Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गुरुवार, ऑगस्ट २३, २०१८
शुक्रवार, ऑगस्ट ०३, २०१८
मिशन शौर्य नंतर मिशन शक्ती सुरु;ब्रम्हपुरीचे दोन कराटेपटू जाणारॲथेन्सला
बुधवार, फेब्रुवारी २१, २०१८
कर्जाला कंटाळुन आणखी एका शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या
मंगळवार, जानेवारी २३, २०१८
अन पालिकेच्या व्हाट्सअप ग्रुपवर पॉर्न विडिओने उडवली खळबळ:पोलिसात तक्रार दाखल
सध्या सर्वत्र स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चे वारे वाहत आहेत प्रत्येक पालिका अहोरात्र मेहनत घेत आहे.आशतच ब्रम्हपुरी नगरपरिषद देखील कामाला लागली आहे . ब्रह्मपुरीला चांगला क्रमांक मिळून शहर स्वच्छ व सुंदर व्हावे, यासाठी नगरसेवकांनीही पालिका पदाधिकारी या नात्याने आपले कर्तव्य बजावावे, असा पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मानस आहे
गुरुवार, जानेवारी ११, २०१८
ब्रम्हपुरी महाविद्यालयीन निवडणुकीत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची बाजी
मंगळवार, जानेवारी ०२, २०१८
अनाथ मुलांच्या विकासासाठी सदैव तत्पर
- श्रीकांत पाटील अध्यक्ष, पारधी युवा जणक्ल्याण संस्था
शुक्रवार, डिसेंबर १५, २०१७
तंबाखूला राम राम
शनिवार, डिसेंबर ०९, २०१७
विकासापासुन अजूनही विदर्भ अपेक्षितच?
![]() |
| गोविंदराव भेँडारकर |
ब्रम्हपुरी- असमतोल दूर करायचा असेल, तर लहान राज्यांच्या निर्मितीचा विचार व्हायला हवा. महाराष्ट्राच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांत विदर्भाचा विकास किती प्रमाणात झाला याचा जर आढावा घेतला, तर विकासापासून अजूनही विदर्भ
उपेक्षितच आहे, हे ध्यानात येते. विकासाचा अनुशेष कमी न होता तो दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्व संपत्तीचे विपुल असलेल्या विदर्भामध्ये विकासाची गती मंद आहे. विदर्भात खनिज संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. एकट्या विदर्भात वीजनिर्मितीची चार केंद्रे आहेत.सोळा कोळसा खाण', धान्याचे कोठार , वनसंपत्ती भरपूर प्रमाणात आहेत असे असूनसुद्धा विदर्भाचा 50 वर्षांत विकास का झालेला नाही, याचाही विचार व्हायला हव.
राज्यकर्त्यांनी सदैव विदर्भावर अन्यायच केलेला आहे. विदर्भाला नेहमीच सापत्न वागणूक मिळते. विदर्भाच्या संपत्तीचा विदर्भात उपयोग न होता तो विदर्भाबाहेरच जास्त होतो. मोठे सिंचन प्रकल्प अजूनही आम्ही विदर्भात उभारू शकलेलो नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना सर्वस्वी निसर्गावर अवलंबून रहावे लागते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सरळ शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे व त्यांना हवी ती मदत मिळत नसल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडलेला आहे. आज सर्वांत जास्त आत्महत्या विदर्भात आहेत. खेड्यापाड्यांचा कायापालट अजूनही झालेला नाही. अनेक विदर्भाचे प्रकल्प अडून पडलेले आहेत. त्यामुळे विदर्भाच्या वाट्याला उपेक्षितांचे जिणे आलेले आहे.
