Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे १६, २०२३

नवयुवकांनो आवडीचे क्षेत्र निवडा - खा. अशोक नेते Ashok nete



शास. औ. प्र. संस्थेत छ. शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबिर


गडचिरोली (प्रतिनिधी)-
आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर युवकांनी निराश न होता सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. जीवनात अशक्य असं काहीही नसतं . आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य विकसित केल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास खा. अशोक नेते यांनी व्यक्त केला.


कौशल्य रोजगार ,उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे जिल्हास्तरीय आयोजन संस्थेच्या कर्मशाळेत करण्यात आलेले होते. सदर मेळाव्याचे उद्घाटन खा. अशोक नेते यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. कृष्णाजी गजबे आरमोरी , सहाय्यक जिल्हाधिकारी मयंक घोष, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा , जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोंगीरवार, संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंखे , प्रकाश गेडाम, चांगदेव फाये उपस्थित होते.


या एकदिवसीय शिबिराचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष साळुंखे यांनी केले. युवकांना करिअरची योग्य दिशा मिळावी आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील असून सदर करिअर मार्गदर्शनपर शिबिर युवकांसाठी दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले.  



 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे समुपदेशक  प्रभाकर साखरे आणि सुनील उंदिरवाडे यांनी दहावी आणि बारावीनंतर शिक्षणाच्या संधी  यासंबंधी मार्गदर्शन केले तर  व्यक्तिमत्व विकास व  मुलाखतीचे तंत्र या विषयावर कु. प्रियंका ईडपात्रे यांनी मार्गदर्शन केले.  जिल्हा ग्रामोद्योग केंद्राचे भास्कर मेश्राम यांनी रोजगार व स्वयंरोजगार  करण्यासाठी विविध महामंडळे या विषयावर मार्गदर्शन केले. कर्ज पुरवठा करणाऱ्या विविध बँका आणि वित्तीय संस्था , आयटीआय अभ्यासक्रम,  समाजकल्याण विभाग संबंधित माहिती त्या संबंधित प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले.  

     सूत्रसंचालन बंडोपंत बोढेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गटनिदेशक भास्कर मेश्राम यांनी केले.  कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी गटनिदेशक  बावनकर,  निदेशक  श्रीकांत पुरम,  सतीशचंद्र भरडकर, उज्वल  लेवडीवार, तुषार कोडापे, विवेक गडे, मांदाडे, सुरकर ,सिध्दमवार,  मेश्राम , चुनारकर आदींनी परिश्रम घेतले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.