ओबीसी समाजाच्या हितासाठी कटिबद्ध : खा. बाळू धानोरकर
दिल्ली : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत खासदार बाळू धानोरकर यांची भेट घेतली आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुर्ववत करण्या साठी घटनेमध्ये, 243 (T) 6, 2 43 (D) 6 अमेडमेन्ट झाले पाहिजे, केंद्रात ओबीसी मंत्रालय व्हावे, संपूर्ण भारत देशात नीट कोट्या मधे ओबीसी विद्यार्थ्यांना यु.जी. व पी.जी. मधे २७% आरक्षण लागु करण्यात यावे, ओबीसी समाजाला लावण्यात आलेल्या क्रिमिलेअरच्या मर्यादेत वाढ करावी, सरकारी कर्मचा-यांना पदोन्नतीमधे आरक्षण मिळावे, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय कार्यालयातील ओबीसींच्या अनुशेष भरण्यात यावा, जातनिहाय जनगणना करून जस्टीस रोहिणी आयोग लागू करावा या मागण्यांसाठी ही भेट होती. ओबीसी समाजाच्या मागण्या रास्त असून लोकप्रतिनिधी म्हणून या प्रश्नांना वाचा फोडेल. ओबीसी समाजाच्या हितासाठी मी कटिबद्ध आहे अशी ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी शिष्टमंडळाला दिली.
तत्कालीन गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ३१ ऑगस्ट २०१८ ला ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचे घोषीत केले होते. मात्र डीएमकेचे संसद सदस्य थीरु टी.आर. बालू यांनी संसदेत याबाबत प्रश्न विचारला असता केंद्राचे राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना होणार नाही, असे उत्तर दिले. भाजपाची भूमिका दुटप्पी स्वरूपाची आहे. भाजप नेतृत्व इंपरीकल डाटा उपलब्ध असून देखील महाराष्ट्र सरकारला पुरवत नाही. त्यांच्या या ओबीसी विरोधी धोरणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या मागण्यांसाठी सभागृहात व सभागृहाबाहेर देखील आक्रमकतेने संविधानिक मार्गाने आवाज उचलणार असल्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले.
ओबिसी समाजाच्या मागण्यांसाठी दिल्लीत झालेल्या भेटीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, डॉ. अशोक जीवतोडे, सचिन राजूरकर, सुभाष घाटे, चेतन शिंदे, प्रकाश भागरथ, शेषराव येलेकर, शकील पटेल,गुणेश्वर आरिकर, संजय पन्नासे, विजय पटले, एकनाथ तारमळे,गुजरातचे गडवी, अनिल नाचपल्ले, पिनाटे सर, दिल्लीचे हंसराज जागिड, शरद वानखेडे, प्रदीप वादफळे,राजकुमार घुले, मुकेश पुंडके,विक्रम गौड, आंध्र प्रदेश चे कुमार क्रांती यादव, शाम कुर्मि आदी विविध राज्यातील ओबीसी प्रतिनिधी उपस्थित होते.