Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, नोव्हेंबर २१, २०१७

देवपायली येथे असंघटित महीला कामगारांची कार्यशाळा

गुलाब ठाकरे /ब्रम्हपुरी
दत्तोपंत ठेंगडी , राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास बोर्ड, नागपूर (श्रम व रोजगार मंत्रालय,  केंद्र सरकार, नवी दिल्ली. ) आणि
स्व रूख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण संस्था , वर्धा
द्वारा ग्राम पंचायत देवपायली तालुका नागभिड येथे असंघटीत महीला कामगाराची मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली . सदर कार्यशाळेचे उद्घाटन देवपायली गटग्रामपंचायतचे सरपंच सौ.योगीता  देशमुख, यांचे अध्यक्षतेखाली, व श्रीमती इंदीरा नवघडे , उपसरपंच गटग्रामपंचायत देवपायली यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी हरीश्चंद्र पाल सचिव , स्व रूख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण संस्था, तसेच प्रमोद रत्नपारखी, शिक्षणाधिकारी , श्रमिक शिक्षण बोर्ड , नागपूर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सौ़. शालू नवघडे,  , प्रास्ताविक प्रमोद रत्नपारखी यांनी तर आभारप्रदर्शन सौ. अल्का चिंचोलकर यांनी केले . या वेळी हरीश्चंद्र पाल, श्रीमती नवघडे, योगीता देशमुख यानी समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुस-या सत्रात हरीश्चंद्र पाल यांनी तंबाखुमूक्तीची गरज, महीला व्यसनांच्या आहारी गेल्या तर बिघडणारी कौटूंबिक परीस्थिती, आर्थीकतेचा होणारा अपव्य,तंबाखू सेवनाने होणारे विविध आजार , तंबाखू सेवनाचे विविध पद्धती, सेवनाचे प्रकार, कर्करोग होवू नये यासाठी घ्यावयाची काळजी या विषयावर चर्चात्मक व गिताचा आधाराने प्रशिक्षणार्थींना मंत्रमुग्ध केले. तसेच पहील्या सत्रात या कार्यशाळेची गरज आणि महत्व. असंघटीत कामगाराची होणारी पिळवणूक, नेट बँकीगची उपयुक्तता, ऑनलाईन व्यवहाराची गरज व फायदे  अशा विषयांवर मार्गदर्शन केले. तर सौ शालू नवघडे हिने बचत गट काळाची गरज, बचत गटाचे फायदे, विविध व्यवसाय., देवपायली येथील बचतगटाची यशस्वीतता इ. विषयावर माहीती दिली. रोजगार हमी कायदा, व कामगाराचे हक्क आणि कर्तव्य, घरगुती व्यवसाय, कूषी विभागाची गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, यावर मार्गदर्शन केले. याशिवाय जिवनात यशस्वी होण्याकरीता वापरावयाची सप्तसुत्रे, 7 या अंकाच्या विकासात्मक खेळातून जिवनात संतर्कतेचे महत्व,  जिवनाचा आनंद कसा घ्यावा, व शारीरिक दूष्टया तंदुरूस्ती कशी राखावी याचे प्रत्याक्षिक गाडी आली, गाडी आली रे, या कृती गितातून महीलांना देण्यात आले.
       ग्रामीण भागात अशाप्रकारच्या कार्यशाळांचे नियमीत आयोजन झाले तर ग्रामीण महीला डीजीटल युगाच्या प्रवाहात हळूहळू सामील होतील व ग्रामीण महीला निर्भर होवून , त्यांचे सक्षमीकरण होईल असा आशावाद महीलांनी यावेळी व्यक्त केला.सदर कार्यशाळेला उपस्थित महीला कामगाराचे आर्थिक नुकसान होवू नये म्हणून प्रतीदिवस रू. 100/ प्रमाने केंद्र शासनाचे निर्देशानुसार ऑनलाईन भत्ता बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहीती रत्नपारखी यांनी दिली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.