Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे २९, २०२३

चंद्रपूर काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बदलले; या आमदाराची झाली नियुक्ती | Chandrapur District Congress



चंद्रपूर Chandrapur ग्रामीण जिल्हा काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षपदी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी 2019 मध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश देवतळे यांच्या जागेवर  आमदार सुभाष धोटे यांची वर्णी लावली होती. 
सुभाष धोटे हे माजी आमदार स्वर्गीय रामचंद्रराव धोटे यांचे ज्येष्ठ पूत्र आहे. १९७१ मध्ये विद्यार्थी संघाचे अध्यक्षपद स्वीकारुन राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरूवात केली. १९७५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे एनएसयूआयचे अध्यक्ष, १९७८ मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस, १९७९ मध्ये जिल्हा परिषदेचे कृषी सभापती, जि.प.चे हंगामी अध्यक्ष, १९८६ मध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, १९९२ ते १९९३ व १९९७ ते १९९८ दोनदा राज्य सहकारी बँक ( शिखर बँक) नागपूर विभागाचे अध्यक्ष, १९९५ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आणि २००९ मध्ये राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २०१६ पासून विदर्भ मार्केटिंग फेडरेशन नागपूरचे उपाध्यक्ष म्हणून म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांची चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणातील घटनांचा वेध लक्षात घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्याकडून ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद काढून तो प्रभार चंद्रपूर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी यांच्याकडे सोपविले.


मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावरील जीवघेणा हल्ल्यानंतर त्यांच्याकडून माध्यमांसमोर बेजबाबदार विधाने आल्याने त्यांना पदावरून हटवण्याची जिल्हा बँकेच्या बहुतांश संचालकाकडून झालेली मागणी लक्षात घेता प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी त्यांना दिलेला प्रभार काढून घेत आज अखेर आमदार सुभाष धोटे या जिल्ह्याच्या राजकारणातीलच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय अनुभवी आणि ज्येष्ठ काँग्रेस नेता असलेल्या आमदार सुभाष धोटे यांच्यावर विश्वास व्यक्त करीत त्यांच्याकडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभार सोपवलेला आहे.


आमदार सुभाष धोटे चंद्रपूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असतानाच मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला न भुतो न भविष्यती असे अभूतपूर्व यश मिळाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव काँग्रेस खासदार लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर निवडून आले. त्यामुळे आ. सुभाष धोटे यांच्या या निवडीने जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पून्हा एकदा तसेच घवघवीत यश काँग्रेसला मिळेल अशी आशा पल्लवित झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जिल्हा तसेच राज्य पातळीवरील काँग्रेस नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांवरून भाजपची हात मिळवनी केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागी त्यांच्या पदाचा कार्यभार हा शहराध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडे देण्यात आला होता. यातच रामू तिवारी यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांवर नार्को चाचणीची मागणी केली होती. तेव्हा बँकेच्या संचालकांनी रामू तिवारी यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष राम तिवारी यांनी मागणी केली. या वक्तव्याचा संचालकांकडुन तिव्र निषेध करण्यांत आला. रामु तिवारी यांना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदावरून तात्काळ बडतर्फ करा, अशी मागणी करण्यात आली.



त्यानंतर राजकीय घडामोडी आणखी वाढल्या. यातच आमदार विजय वडेट्टीवार हे दिल्लीला जाऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांची तक्रार केली. त्यानंतर पुन्हा एकदा वातावरण चिघळले आणि आता चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार सुभाष धोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांची चंद्रपुर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र कांग्रेस सरचिटनीस, संघटन व प्रशासन देवानंद पवार यांनी कांग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेवरुन चंद्रपुर ग्रामीण जिल्हा कांग्रेस प्रभारी अध्यक्ष पदी आमदार सुभाष धोटे यांची नियुक्ति करण्यात आल्याचे पत्र जारी केले आहे.

Subhash Dhote
Chandrapur District Congress
#INCMaharashtra

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.