Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ०१, २०२३

सरकार तुमचेच, जुनी पेंशन तत्काळ लागू करा आमदार सुधाकर अडबाले MLC Sudhakar Adbale

▪️आमदार सुधाकर अडबाले यांचे भाजपला आवाहन

▪️महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटना, नागपूर विभागतर्फे आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार


आमदार सुधाकर अडबाले
आमदार सुधाकर अडबाले


नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणूक प्रचारात "जुनी पेन्शन योजना आमचेच सरकार देऊ शकते", असे प्रलोभन मतदारांना दिले होते. आता निवडणूक झालीय. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे दोन्ही तुमचेच सरकार आहे, जुनी पेंशन योजना लागू करा, असे आवाहन आमदार सुधाकर अडबाले  MLC Sudhakar Adbale यांनी केले.

महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना, नागपूर विभागतर्फे शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी नवनियुक्त आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्कारमूर्ती म्हणून ते बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी संघटनेचे सरचिटणीस विनोदजी दुर्गपुरोहित, राज्य सहसरचिटणीस शिवाजी ढूमने, नागपूर विभागीय अध्यक्ष मान. अविनाश गभणे, नागपूर विभागीय सचिव डी. वाय. पाटील व निदेशक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

नागपूर शिक्षक मतदार संघात प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल आमदार सुधाकर अडबाले यांचा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

  MLC Sudhakar Adbaleआमदार अडबाले पुढे म्हणाले, विधान परिषद निवडणूक लागताच सर्व प्रथम महाराष्ट्र राज्य आय टी आय निदेशक संघटनेने माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. जुनी पेंशन नाकारणाऱ्या भाजपचा ह्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. आता तरी सरकारने ह्या मुद्द्यावर सकारात्मक विचार करावा. २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, ही समस्त शिक्षक, राज्य कर्मचारी व आता जनसामान्यांची सुद्धा मागणी आहे. जुनी पेंशन, शिक्षकांचे प्रश्न, समस्यांसाठी आजवर रस्त्यावरची लढाई सुरू होती. आता ह्या प्रश्नांसाठी सभागृहात लढा देऊ आणि जुनी पेंशन योजना व इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी लढा देत राहू. तसेच आय.टी.आय. निदेशकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास यावेळी अडबाले यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संचालन श्री. मेहेरे यांनी तर आभार प्रेमानंद भैसारे यांनी मानले. यावेळी निदेशक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 MLC Sudhakar Adbale

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.