विदर्भ वेगळा करण्यासाठी आजवर अनेक आंदोलने करण्यात आली, परंतु त्या आंदोलनांना यश प्राप्त झाले नाही. तसा प्रस्ताव देण्याचासुद्धा विचार सुरू आहे; परंतु राजकीय पक्षांचे एकमत होत नाही. विदर्भ वेगळा हवा की नको यासाठी आपली क्षमता चाचपडून पाहण्याची गरज आहे. आजवर ज्या प्रतिनिधींना आपण निवडून दिले, त्यांना जाब विचारण्याची ही वेळ आहे. विदर्भाचा अनुशेष वाढविण्यासाठी जबाबदार कोण? ज्यांच्यावर आपण इतकी वर्षे विश्वास टाकला त्यापैकी स्व.जांबुवंतराव विदर्भाचा मुद्दा शासन दरबारी लावून धरला पण ही ज्योत मावळली.आता त्यांचे अपुरे कार्य पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे.आता आपण निवडून दिलेल्या वैदर्भीय नेत्यांचा करंटेपणाच विदर्भाच्या मागासपणाला जबाबदार आहे. प. महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाचा विकास किती, याची आकडेवारी शासनाने जाहीर करावी. हे सिद्ध होते. परंतु या मागणीला उचलून का धरण्यात आले नाही? याचासुद्धा विचार व्हायला हवा. रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा नेता जांबुवंतरावांव्यतिरिक्त कोणीही नाही. इतर जे नेते विदर्भाचे तुणतुणे वाजवीत आहेत,का असा सवाल निर्माण होत आहे. अशी माहिती विदर्भवादी अँड गोविंदराव भेँडारकर यांनी दिली.
कर्जमाफी कधी होणार
मंगळवार, डिसेंबर ०५, २०१७
शालेय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव
ब्रम्हपुरी/शिक्षण विभाग पंचायत समिती ब्रम्हपुरी अंतर्गत अऱ्हेरनवरगांव बिटस्तरीय शालेय बालक्रिडा स्पर्धा व सांस्कृतीक महोत्सव साजरा करण्यात आला.शुक्रवार, डिसेंबर ०१, २०१७

ब्रम्हपुरी येथे स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी धरणे
सुधीर सेलोकर, अड. गोविंद भेंडारकर, डॉ. प्रेमलाल मेश्राम, सुदाम राठोड, हरिश्चंद्रजी चोले, विनोद झोडगे, हनुमंतराव राऊत अरविंद नागोसे, निकेश तोंडरे, सुखदेव प्रधान, विनायक रामटेके ,नामदेवराव गेडाम, डॉ.डी. मेश्राम, विनायक रामटेके, सुधाताई राऊत,लिनाताई जोगे, प्रतिभा लाडे, गीताताई मेश्राम उपस्थित होते.

ब्रम्हपुरी येथे ऑल इंडिया ओपन बुद्धिबळ स्पर्धा
ब्रम्हपुरी येथील होणारी विदर्भातील ही सर्वात मोठी मान्यता प्राप्त स्पर्धा असून या करीता प्रा. शुभाष बजाज यांचे अध्यक्षतेखाली स्वागत समिति तयार करण्यात आलेली आहे. नारायण राऊत बोकडे, प्राचार्य डॉ. देवीदासजी जगनाडे, डॉ. प्रेमलाल मेश्राम व अँड. गोविंदराव भेँडारकर हे स्वागत समिति चे अध्यक्ष आहेत.
या स्पर्धेत एक लाख पन्नास हजार रुपयांची रोख पारितोषीके असून प्रथम रोख पुरस्कार पंचवीस हजार रुपये आहे.याशिवाय साठ खेळाडून टॉफी पुरस्कार देण्यात येणार आहेत. सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे मुख्य आश्रयदाते श्री.मा.अशोक भैया, प्राध्यापक अतुलभाऊ देशकर , श्री.निलेश मोहोता, डॉ.खिजेंद्र गेडाम, डॉ.जी.एन.मेश्राम , श्री.शुभाषराव ठवरे, कादर मॅथ्थू निरप्पे ल, डॉ.लक्ष्मीकांत लाडुकर, श्री.पंचमजी आकरे , श्री.वसंतरावजी कावळे , श्री.रामावतार अग्रवाल, श्री शुभाष अग्रवाल, श्री.शरदराव उराडे , श्री.धनेशजी अग्रवाल, श्री.बंडुभाऊ बांगरे, श्री.राजेश जाजु, श्री रवि लोखंडे , श्री सूखदेव प्रधान , श्री.सारंगभाऊ बनपूरकर, प्रकाशभाऊ बगमारे, रंजना चोले.श्री.नंदुजी पिलारे , डॉ.माणिक खुने व डॉ.राजकुमार लोकरे हे आहेत. ब्रम्ह्पुरी तालुका बुद्धिबळ संघटनेचे सर्व सदस्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नाचे पराकाष्ठा करीत आहेत
