भाडेकरूने केली घरमालकिणीची हत्या
चंद्रपूर (Chandrapur)– चोरखिडकी निवासी 65 वर्षीय शर्मिला सकदेव या महिलेच्या हत्येचा उलगडा झाला आहे. यातील आरोपीस रामनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीस अटक केली. घरभाड्याच्या जुन्या थकीत रक्कमेवरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. #maharashtra #india #instagram #khabarbat
16 मे रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील चोरखिडकी परिसरात एका महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. याबाबत माहिती मिळताच तात्काळ रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच तपासाची चक्रे फिरवून आरोपीस अटक करण्यात आले. अनुप सदानंद कोहपरे (वय २५) (Anup kohpare) असे आरोपीचे नाव आहे. तो गोंडपिपरी तालुक्यातील वडकुली येथील रहिवासी आहे. मागील काही वर्षांपासून तो चंद्रपुरात नोकरीनिमित्त राहतो. तो एका हॉटेलमध्ये कामाला आहे.
चोरखिडकी येथील शर्मिला सकदेव (Sharmila Sakdeo) यांच्या घरी तो किरायाने राहत होता. मागील काही महिन्याचे घरभाडे थकीत होते. तेव्हा शर्मिला सकदेव यांनी त्यास हटकले. तेव्हा तो रूम सोडून निघून गेला होता. पुन्हा काही दिवसांनी परत आला. तेव्हा रूम देण्यास नकार दिल्यानंतरही जबरीने राहू लागला. गेल्या काही दिवसात पुन्हा थकीत वसुलीसाठी शर्मिला सकदेव (Sharmila Sakdeo) या अनुपकडे गेल्या. तेव्हा त्याला प्रचंड राग आला आणि तेव्हापासून त्याच्या मनात तिचा काटा काढण्याचा बेत होता. घटनेच्या रात्री म्हणजेच मंगळवारी, १६ मे रोजी दोघात भांडण झाले. धक्काबुकी झाल्याने शर्मिला खाली पडल्या. रक्तश्राव होऊन त्या जखमी झाल्या. मात्र, अनुपचा राग शांत झाला नव्हता. त्याने शर्मिला सकदेव या खाली पडली असताना तिचा गळा दाबला. यात तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच नागरिक गोळा झाले. पोलिसांना कळविण्यात आले. तोवर आरोपी अनुप हा सीसिटीव्हीचा CCTV डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर (DVR) घेऊन पळाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. माहितीच्या आधारावर आरोपीच्या मागावर गेला. रामनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या गावी वडकुली जाऊन पकडले. मृतक महिलेच्या पतीचा महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. रामनगर पोलिस स्टेशनच पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल गोपाले व त्यांची चमू घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी गोंडपिपरीतील वडकुली गावात जाऊन अनुप कोहपरेला अटक केली आहे.
सीसीटीव्ही डीव्हीआर पळविला
सकदेव यांच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे. आपण केलेल्या हत्येचे चित्रण सीसीटीव्हीत झाले असल्याचा संशय अनुपला आला. त्यामुळे तो चक्क सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर घेऊन पसार झाल्याचे पोलिस सूत्राने सांगितले. पोलिसांना अनुपवर संशय येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला त्याचे गाव गाठून अटक केली.
Chandrapur durgapur News today
Mahesh Meshram Chandrapur
Chandrapur crime News
Chandrapur News Today
News 34 Chandrapur
Mh 34 news