Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
शनिवार, फेब्रुवारी १९, २०२२
"शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप। शिवरायांचा ..." @nitingadkari
"युगप्रवर्तक,स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती ..." @supriya_sule on @KooApp
शनिवार, जानेवारी २२, २०२२
जम्मू काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा
| छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा |
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आजही तमाम भारतीयांचे प्रेरणास्रोत व आदर्श आहेत. देशाच्या उत्तरी भागात जम्मू काश्मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळ १४ हजार ८०० फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित केला आहे. जगात प्रथमच महाराजांचा पुतळा इतक्या उंचावर बसविण्यात आला आहे. महाराजांचा पुतळा पुण्यातील पंचवीस वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारला आहे, तर मच्छल बटालियनचे कर्नल प्रणव पवार यांनी सदर मच्छल या ठिकाणी स्थापित केला आहे.
शुक्रवार, एप्रिल ३०, २०२१
शिवरायांची मूळ चित्रे स्वराज्यात परत आणणारे शिवभक्त मालोजीराव जगदाळे
पुण्याचे मालोजीराव जगदाळे या इंजिनीअर तरुणाने फत्ते केली. महाराजांचे मूळ चित्र म्हणून राज्य शासनाने यापूर्वी याच चित्राला मान्यता दिलेली आहे. मात्र, त्याची मूळ प्रत आपल्याकडे उपलब्ध नव्हती. हे चित्र आणि महाराजांचे यापूर्वी कधीही न पाहिलेले रंगीत चित्र नेदरलँड आणि क्रोएशिया येथील संग्रहकां कडून मालोजी यांनी आणले आहे.याचबरोबर २०१५ साली त्यांनी लंडन येथे रॉयल कलेक्शन मध्ये असलेल्या शिवछत्रपतींच्या जगदंबा तलवारीचे एच.डी छाया चित्र मिळवण्यात यश आले होते.त्यांची शिवभक्ती इतकी प्रखर होती की यासाठी त्यांनी कोणतीही किंमत देण्याची तयार ठेवली होती.शिवरायांचे चित्र भारतात आणल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने मालोजीराव जगदाळे यांचे अभिनंदन केले आहे.
पहिले चित्र (कृष्णधवल) 'मार्गो एन फ्रँक वॅन लॅटम - वॅन डंगन' या डच संग्रहकाकडून, तर रंगीत चित्र क्रोएशियातील लादिमीर मेडमोर या संग्रहकाकडून मालोजी यांनी विकत घेतली आहेत. यापैकी पहिले चित्र डच संग्रहकांच्या ऑक्शन हाऊसकडून आणि दुसरे चित्र खासगी संग्रहका कडून उपलब्ध झाले आहे
''शिवरायांचे किमान एकतरी अस्सल चित्र भारतात यावे म्हणून मी प्रयत्नशील होतो, त्यासाठी खर्च आला तरी पर्वा नव्हती. युरोपातील शक्य तितक्या खाजगी संग्राहकांशी, संस्थांशी यासंदर्भात संपर्क साधला असता क्रोएशिया मधील लादिमीर मेडमोर या संग्राहकाशी मेल द्वारे बोलणे झाले आणि त्याने मला शिवरायांच्या या चित्राची माहिती दिली.'' - मालोजीराव जगदाळे
रविवार, डिसेंबर १३, २०२०
⚔ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.⚔
लंडन येथील बंकींगहॅम पॅलेसमध्ये छत्रपती महाराजांच्या खास शस्त्रालयातील एक तलवार राणी एलिझाबेथ यांच्या राजसंग्रहालयात आहे. प्रिन्स ऑफ वेल्स पदावर असताना इंग्लंडचे राजे सातवे एडवर्ड हे इ. १८७५ मध्ये भारतात आले होते. त्यावेळी त्यांना कोल्हापूरच्या श्रीमंत छत्रपती शिवाजीमहाराजांनी भेटीदाखल ज्या मौल्यवान वस्तू दिल्या , त्यांत एक अत्यंत मौल्यवान आणि सुंदर अशी तलवारही दिली. या तलवारीचे नाव कोल्हापूर दरबाराच्या दप्तरखान्यांत ‘ जगदंबा ‘ म्हणून नमूद आहे. ही तलवार रत्नजडीत मुठीची आहे. त्यावर बहात्तर माणके आणि अगणित हिरे जडविलेले आहेत. या तलवारीची जी घडण आहे , त्याला फिरंग किंवा पट्टापान किंवा सडक किंवा सॅबर असे नावे आहे. ही तलवार शिवकालीन नक्कीच आहे. पण ती भवानी नाही. पण ती छत्रपती महाराजांच्या खास