गुरुवार, नोव्हेंबर ३०, २०१७
आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना जिल्हा कौन्सिलची बैठक
ब्रम्हपुरी - आज दि.२९/११/२०१७ रोजी चंद्रपूर येथील वीज विद्युत कामगार वर्कर फेडरेशन सोसायटी सभागृहात आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना जिला कोन्सिल ची बैठक झाली
संबधित संघटनेने आशा वर्कर व गटप्रवर्तक यानी दि.१८ डिसेंबर २०१७ ला नागपूर हिवाळी अधिवेशनवर आयोजित राज्यव्यापी आक्रोश मोर्चा तयारी सुरु करण्याची माहिती देण्यात आली असून संघटनेच्या वतीने जिला आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत मा.पंतप्रधान व मुखमंत्री याना निवेदन देऊन दि.७/१०/२०१७ च्या केंद्र सरकारने काढलेल्या शासकीय परीपत्रका नुसार एन.एच.एम. मधील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी ५% मानधन वाढ व 1५% बोनस लागू करण्यात आला आहे त्याचा लाभ आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना देण्यात यावा हि मागणी करण्यात आली,यावेळीजिल्हाभराती ल शेकडो आशा व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होते असे कॉ.श्री.विनोदजी झोडे यानी सांगितले.
आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना जिल्हा कौन्सिलची बैठक
ब्रम्हपुरी - आज दि.२९/११/२०१७ रोजी चंद्रपूर येथील वीज विद्युत कामगार वर्कर फेडरेशन सोसायटी सभागृहात आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना जिला कोन्सिल ची बैठक झाली
संबधित संघटनेने आशा वर्कर व गटप्रवर्तक यानी दि.१८ डिसेंबर २०१७ ला नागपूर हिवाळी अधिवेशनवर आयोजित राज्यव्यापी आक्रोश मोर्चा तयारी सुरु करण्याची माहिती देण्यात आली असून संघटनेच्या वतीने जिला आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत मा.पंतप्रधान व मुखमंत्री याना निवेदन देऊन दि.७/१०/२०१७ च्या केंद्र सरकारने काढलेल्या शासकीय परीपत्रका नुसार एन.एच.एम. मधील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी ५% मानधन वाढ व 1५% बोनस लागू करण्यात आला आहे त्याचा लाभ आशा वर्कर व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना देण्यात यावा हि मागणी करण्यात आली,यावेळीजिल्हाभराती ल शेकडो आशा व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होते असे कॉ.श्री.विनोदजी झोडे यानी सांगितले.
रविवार, नोव्हेंबर २६, २०१७
काव्यशिल्प न्युजच्या बातमीची दखल
ब्रम्हपूरी/ वार्ताहर : गुलाब ठाकरे
