Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

नागपूर mahavitaran लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नागपूर mahavitaran लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ऑगस्ट ०५, २०२३

गो-ग्रीन सेवेचा पर्याय स्वीकारत नागपूर जिल्ह्यातील वीजग्राहकांनी केली 18 लाखांपेक्षा अधिकची बचत

गो-ग्रीन सेवेचा पर्याय स्वीकारत नागपूर जिल्ह्यातील वीजग्राहकांनी केली 18 लाखांपेक्षा अधिकची बचत

नागपूर: 
नागपूर जिल्ह्यांतील 15 हजार 17 पर्यावरण स्नेही ग्राहकांनी छापील वीजबिलांना नकार देत महावितरणच्या गो-ग्रीन सेवेचा लाभ घेतला आहे. या ग्राहकांनी वीज बिलासाठी ई- मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महिन्याला प्रत्येक वीज बिलामागे 10 रूपयाची तर, वर्षाला 120 रूपयाची सूट देण्यात येते. गो-ग्रीन सेवेचा पर्याय स्वीकारणा-या नागपूर जिल्ह्यातील वीजग्राहकांनी वर्षभरात तब्बल 18 लाखांपेक्षा अधिकची बचत केली आहे.

पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी महावितरणकडून पर्यावरणपूरक गो ग्रीन योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वीज बिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय देण्यात येतो. महावितरणच्या गो-ग्रीन या पर्यावरणपूरक सेवेसाठी प्रोत्साहन म्हणून ग्राहकांना प्रती मासिक बिलात दहा रुपये सवलत देण्यात येते म्हणजेच ग्राहकाची वीजबिलात वार्षिक एकशे वीस रुपयांची बचत होते. वीज बिल तयार झाल्यानंतर लगेचच ई-मेल तसेच एसएमएसद्वारे दरमहा वीज बिल प्राप्त होणार असल्याने वीज ग्राहकांनी बील मिळताच मुदतीपूर्वी वीजबिलाचा भरणा केला तर त्यांना प्रॉम्प्ट पेमेंटसाठी अर्थात तत्पर बिल भरणा केल्याबद्दल एक टक्का सवलत मिळते.याशिवाय हे बिल भीम ॲप, गुगल पे, पेटीएम यासारख्या युपीआय किंवा बँकेच्या ॲपवरून किंवा महावितरणच्या वेबसाईटवरून असे ऑनलाईन पद्धतीने भरले तर पाव टक्का सवलत देखील मिळते.

बिलाच्या रंगीत प्रिंटची ही सोय
वीज ग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेल द्वारे प्राप्त झालेले दर महिन्याचे वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपी मध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू महिन्याचे वीज बिल मूळ स्वरुपात उपलब्ध असते. आवश्यकतेप्रमाणे वीज ग्राहकांना ते डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट घेण्याची सोय आहे.

'गो ग्रीन' होण्यासाठी काय करावे?

महावितरण गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जी. जी. एन या 15 अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरण मोबाइल अॅपद्वारे किंवा संकेत स्थळाच्या https://billing. mahadiscom.in/gogreen.php लिंक वर जाऊन करावी लागणार आहे. याबाबतची अधिक माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

गुरुवार, जुलै २७, २०२३

 पाच हजारावरील वीजबिलांचा रोखीने भरणा करण्यास निर्बंध

पाच हजारावरील वीजबिलांचा रोखीने भरणा करण्यास निर्बंध

नागपूर :
 महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दि. 31 मार्च 2023 रोजी दिलेल्या आदेशान्वये लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना वीज बिल रोखीने भरण्याची कमाल मर्यादा पाच हजार तर लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना ही मर्यादा दहा हजार रुपये करण्यात आली आहे. त्यावरील रकमेच्या वीज बिलांचा रोखीने भरणा करण्यास निर्बंध लागू करण्यात आले आहे. हे निर्बंध दि. 1 ऑगस्ट 2023 पासून लागू करण्यात येणार असून त्यानंतर कुठल्याही वीज ग्राहकाने या मर्यादेपलीकडील वीजबिलांचा भरणा केवळ ‘ऑनलाईन’ पद्धतीनेच करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

विनामर्यादा वीज देयकाचा भरणा करण्यासाठी ग्राहक ‘ऑनलाईन’ पध्दतीने महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केंव्हाही व कुठूनही करु शकतो. सदर पध्दत अत्यंत सुरक्षित असून, ‘ऑनलाईन’ वीजबिल भरल्यास दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये 0.25 टक्के (जास्तीत जास्त 500 रुपये) तर वीजबिलाचे प्रॉम्प्ट पेमेंट केल्यास 1 टक्का असे एकूण 1.25 टक्के सुट वीजग्राहकांना देण्यात येते. विशेष म्हणजे क्रेडिट कार्ड वगळता उर्वरीत सर्व पर्यायांव्दारे ऑनलाईन पद्धतीने होणारा वीजबिलाचा भरणा निःशुल्क आहे. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. लघुदाब ग्राहकांसाठी घरबसल्या एका क्लिकवर वीजबिल भरण्याची सुरक्षित व सोयीची ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे. ऑनलाइनव्दारे वीजबिलांचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून या पद्धतीस भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा 2077 च्या तरतुदी असल्याने

पाच हजारापेक्षा अधिक रकमेचे वीजबिल रोखीने स्विकारण्यात येऊ नये अशा आशयाच्या सुचना सर्व वीज भरणा केंद्र, जिल्हा सहकारी बॅंकांना, सहकारी संस्था व पतपेढ़ी यांना महावितरणकडून देण्यात येत असून ग्राहकांनी देखील आपले वीजबिल ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

रविवार, जुलै २३, २०२३

  सौर ऊर्जा निर्मितीला ग्राहकांचा पसंती;नागपुरात16 हजारावर ग्राहक करीत आहेत सौर ऊर्जा निर्मिती

सौर ऊर्जा निर्मितीला ग्राहकांचा पसंती;नागपुरात16 हजारावर ग्राहक करीत आहेत सौर ऊर्जा निर्मिती

नागपूर: 
घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला विकायची या रूफटॉप सोलर योजनेला महावितरणच्या ग्राहकांची वाढती पसंती मिळत असून त्यांची नागपूर जिल्हातील संख्या तब्बल 16 हजार 192 झाली आहे. व त्यांच्याकडून एकूण 172 मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती क्षमता गाठली गेली आहे.

सौर ऊर्जा निर्मितीसाठी रूफटॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठे प्रकल्प क्षमतेनुसार 20 ते 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीज वापरामुळे ग्राहकाच्या वीजबिलात मोठी कपात होते. याशिवाय या प्रकल्पामध्ये गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणला दिली जाते व त्याची नोंद नेट मिटरिंग द्वारे ठेवली जाते. सौर ऊर्जा निर्मितीपेक्षा जर अधिक विजेची गरज पडली तर ती महावितरणकडून घेतली जाते.

ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी महावितरण मदत करते. महावितरणच्या www.mahadiscom.in/ismart या संकेतस्थळावर याची संपूर्ण माहिती देण्यात असून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा आहे. सोबतच छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी 20 ते 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. महावितरणकडे नोंदणीकृत एजन्सीमार्फत प्रकल्प बसविले जातात. महावितरण प्रकल्पाच्या मंजुरीपासून तपासणी व अंतिम मंजुरीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मदत करते, सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो. सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांना आर्थिक लाभ होतो. यामुळे ही योजना लोकप्रिय होत असून अधिकाधिक वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवावेत, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

शुक्रवार, जुलै २९, २०२२

महावितरणच्या ३९ हजार ६०२ कोटींच्या सुधारित वितरण योजनेला राज्य शासनाची मंजुरी

महावितरणच्या ३९ हजार ६०२ कोटींच्या सुधारित वितरण योजनेला राज्य शासनाची मंजुरी


मुंबई:
भविष्यातील वाढणारी विजेची मागणी व त्याची पूर्तता करण्यासाठी सध्याच्या वीज वितरण प्रणालीचे आणखी सक्षमीकरण व आधुनिकीकरणाची गरज लक्षात घेऊन  वीजपुरवठ्याची गुणवत्ता व ग्राहकसेवा अधिक दर्जेदार करणे व  वीजहानी कमी करण्यासाठी ३९ हजार ६०२ कोटींच्या महावितरणच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी प्रदान केली आहे.

राज्यातील वीज वितरण कंपन्यांची कार्यक्षमता वृध्दींगत करून आर्थिक स्थिरता सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक सहाय्याने सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) राबविण्यात येणार असून या योजनेमुळे महावितरणच्या वीज वितरण प्रणालीमध्ये आमुलाग्र बदल घडून येणार आहे. सशर्त आर्थिक सहाय्याद्वारे आर्थिक स्थिरता व परिचालन कार्यक्षमतेत सुधारणे करणे, वीज वितरण पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, वीजपुरवठ्याची गुणवत्ता व उपलब्धता यात सुधारणा करणे, स्मार्ट मिटरिंग करून ऊर्जा अंकेक्षणावर भर देणे आणि वीजहानी कमी करण्याच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे अशी वैशिष्टे या योजनेची आहेत.

महावितरणच्या ग्राहकांना दर्जेदार, विश्वासार्ह व वाजवी किंमतीचा वीजपुरवठा करणे, आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंत तांत्रिक व वाणिज्यिक हानी १२ ते १५ टक्क्यापर्यंत कमी करणे व आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंत सरासरी प्रति युनिट वीजपुरवठ्यावर होणारा खर्च  व त्यापोटी सरासरी प्रति युनिट मिळणारा महसूल यातील तफावत शुन्यावर आणणे असे या योजनेची प्रमुख उद्दीष्टे आहेत.

या योजनेत एक कोटी ६६ लाख ग्राहकांकडे स्मार्ट मिटर बसविण्यात येणार असून यावर सुमारे ११ हजार १०५ कोटी रूपये खर्च होणार आहे. वितरण हानी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून यावर सुमारे १४ हजार  २३१ कोटी रुपये खर्च होणार आहे. यात राज्यात विविध ठिकाणी ५२७ नवीन ३३/११ किव्हो उपकेंद्र उभारणे, ७०५ उपकेंद्रांची क्षमतावाढ करणे, सुमारे २९ हजार ८९३ नवीन वितरण रोहित्रे बसविणे व राज्यातील २१ शहरांमध्ये स्काडा प्रणालीचा विकास करणे इत्यादी कामांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण व आधुनिकीकरणावर सुमारे १४ हजार २६६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. 
 
या योजनेमध्ये ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात येणार असल्यामुळे ग्राहकांना अचूक वीजबिल मिळणार असून परिणामी महावितरणची वीजहानी कमी होऊन महसुलात वाढ होईल. तसेच या योजनेमुळे ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करणे सोयीचे होईल. या योजनेच्या मंजुरीकरिता राज्याचे प्रधान सचिव (ऊर्जा) तथा महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री विजय सिंघल यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

Mumbai:Keeping in mind the need for further empowerment and modernization of the current electricity distribution system to meet the increasing demand of electricity in the future, the state government has recently approved the Revamped Distribution Sector Scheme(RDSS) of about 39 thousand 602 crore to improve the quality of electricity supply, reduce distribution losses and enhance consumer service.

In order to improve the financial stability of the power distribution companies in the state, the RDSS will be implemented with the financial assistance of the Central Government. Due to this scheme, there will be a radical change in the power distribution system of MSEDCL. Features of the scheme are to improve financial stability and operational efficiency through conditional financial assistance, strengthen basic distribution infrastructure, improve quality and availability of power supply, focus on energy audit through smart metering and provide funds for power loss reduction works.

To provide quality, reliable and affordable power supply to the consumers of MSEDCL, to reduce technical and commercial losses to 12 to 15 percent by FY 2024-25 and to bring to zero the gap between the average cost per unit of electricity supply and the average revenue per unit by FY 2024-25. These are the main objectives of this scheme.

In the scheme smart meters will be installed to 1 crore 66 lakh consumers and about Rs 11 thousand 105 crore will be spent on this. Special efforts will be made to reduce the distribution losses and about Rs. 14 thousand 231 crore will be spent on this. This includes construction of 527 new 33/11 KV sub-stations at various places in the state, capacity enhancement of 705 sub-stations, installation of about 29 thousand 893 new distribution transformers and development of SCADA system in 21 cities of the state etc. Similarly, about 14 thousand 266 crore will be spent on empowerment and modernization of power distribution system.

As smart meters will be installed in this scheme, the customers will get accurate electricity bills and as a result, distribution loss will reduce and increase revenue. Also, due to this scheme, uninterrupted and quality power supply will be supplied to the customers. Special efforts have been made by Mr. Vijay Singhal, Chairman and Managing Director of MSEDCL under the guidance of Principal Secretary (Energy) of the State and Chairman and Managing Director of MSETCL Mr. Dinesh Waghmare for the approval of this scheme.

शनिवार, जुलै ०९, २०२२

 नागपूर परिमंडळात महावितरणची मोहीम:तीन दिवसांत ३७७ वीज चोरांवर कारवाई

नागपूर परिमंडळात महावितरणची मोहीम:तीन दिवसांत ३७७ वीज चोरांवर कारवाई

नागपूर:
महावितरणच्या नागपूर परिमंडळात गेल्या तीन दिवसांत वीजचोरी करणाऱ्या ३७७ जणांविरोधात कारवई करण्यात आली. ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा महावितरणचा दावा आहे. महावितरणने ५ जुलै ते ७ जुलैदरम्यान नागपूर शहर मंडळात आकडे टाकणाऱ्या अथवा अवैधरित्या वीज वापरणाऱ्या २०० जणांविरुद्ध कारवाई केली.

उपराजधानीतील सिव्हिल लाईन्स विभागातील ताजनगर, समतानगर, कामगार नगर, इंदोरा, लुंबिनीनगर, शिवनगर, वांजरा या परिसरात तर नंदनवन उपविभागातील हसनबाग, जुनी शुक्रवारी, एस.टी. स्टँड परिसर आणि मॉडेल मिल चाळ येथेही वीज चोरी पकडली गेली.

