देवनाथ गंडाटे |
नागपूर (प्रतिनिधी) राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडियाची ओळख आहे. या संघटनेच्या डिजिटल विभागाच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे ( Deonath Gandate) यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि डिजिटल मीडिया विभाग प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड तसेच नागपूर जिल्हाध्यक्ष आनंद आंबेकर यांनी ही नियुक्ती केली आहे. त्यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच देण्यात आले. (Voice of Media - Deonath Gandate)
Mr. Devnath Gandate, well known journalist and web designer has been appointed as Nagpur District President of Digital Department of the ‘Voice of Media’ recently.
देवनाथ गंडाटे २००२ पासून पत्रकारितेत कार्यरत असून, चंद्रपूर, नागपूर, अलिबाग आणि विदर्भातील विविध जिल्ह्यात पत्रकारितेचा अनुभव आहे. दैनिक सकाळच्या विदर्भ आवृत्तीत दीर्घकाळ १४ वर्ष पत्रकारिता केली. तसेच अलिबाग येथील कृषीवल, नागपुरातील लोकशाही वार्तात वरिष्ठ उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव आहे. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यताप्राप्त डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौंसिल ऑफ इंडिया (Digital Media Publisher and News Portal Grievance Council of India) या स्वनियमन संस्थेचे सदस्य आहेत. विशेष म्हणजे त्यांचे "डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने" (Digital media Sandhi aani aavhane) हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. पत्रकारितेसोबत वेबडिझाइन, सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग, ब्लॉगिंग या विषयाचा अभ्यास आहे.
Voice of Media’ is recognized as an organization that fights for the rights of journalists at the national level. The appointment has been made by Sandeep Kale, National President of the organization and Jaipal Gaikwad, State President of Digital Media Department and Nagpur District President, Anand Ambekar.
Mr. Gandate has been working in journalism since 2002 and has experience in journalism in various districts of Chandrapur, Nagpur, Alibag and Vidarbha. He worked as a journalist for 14 years in Vidarbha edition of Dainik Sakal. He also has work experience as senior sub-editor in Krishiwal, Nagpur.
He is a member of digital media publisher and news portal Grievances Council of India, recognized by the Central Government’s Department of Information and Broadcasting. Notably, his book “Digital Media Opportunities and Challenges” was recently published. Along with journalism, he also works in web design, social media, digital marketing, blogging etc.
Mr. Gandate has expressed his intention to strengthen the organization of digital media journalists working in Nagpur district through Voice of Media and introduce them to new technologies. The media persons may contact him on mobile number 7264982365.
व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात कार्यरत डिजिटल मीडिया पत्रकारांचे संघटन मजबूत करून त्यांना नव्या तंत्रज्ञानांची ओळख करून देण्याचा मानस त्यांनी नियुक्तीनंतर व्यक्त केला आहे. नागपूर जिल्ह्यातील डिजिटल मीडियाची कार्यकारिणी लवकरच घोषित करण्यात येणार असून, संघटनेत सदस्य होण्यासाठी 7264982365 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.