ब्रह्मपुरी येथील शिवाजी चौक ते मर्दान अली सिमेंट रस्ता ठरत आहे जीवघेणा या मथड्याखाली काव्यशिल्पने बातमी प्रकशित केली होती या बातमीची दखल ब्रम्हपुरी नगरपरिषदेने घेतली आहे. प्रा.सुयोगकुमार बाळबुधे शहराध्यक्ष आणि पदाधिकारी भा.ज.यू.मोर्चा यांच्या पाठपुरवठ्याला यश आले आहे.छत्रपती शिवाजी चौक ते सावरकर चौक ब्रम्ह्पुरी येथील सीमेंट रस्त्याला पूर्व कामाला नगरपरिषदेने मंजुरी दिली आहे.भा.ज.यु. मोर्चा पदाधिकारी यानी मुख्याधीकारी नगरपरिषद यांना निवेदन सादर केले या रस्त्यांविषयी माहिती मा.प्रा.सुयोगकुमार बाळबुधे शहराध्यक्ष भा.ज.युवा मोर्चा काव्यशिल्प न्यूज़ ला दिली १४/११/ २०१७ दिली असता. सदर वृत्त १५/११/२०१७ ला काव्यशिल्प न्यूज़ यांनी हे वृत्त प्रकाशित करुन नगरपरिषदे मुख्याधिकारी यांचे डोळे उघडून दिले. आणि त्या जीव घेणा सीमेंट रस्त्याच्याबांधकामाला मंजूरी प्रधान करुन काम सुरू केले.गुरुवार, नोव्हेंबर २३, २०१७
बरडकिन्हीं येथे जागतिक शौचालय दिवस
या जागतिक शौचालय दिवस साजरा करण्यासाठी ग्रा.पं.सरपंच सौ.लताताई गुरुदेव बगमारे ,उपसरपंच श्री.तुषारजी तलमले ,श्री.आर.एस नागुलवार ग्रामसचिव ,श्री.नानाजी बगमारे म.तं.मुक्त समिती अध्यक्ष , सौ.विध्याताई ठाकरे सदस्या , सौ.संगीताताई शेंडे सदस्या, श्रीमती अनिता गुरुनुले अंगणवाडी शिक्षिका, श्रीमती रंजना राऊत अंगणवाडी शिक्षिका,सौ.अनिता बोंडगुलवार अंगण.शिक्षिका ,श्रीमती सवीता दोनाडकर अंगण.शिक्षिका,दोनाडकर मदतनिस,सौ.शीतल प्रधान आशावर्कर ,संगीता सोंदरकर,सौ.सोनीताई राऊत आशावर्कर ,गुलाब राऊत गुलाब ठाकरे यांच्या उपस्थित जागतिक शौचालय दिवस साजरा करण्यात आले.
मार्गदर्शन म्हणून श्री.आर.एस.नागूलवार ग्रामसचिव यानी उघड्यावर शौच करू नये, हे अनेकवेळेला समजावून देखील अनेकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही, त्यासाठी सरकारी पातळीवर विविध जनजागृती मोहिमा राबविल्या जातात, तरी सुद्धा विशेष फरक खास करुन ग्रामीण खेडी भागात पडत नसल्यामुळे वैतागून वेगळ्या मार्गाने शौचालय बांधण्याचे महत्व ज्यात गावातील महिला उघड्यावर शौचास बसणारे यांच्यावर करडी नजर ठेवण्याची आणि घाण करणार नाही अशी शपथ घेण्यासाठी भाग पाडणे व स्वच्छतेच्या बाबतीत महिला जागरूक असल्यास आणि उघड्यावर शौचास जायला नकार देणारी भूमिका यांच्या विषयी शपथ घेतली. तर गावातील आणि घरातील पुरुष देखील महिलांच्या निर्धाराने त्याना सुद्धा स्वच्छतेचि शपथ घ्यायला भाग पाडणे अशी माहिती महिलाना देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला समाजाच्या सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सर्वाना माहिती आहे. त्यामुळे शासनानी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय लाभर्थ्याना शौचालय बांधून झाल्यानंतर त्या लाभार्थ्याना निधी ग्राम पंचायत द्वारे प्रधान करने त्यामुळे गाव निर्मल गाव होणार अशी उपाययोजना शासनानि केली ?त्याचाच फायदा बरडकिन्हीं येथील ग्राम पंचायत अंतर्गत या योजनेत भरघोस यश संपादक करुन गावात शौचालय बांधली.अशी माहिती शौचालय दिनी ग्रामसेवक आर.एस.नागुलवार यानी दिली.
श्रीकांत पारधी यांना ध्येयपूर्ती गौरव पुरस्कार
ब्रम्हपुरी : ७५ व्या ऑगस्ट क्रांती अमृतमहोत्सवनिमित्त्यानं मैत्री संस्था व सद्भावना संघ मुंबई च्या वतीने घेतलेल्या इंदिरा गांधी जन्मशताबकर्तृत्व गौरव पुरस्कार २०१७ मध्ये विविध क्षेत्रात काम करणारे महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्याचा गौरव सोहळा पार पडला. युवा जनकल्याण संस्था चे अध्यक्ष श्रीकांत पारधी यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्यामुळे त्यांना ध्येयपूर्ति गौरव पुरस्कार देण्यात आला.
