लोकसभा निवडणुकीला अवघे वर्ष शिल्लक असताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तक्रार केली. पटोले यांच्या व्यतिरिक्त काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस एच के पाटील यांचेही पदे बदलण्यात येणार आहेत. अशी चर्चा सुरू असताना
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वृत्तवाहिण्यांशी बोलताना सांगितले की, माझ्या विरोधात कितीही तक्रार दिली तरी माझं कोणी वाकडं करू शकत नाही. पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या माझ्याच प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात होतील, असे त्यांनी सांगितले.
“येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीपर्यंत मीच अध्यक्ष म्हणून काम करणार आहे, माझं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही.” -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी पटोले यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची २ आणि ३ जून रोजी दोन दिवसीय बैठक बोलावली आहे.
विदर्भातील माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार आणि शिवाजीराव मोघे यांनी पटोले यांच्या हकालपट्टीसाठी खरगे आणि पाटील यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते.
कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारानंतर पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस एच के पाटील, ज्यांनी कर्नाटकच्या निवडणुकीत विजय मिळवला आणि राज्य मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. त्यांचा प्रभार बदलण्यात येणार आहे.
MUMBAI: With less than a year left for the Lok Sabha elections, Congress is all set to revamp the state party set-up led by Nana Patole, following complaints over his style of functioning, after the Karnataka cabinet expansion on Saturday. Currently, Patole is camping in New Delhi.
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुनील केदार हे त्यांच्या समर्थकांसह दिल्लीत दाखल झाले.
सध्या महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी दिल्लीत ठाण मांडले असून, या नेत्यांनी एकानंतर एक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटवावे, अशी विनंती केली. राज्यातील माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रीय सचिव शिवाजीराव मोघे,मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासह अनेक नेत्यांनी दिल्लीत खरगे यांची भेट घेतली.
यातील अनेक नेत्यांनी सांगितले आहे की, पटोले यांचा राज्यातील कोणत्याही नेत्याशी समन्वय नाही. ते कोणालाच बरोबर घेत नाहीत. अलीकडेच प्रदेश काँग्रेस कमिटीची वीज कापण्यात आली. नाना पटोले महाराष्ट्रातील ‘नवज्योत सिंह सिद्धू’ झाले आहेत. काँग्रेस वाचवायची असेल तर पटोले यांना हटवावे लागेल, असा युक्तिवाद करण्यात आला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर नाराज असलेल्या एका शिष्टमंडळाने दिल्लीत दाखल होत पक्षश्रेष्ठींकडे आपलं गाऱ्हाणं मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार हे या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असल्याचे समजते. नाना पटोले यांनी चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवतळे यांची तडकाफडकी हकालपट्टी केल्याच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी हे पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार हाय कमांडकडे करण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली मोठे शिष्टमंडळ थेट दिल्लीत पोहोचले आहेत. पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात मध्यंतरी वाद झाला होता. पण आता माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा पटोले यांच्याविरोधात पुढे आले आहेत. त्यांची तक्रार घेऊन दिल्लीत पोहोचले असल्यामुळे खळबळ उडाली आहे. पटोले यांची तक्रार करण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्याच्या मोठे शिष्टमंडळ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वातखाली दिल्लीत पोहोचले आहे. चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवतळे यांची तडकाफडकी हकालपट्टी पटोले यांनी केली होती. पटोले यांच्या हुकमशाहीच्या धोरणाविरोधात तक्रार करण्याकरिता हे शिष्टमंडळ हायकमांडच्या भेटीसाठी पोहोचले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
Nagpur: Vadettiwar supporters in Delhi against Patole
Nagpur : It is understood that former minister Vijay Wadettiwar and former minister Sunil Kedar along with their supporters have entered Delhi against the Congress state president Nana Patole.