष्टमंडळाच्या माध्यमातून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.   भिमा कोरेगांव येथे १ जानेवारी १८१८ ला पेशवाईच्या होणार्‍या अन्यायाला कंटाळून पेशवाईविरूध्द बंड पुकारला. त्या वेळी महारांनी पेशव्यांना हरविले. त्यामुळे भिमा कोरेगांव येथे या स्मरणार्थ ब्रिटीशांनी शौर्यस्तंभ उभारला. महाराष्ट्र हा इतिहास लक्षात घेता भिमा कोरेगांवयेथे दरवर्षी महाराष्ट्रातील बौध्द अनुयायी लाखोंच्या संख्येने मानवंदना देण्यासाठी जात असतात. यंदाचे हे व्दिशतकीय वर्ष असल्याने लाखोंच्या संख्येने भिमा कोरेगांव येथे बौध्द अनुयायी गेले असता प्रस्थपितांनी या कार्यक्रमात हल्ला चढविला होता. त्यामुळे अनेकांचा बळी गेला.तर हजारो जखमी झाले. या हल्ल्याचा निषेध सर्वत्र करण्यात आला. सावली महामोर्चाचे आयोजन निषेध नोंदविण्यासाठी करण्यात आले होते. मोर्चाचा समारोप तहसीलदारांना निवेदन देवून करण्यात आला.यावेळी हजारोच्या संख्याने बौध्द बांधव उपस्थित होते.

शुक्रवार, नोव्हेंबर १०, २०१७

अविनाश पाल बाजार समिती अशासकीय प्रशासकीय मंडळात

अविनाश पाल बाजार समिती अशासकीय प्रशासकीय मंडळात

सावली/प्रतिनिधी - कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अशासकीय प्रशासकीय मंडळात मुख्य प्रशासक म्हणून भाजपाचे तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी पदभार स्विकारला.
या अशासकीय प्रशासक मंडळात उपमुख्य प्रशासक म्हणून विनोद गड्डमवार यांची तर प्रशासक म्हनुन दिलीपजी ठिकरे, पुनम झाडे, सुधाकरजी गोबाडे, अर्जुनजी भोयर, अरुनजी पाल, गुरुदेव भुरसे, अशोक नागापुरे, रविंद्र साखरे, सचिन तंगडपल्लीवार,  ढिवरूजी कोहळे, भुवनजी सहारे, सौ. पुष्पाताई शेरकी व शरद सोनवाने यांची नियुक्ति करण्यात आली.
पदभार स्विकारतांना संतोष सा. तंगडपल्लीवार सभापती बांधकाम समिती जि. प. चंद्रपूर, देवराव सा. मुद्दमवार जिल्हा सचिव भाजपा, सतिष बोम्मावार महामंञी, तुकाराम ठिकरे उपसभापती पं. स. सावली, मनिषा चिमुरकर सदस्य जि. प. चंद्रपूर, योगिता डबले सदस्य जि. प. मनोहरजी कुकडे होते.

सावली तालुक्यातील मेहा बूज येथील मुख्याध्यापक निलंबित

सावली तालुक्यातील मेहा बूज येथील मुख्याध्यापक निलंबित

सरपंचांच्या तक्रारीवर जिल्हा परिषदेची कारवाई
चंद्रपूर - मेहा बुज येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र निरगुडे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळात त्यांना सिंदेवाही पंचायत समिती कार्यालयात हजेरी लावण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिल्यात.
सावली तालुक्यातील मेहा बूज येथील शाळेत आठ वर्षापासून रामचंद्र निरगुडे कार्यरत होते. तेव्हापासून त्यांनी शैक्षणिक कामाकडे दुर्लक्ष करणे, शालेय कार्यक्रमाला स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारींना न बोलावणे, वारंवार रजेवर जाणे, महिला सरपंचांशी असभ्य वर्तन करणे, विद्यार्थी कडून शाळेत कामे करवून घेणे  आदी तक्रारी होत्या.
सरपंच उषा भोयर आणि गावक-यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावली पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी मार्फत चौकशी करण्यात आली. यात ते दोषी असल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला. त्यानुसार मुख्याध्यापक रामचंद्र निरगुडे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळात त्यांना सिंदेवाही पंचायत समिती कार्यालयात हजेरी लावण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिल्यात. यापुढे सूचनांचे पालन केल्यास बडतर्फ करू, अशी ताकिद देण्यात आली आहे.