यावेळी पद्यश्री कुमार केतकर (जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक), हुसेन शेख (सद्भावना संघ मुंबई), वर्षा विद्या विलास (नशाबंदी मंडळ मुंबई) व संयोजक सुरज भोईर (मैत्री संस्था अध्यक्ष) याच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
मंगळवार, नोव्हेंबर २१, २०१७

देवपायली येथे असंघटित महीला कामगारांची कार्यशाळा
गुलाब ठाकरे /ब्रम्हपुरी
दत्तोपंत ठेंगडी , राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास बोर्ड, नागपूर (श्रम व रोजगार मंत्रालय, केंद्र सरकार, नवी दिल्ली. ) आणि
स्व रूख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण संस्था , वर्धा
द्वारा ग्राम पंचायत देवपायली तालुका नागभिड येथे असंघटीत महीला कामगाराची मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली . सदर कार्यशाळेचे उद्घाटन देवपायली गटग्रामपंचायतचे सरपंच सौ.योगीता देशमुख, यांचे अध्यक्षतेखाली, व श्रीमती इंदीरा नवघडे , उपसरपंच गटग्रामपंचायत देवपायली यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी हरीश्चंद्र पाल सचिव , स्व रूख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण संस्था, तसेच प्रमोद रत्नपारखी, शिक्षणाधिकारी , श्रमिक शिक्षण बोर्ड , नागपूर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सौ़. शालू नवघडे, , प्रास्ताविक प्रमोद रत्नपारखी यांनी तर आभारप्रदर्शन सौ. अल्का चिंचोलकर यांनी केले . या वेळी हरीश्चंद्र पाल, श्रीमती नवघडे, योगीता देशमुख यानी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुस-या सत्रात हरीश्चंद्र पाल यांनी तंबाखुमूक्तीची गरज, महीला व्यसनांच्या आहारी गेल्या तर बिघडणारी कौटूंबिक परीस्थिती, आर्थीकतेचा होणारा अपव्य,तंबाखू सेवनाने होणारे विविध आजार , तंबाखू सेवनाचे विविध पद्धती, सेवनाचे प्रकार, कर्करोग होवू नये यासाठी घ्यावयाची काळजी या विषयावर चर्चात्मक व गिताचा आधाराने प्रशिक्षणार्थींना मंत्रमुग्ध केले. तसेच पहील्या सत्रात या कार्यशाळेची गरज आणि महत्व. असंघटीत कामगाराची होणारी पिळवणूक, नेट बँकीगची उपयुक्तता, ऑनलाईन व्यवहाराची गरज व फायदे अशा विषयांवर मार्गदर्शन केले. तर सौ शालू नवघडे हिने बचत गट काळाची गरज, बचत गटाचे फायदे, विविध व्यवसाय., देवपायली येथील बचतगटाची यशस्वीतता इ. विषयावर माहीती दिली. रोजगार हमी कायदा, व कामगाराचे हक्क आणि कर्तव्य, घरगुती व्यवसाय, कूषी विभागाची गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, यावर मार्गदर्शन केले. याशिवाय जिवनात यशस्वी होण्याकरीता वापरावयाची सप्तसुत्रे, 7 या अंकाच्या विकासात्मक खेळातून जिवनात संतर्कतेचे महत्व, जिवनाचा आनंद कसा घ्यावा, व शारीरिक दूष्टया तंदुरूस्ती कशी राखावी याचे प्रत्याक्षिक गाडी आली, गाडी आली रे, या कृती गितातून महीलांना देण्यात आले.
ग्रामीण भागात अशाप्रकारच्या कार्यशाळांचे नियमीत आयोजन झाले तर ग्रामीण महीला डीजीटल युगाच्या प्रवाहात हळूहळू सामील होतील व ग्रामीण महीला निर्भर होवून , त्यांचे सक्षमीकरण होईल असा आशावाद महीलांनी यावेळी व्यक्त केला.सदर कार्यशाळेला उपस्थित महीला कामगाराचे आर्थिक नुकसान होवू नये म्हणून प्रतीदिवस रू. 100/ प्रमाने केंद्र शासनाचे निर्देशानुसार ऑनलाईन भत्ता बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहीती रत्नपारखी यांनी दिली.

