Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी १३, २०१८

भीमा कोरेगाव प्रकरणाचा सावलीत पडसाद

प्रतिनिधी / सावली:

महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव येथील शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यासाठीगेलेल्या लोकांवर अचानक काही सजाजकंटकाव्दारे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला. हजारों लोक जखमी झाले. त्यामुळे बौध्द बांधवांच्या भावना दुखावल्या. हल्लोखरांवर कारवाईकरा अशी ठिणगी महाराष्ट्रभर पसरली. अनेक ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले.याचाच एक भाग म्हणून सावलीत सुध्दा महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा महामोर्चा खादी कार्यालयापासून सुरूवात होऊन गावाला वळसा देत चंद्रपूर -गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाने तहसील कार्यालयावर पोहचला.
                                                    महामोर्चाचे रूपांतर निषेध सभेत करण्यात आले.  त्यानंतर शिष्टमंडळाच्या माध्यमातून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.   भिमा कोरेगांव येथे १ जानेवारी १८१८ ला पेशवाईच्या होणार्‍या अन्यायाला कंटाळून पेशवाईविरूध्द बंड पुकारला. त्या वेळी महारांनी पेशव्यांना हरविले. त्यामुळे भिमा कोरेगांव येथे या स्मरणार्थ ब्रिटीशांनी शौर्यस्तंभ उभारला. महाराष्ट्र हा इतिहास लक्षात घेता भिमा कोरेगांवयेथे दरवर्षी महाराष्ट्रातील बौध्द अनुयायी लाखोंच्या संख्येने मानवंदना देण्यासाठी जात असतात. यंदाचे हे व्दिशतकीय वर्ष असल्याने लाखोंच्या संख्येने भिमा कोरेगांव येथे बौध्द अनुयायी गेले असता प्रस्थपितांनी या कार्यक्रमात हल्ला चढविला होता. त्यामुळे अनेकांचा बळी गेला.तर हजारो जखमी झाले. या हल्ल्याचा निषेध सर्वत्र करण्यात आला. सावली महामोर्चाचे आयोजन निषेध नोंदविण्यासाठी करण्यात आले होते. मोर्चाचा समारोप तहसीलदारांना निवेदन देवून करण्यात आला.यावेळी हजारोच्या संख्याने बौध्द बांधव उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.