 गांधीबाग व महाल विभागात प्रत्येको ५५ वीजचोऱ्या पकडल्या, नागपूर ग्रामीणमध्येही वीजचोरी करणाऱ्या १४९ जणांविरुद्ध कारवाई केली गेली, वर्धा जिल्ह्यात ३७ वीज चोरांवर तर उमरेड विभागात ६४ जणांवर कारवाई झाली.

मंगळवार, मे १७, २०२२

बेलतरोडी अग्नितांडवातील पीडितांना द डिवाईन ग्रुप कडून 15 ताडपत्री भेट

बेलतरोडी अग्नितांडवातील पीडितांना द डिवाईन ग्रुप कडून 15 ताडपत्री भेट

नागपूर:
गेल्या आठवडयात बेलतरोडी परिसरातील महाकाली नगर झोपडपट्टीला सिलिंडरच्या विस्फोटातील भिषण आगीत शेकडो झोपडया भक्ष्यस्थानी झाल्याने हजारो नागरिक उघडयावर पडले. सोमवारी महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांची 2566 वी जयंतीचे औचित्य साधून दुर्देवी अग्निकांडातील पीडितांसाठी मदतीचा हात म्हणून ‘द डिवाईन ग्रुप‘चे संयोजक व जेसीआय नागपूर सेंट्रलचे उपाध्यक्ष अश्विन धनविजय यांनी 15 ताडपत्री भेट (टारपोलीन) धम्मदानाचा अभिनव उपक्रम हाती घेतला.

 ‘द डिवाईन ग्रुप‘चे संयोजक अश्विन धनविजय यांच्या मार्गदर्शनात रमन कलवले, अॅनोष थाॅमस यांनी ताडपत्रीला लागणारे इतर साहित्य वाटप करण्यात आले.तसेच या अग्नितांडवात नुकासनग्रस्ताना पुढेही मदत म्हणून मुलांना शैक्षिणीक साहित्य देण्यात निर्धार ‘द डिवाईन ग्रुप‘ व जेसीआय नागपूर सेंट्रल तर्फे करण्यात आले आहे. याप्रसंगी जेसीआय नागपूर अध्यक्ष प्रिया आचार्य, सचिव आदिती पाॅल, श्रीरंग नेने, अनुज माथूर, मयुरी मेहेरे, दत्ता सुरर्वसे, कमलेश सिरसीकर, ‘द डिवाईन ग्रुप‘चे पीयूष कांबळे, अक्षय वनकर, आदिंची उपस्थिती होती.

सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१

 राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा सुरु | mahavitaran MSEB

राज्यातील ८६ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा सुरु | mahavitaran MSEB



वीजबिलांतून मुक्तता; शून्य देखभाल खर्च


नागपूर, दि. ०२ ऑगस्ट २०२१: शेतकरी बांधवांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून गती देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील ८५ हजार ९६३ शेतकऱ्यांकडे तीन, पाच व ७.५ अश्वशक्तीचे सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. या सर्व शेतकऱ्यांना दिवसा विनाव्यत्यय वीजपुरवठा उपलब्ध झाला असून वीजबिलांतून देखील मुक्तता झाली आहे. 


राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्यांसाठी स्वतंत्र कृषिपंप वीजजोडणी धोरणाद्वारे मोठा वेग दिला आहे. यात प्रामुख्याने कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सौर कृषिपंप योजनेचा समावेश आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी देखील या योजनेचा आढावा घेत विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहे. 


पारंपरिक पद्धतीने कृषिपंपाची वीजजोडणी न झालेले व महावितरणकडे वीजजोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून पारेषणविरहित नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहे. तसेच अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी सौर कृषिपंपाच्या आधारभूत किंमतीपैकी सर्वसाधारण गटासाठी १० टक्के तर अनुसूचित जाती/जमाती गटातील शेतकऱ्यांसाठी ५ टक्के लाभार्थी हिस्सा आहे.


मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत एक लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातून आतापर्यंत २ लाख ४० हजार ६१७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ९७ हजार ९ लाभार्थ्यांनी मागणी पत्राचा (डिमांड नोट) भरणा केला आहे तर ९६ हजार १९१ लाभार्थ्यांनी स्वतः निवडसूचीतील संबंधीत पुरवठादारांची निवड केली आहे. त्यातील ८५ हजार ९६३ सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत. यामध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागात ४६ हजार ७००, नागपूर प्रादेशिक विभाग- २० हजार १९९, कोकण प्रादेशिक विभाग- १३ हजार ९१ आणि पुणे प्रादेशिक विभागामध्ये ५ हजार ९७३ सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत. तर आवश्यक कागदपत्र जोडलेले नसणे, स्थळ तपासणीनंतर कृषिपंपाची वीजजोडणी आढळून येणे, जलस्त्रोत नसणे, विहीर किंवा कूपनलिका ६० मीटरपेक्षा खोल असणे तसेच डिमांड नोट दिल्यानंतरही लाभार्थी हिस्सा न भरणे आदी कारणांमुळे १ लाख २४ हजार ६९२ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. 


वीजयंत्रणेचे जाळे नसल्यामुळे व पारेषणविरहित असल्याने सौर कृषिपंपांद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. यासोबतच शेतकऱ्यांची वीजबिलातून मुक्तता झाली आहे. आस्थापित करण्यात आलेल्या सौर कृषिपंपासाठी ५ वर्ष व पॅनेलसाठी १० वर्षांचा हमी कालावधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखभालीचा खर्च देखील शून्य आहे. या योजनेची सर्व माहिती महावितरणच्या https://www.mahadiscom.in/solar/ या स्वतंत्र पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जाची सद्यस्थिती ऑनलाईन उपलब्ध आहे तसेच प्रत्येक टप्प्यावर त्याबाबत अर्जदारांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येत आहे. 

गुरुवार, जुलै २९, २०२१

 महावितरणच्या अभियंत्यांवर हल्ला, आरोपीस अटक |

महावितरणच्या अभियंत्यांवर हल्ला, आरोपीस अटक |


वर्धा, दिनांक २९ जुलै २०२१-
वापरलेल्या वीज देयकाचे पैसे मागील चार महिन्यापासून न भरणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील, सेलू येथील वीज ग्राहकाने महावितरणच्या शाखा अभियंत्यास शिवीगाळ करून मारहाण करण्याची घटना बुधवार दिनांक २८ जुलै रोजी घडली. सिंदी पोलिसांनी हल्लेखोर आरोपीस अटक केली आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फरहान सय्यद राहणार खडकी ता सेलू या वीज ग्राहकाने मार्च-२०२१ पासून वीज देयकाचे पैसे भरले नव्हते. महावितरणकडून वीज ग्राहकास वारंवार आवाहन करूनही वीज ग्राहक फरहान सय्यद प्रतिसाद देत नसल्याने महावितरणच्या केळझर येथील शाखा अभियंता धम्मदीप जिवतोडे यांनी आपले कर्मचारी घेऊन वीज पुरवठा करण्यासाठी पोहचले. दरम्यान आरोपी वीज ग्राहकाने शाखा अभियंता धम्मदीप जिवतोडे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे वर्धा येथील कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे आणि सेलू उप विभागाचे उपकार्यकारी अभियंता घटनास्थळी पोहचले.

सदर मारहाण घटनेप्रकरणी महावितरणकडून आक्रमक भूमिका घेत सिंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. महावितरणकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी वीज ग्राहक फरहान सय्यद याच्या विरोधात भादंवि ३५३,३३२,१८६, २९४,५०४,५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस तात्काळ अटक केली.

आठवडाभरात वर्धा जिल्ह्यात दुसऱ्यांदा महावितरणचा शाखा अभियंत्यांवर हल्ला करून मारहाणीची घटना घडली आहे. महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करणे हा गंभीर गुन्हा असून गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीस कारावास झाल्याच्या घटना या अगोदर घडल्या आहेत.मागील आठवड्यात वर्धा शहरातील हनुमान नगरातील तीवारी कुटुंबातील पाच सदस्यांनी महावितरणचे शाखा अभियंता सचिन उईके यांच्यावर हल्ला करून मारहाण केली होती. न्यायालयाने देखील घटनेचे गाम्भीर्य लक्ष्यात घेऊन आरोपीना अद्याप जमीन मंजूर केला नाही.


Mahavitaran

बिल थकविणे पडले महागात:२७ दिवसात महावितरणने कापली १०२८२ ठिकाणची वीज

बिल थकविणे पडले महागात:२७ दिवसात महावितरणने कापली १०२८२ ठिकाणची वीज


महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, धमकावणे पडेल महागात
जुलै महिन्यात १० हजार २८२ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित
नागपूर (खबरबात):  
वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न देता काही ठिकाणी वीज ग्राहक महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ले करणे, धमकावणे, शिविगाळ करणे या सारखे प्रकार वाढू लागले आहेत . महावितरणला असे कृत्य करणाऱ्या वीज ग्राहकांच्या विरोधात नाईलाजाने पोलीसात तक्रार करावी लागते.त्यामुळे अशा ग्राहकाचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला कारावास होऊ शकतो. नुकत्याच वर्धा येथील एक प्रकरणात मारहाण करणाऱ्या ग्राहकांना पोलिसद कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी वीज भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.दरम्यान जुलै महिन्यात महावितरणने १० हजार २८२ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यापैकी ७ हजार २१ ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी आणि नव्याने वीज जोडणीचे निर्धारित शुल्क भरून आपला वीज पुरवठा सुरु केला आहे.

महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे हा दंडनीय अपराध आहे.भादवि कलम ३५३ नुसार शासकीय कामात अडथळा आणणे,माराहाण केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीस २ वर्षाची कारावासाची शिक्षा होऊ शकते.तर कलाम ३३२ नुसार शासकीय कामकाजात अडथळा आणणे तसेच इजा होईल अशी मारहाण करणे या गुन्ह्यांचा समावेश असून त्याअंतर्गत ३ वर्ष व त्यापेक्षा अधिक अशा शिक्षेची तरतूद आहे. अनेकदा वीज ग्राहक महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावतात, हे कृत्य देखील शिक्षेस पात्र आहे.या प्रकरणी वीज ग्राहकाच्या विरोधात भादवि कलम ५०६ नुसार आरोपीस २ वर्ष कारावासाची तरतुद आहे.काही ठिकाणी वीज ग्राहक झुंडीने महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला करतात.अशा प्रसंगी पोलीस वीज हल्लेखोर ग्राहकावर भादवि कलम१४३,१४७, १४८, १४९ ही दंगलीची कलमे लावतात.विशेष म्हणजे हे सर्व गुन्हे अजामीनपात्र व गंभीर स्वरूपाचे आहेत. या सर्व कलमा अंतर्गत राज्यात अनेकांना शिक्षा झालेली आहे.

महावितरणने १ जुलै ते २७ जुलै या दरम्यान नागपूर परिमंडलातील १० हजार २८२ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. नागपूर शहर मंडल कार्यालया अंतर्गत सर्वाधिक ५ ग्राहकांचा हजार ८१५ वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून नागपूर ग्रामीण मंडल अंतर्गत २ हजार ७२१ तर वर्धा मंडल अंतर्गत १ हजार ७४६ ग्राहकांची वीज महावितरणने खंडित केली आहे.

थकबाकीमुळे महावितरणची आर्थिकस्थिती अत्यंत बिकट झाली आहे .त्यामुळे वीज ग्राहकांनी वीज बिलाचे पैसे नियमित भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

आकडेबाज वीज ग्राहकावर वीज चोरीचा गुन्हा दाखल 
मुबलक प्रमाणात वीज वापरून वीज देयकाची रक्कम न भरल्याने महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्यावर वीज वाहिनीवरून अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्या ग्राहकाच्या विरोधात कळमना पोलिसांनी वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महावितरणचे सहाय्यक अभीयंता अक्षय कोंबाडे हे कार्यकारी अभीयंता राहुल जीवतोडे, अतीरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत भाजीपाले यांच्या  आदेशानुसार बेलेनगर,कामना नगर परिसरात थकबाकीदार वीज ग्राहकांकडून थकबाकीची वसुली करीत होते.या परिसरात राहणारा वीज ग्राहक आतीक सिद्वीक्की या ग्राहकाकडे २लाख २३ हजार रूपयांची थकबाकी असल्याने मार्च-२०२१ मध्ये महावितरणने वीजपुरवठा खंडित केला होता. थकबाकीची रक्कम भरून वीजपुरवठा नियमित करण्या एवजी आतीकने नर्गिस नामक महिलेस हाताशी धरून वीज वाहिनीवर आकडा टाकून अनधिकृतपणे वीज वापर सुरू केला. ही बाब महावितरणचे सहाय्यक अभीयंता अक्षय कोंबाडे यांच्या निदर्शनास आली.कोंबाडे यांनी कळमना पोलिस ठाण्यात धाव घेतली.कळमना पोलिसांनी आतीक सिद्धीक्की आणि नर्गिस नामक महिलेच्या विरोधात वीज कायदा २००३ कलम १३८  नुसार गुन्हा दाखल केला आहे.

वीज देयकाची थकबाकी राहिल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला आहे. अशा वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून वीजपुरवठा अधिकृतपणे घेण्याचे आवाहन नागपूर परिमंळाचे मुख्य अभीयंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

मंगळवार, जुलै २७, २०२१

महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, धमकावणे पडेल महागात : गुन्हा सिद्ध झाला तर कारावास |

महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, धमकावणे पडेल महागात : गुन्हा सिद्ध झाला तर कारावास |



जुलै महिन्यात १० हजार २८२ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित





नागपूर दि. २७ जुलै २०२१ : वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न देता काही ठिकाणी वीज ग्राहक महावितरण ( mahavitaran) च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ले करणे, धमकावणे, शिविगाळ करणे या सारखे प्रकार वाढू लागले आहेत . महावितरणला असे कृत्य करणाऱ्या वीज ग्राहकांच्या विरोधात नाईलाजाने पोलीसात तक्रार करावी लागते.त्यामुळे अशा ग्राहकाचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला कारावास होऊ शकतो. नुकत्याच वर्धा येथील एक प्रकरणात मारहाण करणाऱ्या ग्राहकांना पोलिसद कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी वीज भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.दरम्यान जुलै महिन्यात महावितरणने १० हजार २८२ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यापैकी ७ हजार २१ ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी आणि नव्याने वीज जोडणीचे निर्धारित शुल्क भरून आपला वीज पुरवठा सुरु केला आहे.


महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे हा दंडनीय अपराध आहे.भादवि कलम ३५३ नुसार शासकीय कामात अडथळा आणणे,माराहाण केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीस २ वर्षाची कारावासाची शिक्षा होऊ शकते.तर कलाम ३३२ नुसार शासकीय कामकाजात अडथळा आणणे तसेच इजा होईल अशी मारहाण करणे या गुन्ह्यांचा समावेश असून त्याअंतर्गत ३ वर्ष व त्यापेक्षा अधिक अशा शिक्षेची तरतूद आहे. अनेकदा वीज ग्राहक महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावतात, हे कृत्य देखील शिक्षेस पात्र आहे.या प्रकरणी वीज ग्राहकाच्या विरोधात भादवि कलम ५०६ नुसार आरोपीस २ वर्ष कारावासाची तरतुद आहे.काही ठिकाणी वीज ग्राहक झुंडीने महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला करतात.अशा प्रसंगी पोलीस वीज हल्लेखोर ग्राहकावर भादवि कलम१४३,१४७, १४८, १४९ ही दंगलीची कलमे लावतात.विशेष म्हणजे हे सर्व गुन्हे अजामीनपात्र व गंभीर स्वरूपाचे आहेत. या सर्व कलमा अंतर्गत राज्यात अनेकांना शिक्षा झालेली आहे.

महावितरणने १ जुलै ते २७ जुलै या दरम्यान नागपूर परिमंडलातील १० हजार २८२ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. नागपूर शहर मंडल कार्यालया अंतर्गत सर्वाधिक ५ ग्राहकांचा हजार ८१५ वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून नागपूर ग्रामीण मंडल अंतर्गत २ हजार ७२१ तर वर्धा मंडल अंतर्गत १ हजार ७४६ ग्राहकांची वीज महावितरणने खंडित केली आहे.

थकबाकीमुळे महावितरणची आर्थिकस्थिती अत्यंत बिकट झाली आहे .त्यामुळे वीज ग्राहकांनी वीज बिलाचे पैसे नियमित भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

मंगळवार, जुलै १३, २०२१

 महावितरणने पकडली  स्टोन क्रशर मालकाची २५ लाखाची वीज चोरी

महावितरणने पकडली स्टोन क्रशर मालकाची २५ लाखाची वीज चोरी

 महावितरणने पकडली २५ लाखाची वीज चोरी

नागपूर,दिनांक १३ जुलै २०२१-

महावितरणच्या भरारी पथकाने फेटरी परिसरात थेट आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या स्टोन क्रशर मालकाची वीज चोरी पकडली असून त्याला दंडासह एकूण २५ लाख रुपयांचे देयक देण्यात आले आहे .  यावेळी  सदर स्टोन क्रशर मालक मागील एक वर्षांपासून आकडे टाकून वीज चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले.


महावितरणच्या भरारी पथकास फेटरी परिसरात स्टोन क्रशर चालकांकडून आकडे टाकून वीज चोरी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी महावितरणच्या भरारी पथकाने या ठिकाणी पळत ठेवली. मिळलेली माहिती योग्य असल्याची खात्री पटल्यावर महावितरणच्या भरारी पथकाने धाड टाकून आकडे टाकून सुरु असलेली वीज चोरी रंगेहाथ पकडली.


स्टोन क्रशर मालक कोणाच्याही निर्दशनास येणार नाही याची दक्षता घेऊन मागील एक वर्षांपासून आकडा टाकून वीज चोरी करीत होता. यामुळे महावितरणच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचे निद्रशर्नास आले . वीज चोरी पडल्यावर पंचनामा केला असता स्टोन क्रशर मालकाने मागील वर्षभराच्या कालावधीत एकूण १ लाख १२,०३५ युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले. याचे मूल्याकंन केले असता  १४ लाख ७८ हजार ९१२ रुपये आणि तडजोड शुल्क १० लाख रुपये असे एकूण २५ लाख ७८ हजार ९१२ रुपयांचे देयक महावितरणच्या भरारी पथकाने स्टोन क्रशर मालकास दिले. स्टोन क्रशर मालकाने महावितरणकडून देण्यात आलेल्या देयकाची रक्कम तात्काळ भरून पुढील कायदेशीर कारवाई टाळली. महावितरणच्या भरारी पथकाचे नागपूर परिक्षेत्राचे उपसंचालक सुमितकुमारनागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता विलास नवघरेदक्षता आणि सुरक्ष विभागाचे विश्वनाथ बिसनेएकता  पारधी यांनी वरील वीज चोरी पकडली.



शुक्रवार, जून २५, २०२१

 महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी व्यापक वसुली  मोहीम राबवावी : संचालक भालचंद्र खंडाईत यांचे निर्देश #mahavitaran

महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी व्यापक वसुली मोहीम राबवावी : संचालक भालचंद्र खंडाईत यांचे निर्देश #mahavitaran

 महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी व्यापक वसुली

मोहीम राबवावी : संचालक भालचंद्र खंडाईत यांचे निर्देश





नागपूर दि  २५ जुने  २०२१ वीज ग्राहकांकडील बिलाची थकबाकी वाढत असल्यामुळे महावितरणची आर्थिकस्थिति बिकट झाली आहे.त्यामुळे महावितरणच्या आर्थिक स्थिरतेसाठी सर्वच प्रवर्गातील ग्राहकांकडील वीज बिलाची वसुली आवश्यक असून त्यासाठी व्यापक मोहीम राबवावीअसे निर्देश महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी नागपूर परिमंडलाच्या आढावा बैठकीत दिले.

 

कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही महावितरणने ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज सेवा दिली. परंतु याकाळात घरगुती,वाणिज्यिक,औद्योगिक आणि कृषी वीज ग्राहकांकडील वीज बिलाची थकबाकी मोठ्या  प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महावितरणची आर्थिकस्थिती खालावली आहे. अशा स्थितीत ज्या वीज ग्राहकांकडे वीज बिलाची थकबाकी आहेअशा ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी व्यापक व नियोजनबद्ध मोहीम राबविण्यात यावी. तसेच वीज बिल भरण्याबाबत वारंवार सूचना देऊनही वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात यावा,असे आदेश संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वसुली मोहीम राबविताना आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावीअसेही त्यांनी सांगितले. कोरोनामुळे ग्राहकांची आर्थिकस्थिती बिकट असल्याची जाणीव महावितरणला आहे. परंतु सध्याच्या अवघड परिस्थितीत ग्राहकांनी वीज बिलाचे पैसे भरून महावितरणला सहकार्य न केल्यास महावितरणला दैनंदिन खर्च भागविणेही कठीण होईल. वीज ग्राहकांनी या वस्तुस्थितीची जाणीव करून द्यावी आणि त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करावे असे निर्देशही संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना केले.

 

या बैठकीत नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडकेनागपूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरेनागपूर शहर मंडलचे अधीक्षक अभियंता अमित परांजपेवर्धा मंडलचे अधीक्षक अभियंता डॉ. सुरेश वानखेडे तसेच नागपूर परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंते,लेखा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शुक्रवार, जून १८, २०२१

तब्बल ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या

तब्बल ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या

 कोरोनाच्या ३ महिन्यांत महावितरणकडून

तब्बल ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या


क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ९.५३ लाख नवीन वीजमीटर उपलब्ध


नागपूर दि. १८ जून २०२१: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या मोठ्या लाटेत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत महावितरणने दैनंदिन ग्राहकसेवेचे कर्तव्य चोखपणे बजावत मार्च महिन्यात ६६३१०एप्रिलमध्ये १,४४,६५१ व मेमध्ये १,०३४४८ अशा उच्च व लघुदाबाच्या तब्बल ३ लाख १४ हजार ४०९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या नेतृत्वात महावितरणने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


दरम्यान मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊनमुळे वीजमीटरचा तुटवडा निर्माण झाला होता. तो दूर करण्यासाठी महावितरणने निविदाअंतर्गत पुरवठादारांना सिंगल फेजचे १८ लाख तर थ्री फेजचे १ लाख ७० हजार नवीन वीजमीटरच्या पुरवठ्याचे कार्यादेश यापूर्वीच दिलेले आहेत. त्याप्रमाणे आतापर्यंत सिंगल व थ्रीफेजचे ९ लाख ५३ हजार नवीन वीजमीटर उपलब्ध झाले असून ते पुणेनागपूरऔरंगाबाद व कल्याण प्रादेशिक कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत.


यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव तीव्र स्वरुपात होता. त्यामुळे अत्यावश्यक वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी महावितरणचे अभियंता व कर्मचारी युद्धपातळीवर अहोरात्र कर्तव्य बजावत होते. सोबतच तातडीच्या आवश्यकतेनुसार ऑक्सीजन प्लांटनवीन कोविड रुग्णालयेविलगीकरण कक्षलसीकरण केद्रांना केवळ २४ ते ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार देण्यात आले. यासाठी ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी वैयक्तिक लक्ष घातले व वरिष्ठ पातळीवर आढावा बैठकांद्वारे या कामांना वेग दिला होता. ही कामे सुरु असतानाच कोविड-१९चे नियम पाळून दैनंदिन ग्राहकसेवा देखील सुरु ठेवण्यात आली.

कोरोनाच्या गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत महावितरणने खडतर परिस्थितीत ग्राहकसेवेचे कर्तव्य चोखपणे बजावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मार्चएप्रिल व मे या तीन महिन्यांच्या कालावधीत उच्चदाब वर्गवारीमध्ये उद्योग- १७९वाणिज्यिक- २४कृषी- ७ आणि इतर ४० अशा एकूण २५० नवीन वीजजोडण्या तर लघुदाब वर्गवारीमध्ये घरगुती- २ लाख ३३ हजार ४२७वाणिज्यिक- ३८ हजार २४औद्योगिक- ६६५०कृषी-३१ हजार ४७५सार्वजनिक पाणीपुरवठा योजना- ३८३ व इतर ४,२०० अशा एकूण ३ लाख १४ हजार १५९ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. अतिशय खडतर व संकटकाळात देखील ग्राहकसेवा देणाऱ्या महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी कौतुक केले आहे. कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरली असली तरी ग्राहकसेवा देताना कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायात हयगय करू नये. कर्मचाऱ्यांनी आरोग्याची पूर्णतः गंभीरपणे काळजी घ्यावीअसे आवाहन त्यांनी केले आहे.

महावितरणने सिंगल व थ्री फेजच्या १९ लाख ७० हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्याचे कार्यादेश गेल्या फेब्रुवारीमध्ये दिले होते. त्यामुळे नवीन वीजमीटरचा पुरवठा सुरळीत झाला आहे. आतापर्यंत सिंगल फेजचे ८ लाख ६८ हजार आणि थ्री फेजचे ८५ हजार मीटर उपलब्ध झाले असून ते प्रादेशिक कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत. यामध्ये (कंसात थ्री फेज) पुणे प्रादेशिक कार्यालय- सिंगल फेज २ लाख ६९ हजार (३०,६०३)कोकण- सिंगल फेज ३ लाख २४ हजार (२५,७८७)नागपूर- १ लाख ९३ हजार (१८,३६०) आणि औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयास सिंगल फेजचे ८२ हजार व थ्री फेजचे १०,२५० नवीन वीजमीटर पाठविण्यात आलेले आहेत.





बुधवार, जून १६, २०२१

अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीजजोडणी ; अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना संधी

अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीजजोडणी ; अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना संधी

अर्ज करताच मिळणार नवीन घरगुती वीजजोडणी

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना संधी

नागपूर,   दि१६ जून २०२१राज्य शासनाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’मधून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी अर्जदारांकडून योग्य कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज प्राप्त होताच महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीविजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १४ एप्रिलपासून ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना घरगुती नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी अर्जदारांना वीजजोडणीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सोय आहे. लाभार्थ्यांना या योजनेमधून घरगुती वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणकडे एकूण ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम देखील पाच समान मासिक हप्त्यांमध्येच वीजबिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

महावितरणकडून वीजजोडणीचा अर्ज मंजूर झाल्यानंतर विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसांमध्ये वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येईल. तसेच ज्या ठिकाणी वीजजोडणीसाठी विद्युत पायाभूत सुविधा तयार करावी लागणार आहे अशा ठिकाणी महावितरणकडून स्वनिधी किंवा जिल्हा नियोजन विकास समितीचा निधी (विशेष घटक योजना तथा आदिवासी उपाययोजना सहित) किंवा कृषी आकस्मिकता निधी व इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीमधून प्राधान्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येईल व संबंधीत लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात येईल.

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी नवीन वीजजोडणीसाठी सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, वीजजोडणीच्या विहित नमून्यातील अर्जासोबत आधार कार्ड, रहिवासी कार्ड जोडावे. वीजजोडणीसाठी  अर्ज केल्याच्या ठिकाणी वीजबिलाची पूर्वीची थकबाकी नसावी. तसेच शासनमान्य विद्युत कंत्राटदाराकडून वीजसंच मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.या योजनेविषयीची अधिक माहिती www.mahadiscom.in या महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.




गुरुवार, जून १०, २०२१

 महावितरणकडून ५.१७ कोटींची सहायता निधीला मदत

महावितरणकडून ५.१७ कोटींची सहायता निधीला मदत

 महावितरणकडून ५.१७ कोटींची सहायता निधीला मदत

ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्याहस्ते मुख्यमंत्र्यांना सुपुर्द

 


नागपूर दि. १० जून २०२१: मुख्यमंत्री सहायता निधीसाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनातील ५ कोटी १७ लाख ३४ हजार ६३१ रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री ना. श्री. उद्धव ठाकरे यांना ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते गुरुवारी (दि. १०) सुपुर्द करण्यात आले.

