Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे २९, २०२३

ब्रम्हपुरी जिल्हा निर्मीतीच्या आंदोलनाला तालुका काॅंग्रेसचा जाहीर पाठींबा

ब्रम्हपुरी जिल्हा निर्मीतीच्या आंदोलनाला तालुका काॅंग्रेसचा जाहीर पाठींबा


तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत ठराव मंजूर

ब्रम्हपुरी : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्याला जिल्हा घोषित करण्यात यावे यासाठी ब्रम्हपुरीकर अनेक वर्षांपासून मागणी करीत आहेत. मात्र राज्य शासनाने सदर मागणीकडे कानाडोळा केल्याने शासनाला जाग आणण्याकरीता ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण कृती समीतीच्या वतीने पुनच्छ मशाल पेटवल्या गेली असुन दि. 2 जुन रोजी आयोजित आंदोलनास तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
याबाबत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकमताने जिल्हा निर्मीतीच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

ब्रम्हपूरी हे ठिकाण चंद्रपूर जिल्हा मुख्यालयापासुन सुमारे 125 किमी अंतरावर असुन नागरिकांना जिल्हा मुख्यालयी विविध शासकीय कामांसाठी, जिल्हा न्यायालय अंतर्गत वाद, शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी सतत होणाऱ्या पायपीटीमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासातुन प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागतो. तर वारंवार प्रवासामुळे जनसामान्य नागरिकांना आर्थिक फटका सुध्दा सहन करावा लागतो.  नागरिकांची सतत होणारी परवड थांबविण्यासाठी ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण कृती समितीने आपल्या वारंवार रास्त मागणीतुन शासनस्तरावर सलग पाठपुरावा करीत ब्रहपुरी जिल्हा निर्मीतीसाठी आग्रही मागणी धरली आहे. मात्र विद्यमान शिंदे-फडणवीसच्या सरकारकडुन अद्यापही कुठलीच हालचाल न झाल्याने ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण कृती समितीने रास्त मागणीकडे कानाडोळा करणाऱ्या राज्यशासनाला जाग आणण्या हेतु पुनच्छ एकदा ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण समीतीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

यासंदर्भात तालुका काँग्रेस कमिटीने काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.

सदर बैठकीला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रिताताई उराडे, माजी जि.प.सदस्य डॉ.राजेश कांबळे,  माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, पं.स.माजी सभापती नेताजी मेश्राम, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, युवक काँग्रेसचे सरचिटणीस रुपेश बानबले, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मोहसीन कुरेशी, माजी सरपंच राजेश पारधी, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष सतीश डांगे, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमीत कन्नाके, अनुसूचित जाती सेलचे मुन्ना रामटेके, लक्ष्मण जिभकाटे, सोमेश्वर उपासे, प्रशांत बगमारे, कालेश्वर रामटेके, शालीक नन्नावरे यांसह अन्य काॅंग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.