गोसीखुर्द चे पाणी पाईपलाइनद्वारे न सोडता कालव्याद्वारे सोडा
माजी सरपंच तथा शेतकरी गोपीनाथ मोरांडे
ब्रम्हपुरी(गुलाब ठाकरे/प्रतिनिधी)
ब्रम्हपूरी तालुक्यात असलेल्या चारही बाजूने अरण्याने वेढलेल्या बल्लारपुर येथील गोपीनाथजी मोरांडे यानी सांगितलेल्या गोसीखुर्द चे पाणी पाईपलाइन द्वारे न सोडता कालव्या द्वारे सोडण्यात यावे अशी शिफारस केली आहे.
गोसीखुर्द कालव्याच काम जवळ पास पूर्ण झालेले आहे.लहान कालवे तयार करुन शेतकऱ्यांना लहान कालव्याद्वारे(पाटाने ) शेतीला पाणि दिल जाते.पण ज्या शेतकऱ्यांना लहान कालव्याद्वारे पाणी होऊ शकत नाही ते शेतकरी आईल इंजिन ,किवा इलेक्ट्रिक साधन (मोटर पंप )या साधनामुळे शेती पीकवली जात असून गुरे ढोरे ,पशु पक्षी इतर प्राणी याना सुद्धा लहान कालव्याच्या सहायाने खुलेआम पाणी उपयोग करीत आहे हे निर्विवाद आहे.पण असे ऐकण्यात आले असून की ज्यां शेतकऱ्यांना पाणी होत नाही त्या शेतकऱ्यांना शेतीतुन तीन फूट खोलीत टाकलेल्या पाईपलाइन द्वारे शेतीला पाणी देण्यात येणार आहे अशी चर्चा परिसरात होत असून शेती ही चढ़ उतार असल्यामुळे शेतीला पाणी होऊ शकत नाही त्या मुळे गोसीखुर्द चे पाणी लहान कालव्याच्य सहायानेच पाणी शेतीला पुरविणे योग्य आहे असे शेतकरी यांची मत आहे.कोणत्याही मंत्री महोदयाना हे कळत नाही की सर्व जीव जंतूनाप्राणी मात्राणा भरपूर पाण्याचा आस्वाद हा कालव्याद्वारे घेता येत होते ते पाणी खोका असलेल्या इंजीनियर च्य डोक्यामुळे हा आनंद शेतकरी ,प्राणी जीवजंतु याना या पाईपलाइन द्वारे घेता येत नाही त्यामुळे गोसीखुर्द चे पाणी पाटानेच शेतीला देण्यात यावे असे मत शेतकरी गोपीनाथजी मोरांडे माजी सरपंच यानी सांगितले आहे.
बुधवार, नोव्हेंबर १५, २०१७
ब्रह्मपुरी येथील शिवाजी चौक ते मर्दान अली सिमेंट रस्ता ठरत आहे जीवघेणा
ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:
ब्रम्ह्पुरी येथील शिवाजी चौक तें मर्दान अली या सीमेंट रस्त्यांची दूरावस्था झाली असून अपघाताच प्रमाण वाढले आहे त्या रस्त्याच्या संदर्भात मा.मुख्याधिकारी न.प.ब्रम्हपुरी यांना निवेदन देण्यात आले.
सदर रस्त्यांच बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाले त्यामुळे रस्त्याला खूप असॆ खड्डे पडलेली आहेत अशी माहिती खासदार मा.अशोक नेते यानी मागील महिन्याच्या आढावा बैठकीत नगरपरिषददेंला आदेश देण्यात आले होते. सदर रस्त्यांच काम दिवाळी नंतर सुरू करू असॆ आश्वासन नगर परिषद तर्फे मा.खासदार साहेबाना देण्यात आले होतें.परंतु दिवाळी लोटूनही एक महीना होत आला तरी नगर परिषद तर्फे कामाला सुरुवात झालेली नाही.
सदर रस्त्याच काम तात्काळ करण्यात यावे त्या साठी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री.परेश शहादाणी ,भा.ज.यु.मो.ब्रम्हपुरी शहराध्यक्ष प्रा.सुयोगकुमार बाळबुद्दें,शहर महामंत्री श्री.रितेश दशमवार ,शहर महामंत्री स्वप्नील अलगदेवे ,शहर सचिव श्री.दत्ता येरवार यानी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.तात्काळ या रस्त्याच काम न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा ब्रम्हपुरी वासिय जनता आणि भा.ज.यु.मो.यांच्या वतीने नगर परिषद ला माहिती देण्यात आली.