शिलेखानातील आहे. म्हणून असे वाटते की , हीही जगदंबा तलवार शककतेर् शिवाजी महाराज छत्रपती (इ. १६३० ते ८० ) यांनीही स्वत: वापरली असेल की काय ? तशी शक्यता असू शकते. म्हणूनच साताऱ्यातील असलेल्या भवानी तलवारीप्रमाणे करवीर छत्रपती महाराजांच्या शिलेखान्यात असलेल्या आणि सध्या बंकींगहॅम पॅलेस , लंडनमध्ये असलेल्या या जगदंबा तलवारीबद्दल तेवढेच प्रेम आणि भक्ती वाटणे हा आमचा सर्वांचा स्वभावधर्मच आहे. ही तलवार (जगदंबा) कोल्हापूर महाराजांची आहे. ती पुन्हा छत्रपती महाराज कोल्हापूर यांच्या राजवाड्यात परत यावी अशी सर्व जनतेचीच इच्छा आहे. ही जगदंबा तलवार बंकींगहॅम पॅलेसमध्ये अतिशय शानदार दिमाखात ठेवलेली आहे. (मी स्वत: ती पाहिली आहे) तशी आस्था आणि व्यवस्था ठेवण्याची थोडीफार सवय आम्हाला लागली तरीही खूप झाले.mahitiseva शिवाजी महाराजांचे वाघनख लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहे. हे वाघनख उत्कृष्ट पोलादी आहे. हे लंडनला कोणी दिले ? त्याचा वेध आणि शोध घेतला , तर थोडा सुगावा लागतो. ग्रँड डफ हा इ. १८१८ ते २४ पर्यंत सातारा येथे इस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून नेमलेला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या आणि इस्ट इंडिया कंपनीच्या संबंधातले राजकीय व्यवहार तो पाहत असे. तो हुशार होता. तो प्रथम हित पाहत असे , ते आपल्या इंग्लंड देशाचे आणि इस्ट इंडिया कंपनीचे. त्याला इतिहासाचीही आवड होती. साताऱ्यातील वास्तव्यात मराठ्यांच्या इतिहासावर आणि त्यातल्यात्यात शिवकालावर लिहिण्याची त्याने आकांक्षा धरली आणि ती पूर्ण केली. त्याने लिहिलेला ‘ हिस्टरी ऑफ मराठाज ‘ हा गंथ म्हणजे मराठी इतिहासावर लिहिला गेलेला , कालक्रमानुसार असलेला पहिलाच गंथ आहे. म्हणून त्याला मराठी इतिहासाचा पहिला इतिहासग्रंथ लेखक हा मान दिला जातो. तो अत्यंत सावध लेखक आहे. त्याने छत्रपती प्रतापसिंह महाराजांशी मैत्रीचे संबंध ठेवून आपले काम सुविधेने साधले. त्याने बहुदा याच काळात शिवाजीमहाराजांची वाघनखे प्रतापसिंह महाराजांकडून भेट म्हणून मिळवली असावीत. ही वाघनखे त्याने इंग्लंडला जाताना बरोबर नेली. ती त्याच्या वंशजांकडेच होती. चार धारदार नखे असलेले हे पोलादी हत्यार अतिशय प्रमाणबद्ध आणि सुबक आहे. हे हत्यार डाव्या हाताच्या बोटात घालून वापरावयाचे आहे. ग्रँड डफच्या आजच्या वंशजाने (बहुदा तो ग्रँड डफचा पणतू किंवा खापरपणतू असावा) व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला हे हत्यार दान केले. अफझलखानच्या भेटीच्या वेळी महाराजांनी जे वाघनख नेले होते , तेच हे हत्यार. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वस्तूसूचीमध्ये ही माहिती अगदी त्रोटक अशी सूचित केली आहे.
याशिवाय त्यांच्या खास शिलेखान्यात (शस्त्रगारात) आणखीही काही हत्यारे असतीलच. त्यात भाला , विटे , धनुष्यबाण , खंजीर इत्यादी हत्यारे असणारच. अफझलखानाचे भेटीचे वेळी त्यांनी प्रत्यक्ष वापरलेला बिचवा होता. परंतु आता यातील काहीही उपलब्ध नाही. बंदुका , तमंचे (म्हणजे ठासणीची पिस्तुले) , कडाबिना (म्हणजे नरसावयासारखे तोंड असलेले मोठे पिस्तुल यात दारूबरोबरच अनेक गोळ्या ठासून ते उडवीत असत. त्या काळची जणू ही अनेक गोळ्या उडविणारी मशिनगनच) अशी विविध प्रकारची हत्यारे राजशास्त्रालयात नक्कीच असणार. पण महाराजांच्या राजशास्त्रालयाचा आज कोणताही भाग उपलब्ध नाही. धातूच्या हत्यारांना ‘ गोडे हत्यार ‘ असे म्हणत. अन् दारू ठासून वापरण्यास हत्यारांना ‘ उडते हत्यार ‘ असे म्हणत. एकूण शिवस्पशिर्त हत्यारांबाबत सध्या एवढेच सांगता येते.
⃣ ✍ 989o875498⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍⚍







