पुण्याचे मालोजीराव जगदाळे या इंजिनीअर तरुणाने फत्ते केली. महाराजांचे मूळ चित्र म्हणून राज्य शासनाने यापूर्वी याच चित्राला मान्यता दिलेली आहे. मात्र, त्याची मूळ प्रत आपल्याकडे उपलब्ध नव्हती. हे चित्र आणि महाराजांचे यापूर्वी कधीही न पाहिलेले रंगीत चित्र नेदरलँड आणि क्रोएशिया येथील संग्रहकां कडून मालोजी यांनी आणले आहे.याचबरोबर २०१५ साली त्यांनी लंडन येथे रॉयल कलेक्शन मध्ये असलेल्या शिवछत्रपतींच्या जगदंबा तलवारीचे एच.डी छाया चित्र मिळवण्यात यश आले होते.त्यांची शिवभक्ती इतकी प्रखर होती की यासाठी त्यांनी कोणतीही किंमत देण्याची तयार ठेवली होती.शिवरायांचे चित्र भारतात आणल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने मालोजीराव जगदाळे यांचे अभिनंदन केले आहे.
पहिले चित्र (कृष्णधवल) 'मार्गो एन फ्रँक वॅन लॅटम - वॅन डंगन' या डच संग्रहकाकडून, तर रंगीत चित्र क्रोएशियातील लादिमीर मेडमोर या संग्रहकाकडून मालोजी यांनी विकत घेतली आहेत. यापैकी पहिले चित्र डच संग्रहकांच्या ऑक्शन हाऊसकडून आणि दुसरे चित्र खासगी संग्रहका कडून उपलब्ध झाले आहे
''शिवरायांचे किमान एकतरी अस्सल चित्र भारतात यावे म्हणून मी प्रयत्नशील होतो, त्यासाठी खर्च आला तरी पर्वा नव्हती. युरोपातील शक्य तितक्या खाजगी संग्राहकांशी, संस्थांशी यासंदर्भात संपर्क साधला असता क्रोएशिया मधील लादिमीर मेडमोर या संग्राहकाशी मेल द्वारे बोलणे झाले आणि त्याने मला शिवरायांच्या या चित्राची माहिती दिली.'' - मालोजीराव जगदाळे