कोविड-19 संदर्भात राज्य शासनाच्या विविध उपाययोजनांना आर्थिक बळ म्हणून महावितरण नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यात आली आहे. सह्याद्री अतिथी गृह येथे  आयोजित छोटेखानी कार्यक्रमात महसूलमंत्री ना. श्री. बाळासाहेब थोरातसार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री. अशोक चव्हाणऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री. दिनेश वाघमारेमहावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघलमहानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय खंदारेमहावितरणचे संचालक श्री. भालचंद्र खंडाईत (प्रकल्प)कार्यकारी संचालक श्री. प्रसाद रेशमे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मुख्यमंत्री सहायता निधीला केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी कौतुक करीत समाधान व्यक्त केले. यावेळी महानिर्मितीच्या १ कोटी २ लाख ७१ हजार १४३ रुपयांचा मदतनिधी मुख्यमंत्री ना. ठाकरे यांना ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्याहस्ते सुपुर्द करण्यात आला.

कोरोना विषाणूचे संकट संपविण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना सुरु आहे. मात्र कोरोनामुळे उद्भवलेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी जमा करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे. त्यास प्रतिसाद देत महावितरणच्या नियमित ५३ हजार ५०० अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मे महिन्यातील एक दिवसाच्या वेतनापोटी ५ कोटी १७ लाख ३४ हजार ६३१ रुपयांचा मदतनिधी जमा करण्यात आला आहे.

मागील वर्षी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविडसाठी ७ कोटी ७ लाख रुपयांची देणगी मुख्यमंत्री सहायता निधीला दिली होती. त्यापूर्वी २०१९ मध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी ५ कोटी ५६ लाख तसेच २०१८ मध्ये केरळमधील महापूर संकट निवारणार्थ आर्थिक मदत म्हणून ३ कोटी ९९ लाख रुपयांची देणगी देण्यात आली होती.


मंगळवार, जून ०८, २०२१

 पावसामुळे वीज पुरवठा खंडित; साडेआठ हजार ग्राहक प्रभावित

पावसामुळे वीज पुरवठा खंडित; साडेआठ हजार ग्राहक प्रभावित

 पावसामुळे खंडित वीज पुरवठा पूर्ववत




नागपूर.दि ८ जून २०२१- शहरात दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच त्यामुळे सुमारे साडे आठ हजार ग्राहक प्रभावित झाले होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्यासाठी मोठी मोहीम सुरु केली असून बहुतांश ठिकाणचा वीज पुरवठा त्वरित सुरु करण्यात आला.तर काही ठिकाणी अद्यापही कामे सूरु आहेत.प्रभावित सर्वच भागात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी  महावितरणची यंत्रणा कामाला लागली होती.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसारवीज वाहिनीवर झाड पडल्याने शहरातील  त्रिमूर्ती नगर,टेलिकॉम नगर,गोपाळ नगर या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. या भागातील सुमारे चार हजार ग्राहकांचा वीज पुरवठा दुपारी साधारण साडे  तीनच्या सुमारास पूर्ववत सुरु करण्यात आला. तर जयप्रकाश नगर ,गायत्री नगर या भागात वीज वाहिनी वर झाड पडल्याने या भागातील वीज पुरवठा संध्याकाळी ६  वाजताच्या सुमारास सुरळीत करण्यात आला. खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी  त्रिमूर्ती नगर उप विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता रमेश नागदेवते,सहाय्यक अभियंता मकरंद फडणवीस,रत्नदीप बागडे,राहुल ललके आणि ऑपरेटर निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.

नवनिर्माण सोसायटी व एकात्मता नगरातही वीज वाहिनीवर झाडाच्या फांद्या पडल्याने  वीज पुरवठा खंडीत झाला. होता. महावितरणच्या जनमित्रांनी वीज वाहिनीवरील अडथळा दूर करून वीज पुरवठा सुरळीत केला.  रवी नगर येथील शासकीय वसाहतीत वीज वाहिनीवर झाड पडल्याने सुमारे ३५० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. सिव्हिल लाईन्स उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय कोलते हे वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी कार्यरत होते. दुपारी चार वाजताच्या सुमारास येथील वीज पुरवठा सुरळीत झाला.

 बुटीबोरी भागातही पावसामुळे वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले होते. सायगाव- डोंगरगाव रेल्वे लाईन जवळ वीज वाहिनीवर झाड पडल्याने येथील वीज पुरवठा खंडित झाला होता.  महावितरणकडून मंगळवारी  दिवस उजाडताच वीज पुरवठा तातडीने पूर्ववत करण्यात आला. अशी माहिती बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल लांडे यांनी दिली.  नगरधन येथे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ११ कि.व्हो. वीज वाहिनीचे ११ वीज खांब जमीनदोस्त झाले आहेत. यामुळे चर्चेतनगरधननिखत,नांदापुरीखंडाळानेरलाआजनीमनापूरभोजापूर या गावातील  वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता रुपेश टेंभुर्णे यांच्या नेतृत्वाखाली युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

शुक्रवार, जून ०४, २०२१

पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

पावसाची चाहूल लागून कोकिळा पावसाला साद घालत आहे. तर चातक पक्षी पावसाच्या थेंबातून तहान भागविण्यास उससलेला आहे. नांगरणी वाखारणी आटपून शेतकरी मान्सून सरिंची वाट बघत. तर पावशा पक्षी पेरते व्हा पेरते व्हा असे शेतकरी बांधवाना इशारा देत आहे.

सर्वत्र आल्हाद्दायक वातावरण निर्मित होत असताना येणाऱ्या पावसासोबत येणाऱ्या वादळ वाऱ्यामुळे, संभाव्य अपघात टाळण्यासाठी महावितरण खबरदारी घेण्याचे आवाहन सर्वाना करीत आहे. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या तसेच घरगुती वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनील देशपांडे यांनी केले आहे .

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी 24 तास सुरु असणार्‍या कॉलसेंटर्सचे 1800-102-3435 किंवा 1800-233-3435, 19120, 1912 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे. वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना केवळ एकदाच ग्राहक क्रमांक सांगावा लागणार आहे. वीजग्राहकाने कॉल सेंटरमध्ये रजिस्टर्ड केलेल्या तीनपैकी कोणत्याही वैयक्तिक दूरध्वनी किंवा मोबाईल क्रमांकावरून तक्रार केल्यास फक्त तक्रारीचा तपशील सांगावा लागणार आहे. तसेच महावितरण च्या मंडळ स्तरावरील नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधता येईल. चंद्रपूर मंडलातील ग्राहकांनी 7875761195 व गडचिरोली मंडलातील ग्राहकांनी 7875009338 यावर संपर्क साधावा.

अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करण्यात येतो. अशा स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. तसेच ईएलसीबी वापरावे. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणार्‍या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. याशिवाय विजेच्या खाबांना जनावरे बांधू नयेत, त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.



मंगळवार, मे ११, २०२१

 महावितरणच्या ४७ टक्के कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण

महावितरणच्या ४७ टक्के कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण


 

नागपूर दि. ११ मे २०२१: गेल्या वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र व अविश्रांत वीजसेवा देणाऱ्या महावितरणच्या ३५ हजार ६०० (४७ टक्के) नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी स्थानिक जिल्हा व पालिका प्रशासनासोबत समन्वय साधावा व लस उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करावेतअसे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सद्यस्थितीत प्रामुख्याने घरूनच काम सुरु असल्याने घरगुतीसह कोविड रुग्णालयेऑक्सीजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उद्योगविलगीकरण कक्षलसीकरण केंद्र आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे कर्मचारी बाधीत होण्याच्या संख्येत देखील वाढ होत आहे. महावितरणच्या ७५ हजार कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत ३५ हजार ६०० (४७ टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षांमध्ये महावितरणचे ६ हजार ५६२ कर्मचारी कोरोनाबाधीत झाले असून त्यापैकी ४ हजार १३२ कोरोनामुक्त झाले आहे. सध्या २ हजार २२१ कर्मचारी कोरोनाबाधीत असून त्यांच्यावर रुग्णालय व घरी उपचार सुरु आहेत.

ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्याकडून सुध्दा वरिष्ठ पातळीवर कोरोना व लसीकरणासंदर्भात नियमित आढावा घेण्यात येत आहे. कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांची महावितरणकडून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल हे दर आठवड्याला क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोनासंदर्भात आढावा घेत आहेत. श्री. सिंघल यांनी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सुद्धा नुकताच संवाद साधला व चर्चा केली. कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस त्वरित  उपलब्ध करून देण्यात यावीयासाठी श्री. सिंघल यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मुख्यालयाकडून कोविड संबंधीत सर्व शासकीय यंत्रणांकडे युद्धपातळीवर पाठपुरावा सुरु आहे.

कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी मुख्यालयासह सर्व परिमंडल कार्यालयांमध्ये समन्वय कक्ष कार्यान्वित झाले आहेत. या कक्षांद्वारे कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांनाकुटुंबियांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांच्याकुटुंबातील सदस्यांना महावितरणच्या विविध वसाहतींमधील निवासस्थाने तसेच प्रशिक्षण केंद्रांमध्ये विलगीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार विलगीकरणाच्या कालावधीत त्यांच्यासाठी किंवा कुटुंबियांसाठी आवश्यक ते सहकार्य केले जात आहे. तसेच कोरोना व लसीकरणाबाबत परिमंडलस्तरावर दैनंदिन आढावा घेण्याचे निर्देश क्षेत्रीय मुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यात संचारबंदी सुरु आहे. त्यामुळे अत्यावश्यक असलेली वीजसेवा देण्यासाठी महावितरणचे सर्व कर्मचारी युद्धपातळीवर कर्तव्य बजावत आहे. राज्यातील २ कोटी ८० लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयेविलगीकरण कक्षऑक्सीजन निर्मिती उद्योग व लसीकरण केद्रांना नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार देण्यासाठी प्रशासकीय सोपस्कार बाजूला ठेवून युद्धपातळीवर कामे करण्यात येत आहे. राज्यात सद्यस्थितीत अतिरिक्त १० ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांसह ३९ कोविड रुग्णालयांना २४ तासांमध्ये नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणने केली आहे.




सोमवार, मे ०३, २०२१

 कोविडमध्ये महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत

कोविडमध्ये महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत

ऑक्सीजन प्रकल्प, कोविड रुग्णालयांना

मागेल तेव्हा तात्काळ वीजजोडणी उपलब्ध

नागपूर, दि. ३ मे २०२१: राज्यातील कोरोनाच्या आपत्कालिन स्थितीत ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना व कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार तात्काळ कार्यान्वित करण्याच्या कार्यवाहीसाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात राज्यातील 10 मोठ्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना 24 ते 48 तासांमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 35 कोविड रुग्णालयांना देखील तात्काळ नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.




राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोविड बाधीतांच्या उपचारासाठी ऑक्सीजनची आवश्यकता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यासाठी ऑक्सीजन निर्मितीला मोठा वेग देण्यात आला आहे. त्यासाठी नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभाराची मागणी होत आहे. ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प तसेच कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर कामे करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे ही अत्यावश्यक सेवा देण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी युद्धपातळीवर सज्ज राहण्याची सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी दिल्या आहेत. परिणामी ज्या कामांना इतर वेळी साधारणतः 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो, ती कामे महावितरणकडून अवघ्या 24 ते 48 तासांमध्ये युद्धपातळीवर करण्यात येत आहेत. यासाठी प्रशासकीय तसेच तांत्रिक सोपस्कार बाजूला ठेवत महावितरणकडून प्राधान्याने कार्यवाही करण्यात आली आहे. 

गेल्या महिन्याभरात तब्बल 10 ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांना महावितरणने अवघ्या 48 तासांमध्ये नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभाराची सेवा दिली आहे. एकूण 14 हजार केव्हीए क्षमतेपेक्षा अधिक वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे. सोबतच राज्यात ऑक्सीजन निर्मितीला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे.  यामध्ये के चंद्रा इंजिनिअरींग वर्क्स (जेजूरी, जि. पुणे), ऑक्सीएअर नॅचरल रिसोर्सेस (रांजणगाव, जि. पुणे) या 20 मेट्रीक टन क्षमतेच्या ऑक्सीजन प्रकल्पांना केवळ 48 तासांमध्ये 523 केव्हीए वीजभाराची नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली. 

ऑक्सीजन प्रकल्पांची तातडीने क्षमता वाढ करण्यासाठी वाढीव वीजभाराची गरज निर्माण झाली होती. त्याबाबतचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर तात्काळ मंजुरी व आवश्यक तांत्रिक कामे ग्राहकांकडून पूर्ण झाल्यानंतर केवळ 24 ते 48 तासांमध्ये वाढीव वीजभार कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणकडून करण्यात आली आहे. यामध्ये जेएसडब्लू (डोलवी, जि. रायगड) कंपनीला मागणीप्रमाणे दोन टप्प्यात 109 एमव्हीए क्षमतेचा वाढीव वीजभार मंजूर करून कार्यान्वित करण्यात आला आहे. सोबतच के नायट्रोक्सीजन (सातारा), सोना अलॉयज (लोणंद, जि. सातारा), मॉडर्न गॅस इंडस्ट्रिज (अंबरनाथ, जि. ठाणे), स्वस्तिक एअर प्रॉडक्ट्स (सिन्नर, जि. नाशिक), अहमदनगर इंडस्ट्रीयल गॅसेस (अहमदनगर), लिंडे इंडिया (पनवेल, वाशी) कंपनीचा समावेश आहे. यातील अनेक कामांमध्ये ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल तसेच संबंधीत जिल्हाधिकारी यांनी एकाच वेळी थेट चर्चा करून मुंबई मुख्यालयाच्या अखत्यारीतील विषय मार्गी लावले आहेत, हे विशेष.

यासोबतच गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये नव्याने उभारलेल्या कोविड रुग्णालयांना नवीन वीजजोडणी देण्याची कामे महावितरणकडून युद्धपातळीवर सुरु आहेत. आतापर्यंत राज्यातील 35 कोविड रुग्णालयांना 24 ते 48 तासांमध्ये नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 11, अहमदनगर- 6, पुणे व नंदुरबार जिल्हा- प्रत्येकी 4, नाशिक, ठाणे व नागपूर- प्रत्येकी 2, धुळे, औरंगाबाद, पालघर जिल्हा – प्रत्येकी एक आणि मुंबई उपनगरातील मुलुंड येथे एक अशा एकूण 35 कोविड रुग्णालयांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.