Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर २३, २०१७

बरडकिन्हीं येथे जागतिक शौचालय दिवस

ब्रम्ह्पुरी - ब्रम्हपुरी तालुक्यातील  बरडकिन्ही ग्राम.पंचायत कार्यालय येथे जागतिक शौचालय दिवस साजरा करण्यात आला.
या जागतिक शौचालय दिवस साजरा करण्यासाठी ग्रा.पं.सरपंच सौ.लताताई गुरुदेव बगमारे ,उपसरपंच श्री.तुषारजी तलमले ,श्री.आर.एस नागुलवार ग्रामसचिव ,श्री.नानाजी बगमारे म.तं.मुक्त समिती अध्यक्ष , सौ.विध्याताई ठाकरे सदस्या , सौ.संगीताताई  शेंडे सदस्या, श्रीमती अनिता गुरुनुले अंगणवाडी शिक्षिका, श्रीमती रंजना राऊत अंगणवाडी शिक्षिका,सौ.अनिता बोंडगुलवार अंगण.शिक्षिका ,श्रीमती सवीता दोनाडकर अंगण.शिक्षिका,दोनाडकर मदतनिस,सौ.शीतल प्रधान आशावर्कर ,संगीता सोंदरकर,सौ.सोनीताई राऊत आशावर्कर ,गुलाब राऊत गुलाब ठाकरे यांच्या उपस्थित जागतिक शौचालय दिवस साजरा करण्यात आले.
मार्गदर्शन म्हणून  श्री.आर.एस.नागूलवार ग्रामसचिव यानी  उघड्यावर शौच करू नये, हे अनेकवेळेला समजावून देखील अनेकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही, त्यासाठी सरकारी पातळीवर विविध जनजागृती मोहिमा राबविल्या जातात, तरी सुद्धा विशेष फरक खास करुन ग्रामीण खेडी भागात पडत नसल्यामुळे वैतागून वेगळ्या मार्गाने शौचालय बांधण्याचे महत्व  ज्यात गावातील महिला उघड्यावर शौचास बसणारे यांच्यावर करडी नजर ठेवण्याची आणि घाण करणार नाही अशी शपथ घेण्यासाठी भाग पाडणे व स्वच्छतेच्या बाबतीत महिला जागरूक असल्यास आणि उघड्यावर शौचास जायला नकार देणारी भूमिका यांच्या विषयी  शपथ  घेतली. तर गावातील आणि घरातील पुरुष देखील महिलांच्या निर्धाराने त्याना सुद्धा स्वच्छतेचि शपथ घ्यायला भाग पाडणे अशी माहिती महिलाना देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला समाजाच्या सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सर्वाना माहिती आहे. त्यामुळे शासनानी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय लाभर्थ्याना शौचालय बांधून झाल्यानंतर त्या लाभार्थ्याना निधी ग्राम पंचायत द्वारे प्रधान करने त्यामुळे गाव निर्मल गाव होणार अशी उपाययोजना शासनानि केली ?त्याचाच फायदा बरडकिन्हीं येथील ग्राम पंचायत अंतर्गत या योजनेत भरघोस यश संपादक करुन गावात शौचालय बांधली.अशी माहिती शौचालय दिनी ग्रामसेवक आर.एस.नागुलवार यानी दिली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.