जुलै महिन्यात १० हजार २८२ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित
नागपूर दि. २७ जुलै २०२१ : वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न देता काही ठिकाणी वीज ग्राहक महावितरण ( mahavitaran) च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ले करणे, धमकावणे, शिविगाळ करणे या सारखे प्रकार वाढू लागले आहेत . महावितरणला असे कृत्य करणाऱ्या वीज ग्राहकांच्या विरोधात नाईलाजाने पोलीसात तक्रार करावी लागते.त्यामुळे अशा ग्राहकाचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला कारावास होऊ शकतो. नुकत्याच वर्धा येथील एक प्रकरणात मारहाण करणाऱ्या ग्राहकांना पोलिसद कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी वीज भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.दरम्यान जुलै महिन्यात महावितरणने १० हजार २८२ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यापैकी ७ हजार २१ ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी आणि नव्याने वीज जोडणीचे निर्धारित शुल्क भरून आपला वीज पुरवठा सुरु केला आहे.
महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे हा दंडनीय अपराध आहे.भादवि कलम ३५३ नुसार शासकीय कामात अडथळा आणणे,माराहाण केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीस २ वर्षाची कारावासाची शिक्षा होऊ शकते.तर कलाम ३३२ नुसार शासकीय कामकाजात अडथळा आणणे तसेच इजा होईल अशी मारहाण करणे या गुन्ह्यांचा समावेश असून त्याअंतर्गत ३ वर्ष व त्यापेक्षा अधिक अशा शिक्षेची तरतूद आहे. अनेकदा वीज ग्राहक महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावतात, हे कृत्य देखील शिक्षेस पात्र आहे.या प्रकरणी वीज ग्राहकाच्या विरोधात भादवि कलम ५०६ नुसार आरोपीस २ वर्ष कारावासाची तरतुद आहे.काही ठिकाणी वीज ग्राहक झुंडीने महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला करतात.अशा प्रसंगी पोलीस वीज हल्लेखोर ग्राहकावर भादवि कलम१४३,१४७, १४८, १४९ ही दंगलीची कलमे लावतात.विशेष म्हणजे हे सर्व गुन्हे अजामीनपात्र व गंभीर स्वरूपाचे आहेत. या सर्व कलमा अंतर्गत राज्यात अनेकांना शिक्षा झालेली आहे.
महावितरणने १ जुलै ते २७ जुलै या दरम्यान नागपूर परिमंडलातील १० हजार २८२ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. नागपूर शहर मंडल कार्यालया अंतर्गत सर्वाधिक ५ ग्राहकांचा हजार ८१५ वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून नागपूर ग्रामीण मंडल अंतर्गत २ हजार ७२१ तर वर्धा मंडल अंतर्गत १ हजार ७४६ ग्राहकांची वीज महावितरणने खंडित केली आहे.
थकबाकीमुळे महावितरणची आर्थिकस्थिती अत्यंत बिकट झाली आहे .त्यामुळे वीज ग्राहकांनी वीज बिलाचे पैसे नियमित भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.