Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे १६, २०२३

ऑफिसमध्ये आता दारू पिण्यास परवानगी; राज्य सरकारचा निर्णय




हरियाणा सरकारने नवीन उत्पादन शुल्क मंजूर केले आहे. जे 12 मेपासून लागू करण्यात आले आहे. ज्या अंतर्गत ऑफिसमध्ये आता दारू पिण्यास परवानगी दिली जाणार आहे. यामुळे हरियाणातील दारूचे शौकीन असलेले लोक आता ऑफिसमध्ये दारू पिण्याची मजा घेऊ शकतील. हरियाणा सरकारच्या धोरणानंतर आता कॉर्पोरेट कंपन्या किंवा मोठ्या ऑफिसेसना दारू विकण्यासाठी (एल-10एफ) लायसेन्स मिळणार आहे. (Alcohol in corporate offices liquor policy)

आता दारू पिण्यासाठी तुम्हाला बाहेर कुठे बारमध्ये जाण्याची गरज नाही. तर तुमच्या ऑफिसमध्येच आता बार असणार आहे. कार्यालयात दारू पिण्यासाठी सरकारनेच परमिशन दिली आहे.

एरवी ऑफिसमध्ये तुम्हाला स्मोकिंग करण्यासही परवानगी नसते. पण आता तर तुम्हाला चक्क दारूच पिता येणार आहे. कार्यालयात दारू पिण्यापासून तुम्हाला कुणीच अडवू शकणार नाही. कारण सरकारनेच तसा नियम बनवत परवानगी दिली आहे. ऑफिस कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये दारू पिता येईल. कार्यालयात बारही बनवता येतील.

 Marathi News, Latest Marathi News ...


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.