Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे १६, २०२३

Breaking Accident News | दुचाकी अपघातात एक ठार; एक जखमी



गडचिरोली (GADCHIROLI) जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील मोहटोला, शिरपुर, विहीरगांव फाट्यावर अज्ञात वाहनाने दुचाकिला धडक दिल्याने दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्याला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केले. ही घटना मंगळवारी दुपारी दीड वाजता घडली. 

पंकज भजभुजे रा. टेंबा (तह. गडचिरोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. मागील वर्षी त्याचा विवाह झाला होता. काही कामानिमित्त तो बाहेरगावी मित्रासोबत दुचाकीने गेला होता. देसाईगंज तालुक्यातील मोहटोला, शिरपुर, विहीरगांव फाट्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेतली. यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमीचे नाव केशव नागोसे (टेंभा) आहे. त्याला विहीरगाव येथील आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.