Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च २१, २०२३

मार्निंग वॉकला निघालेल्या इसमावर बिबट्याचा हल्ला | Bibat Attacks

शिरीष उगे (प्रतिनिधी)
भद्रावती : भद्रावती तालुक्यातील गेल्या महिण्याभरात शहरातील आयुध निर्माणी परिसरातील दोन बिबट्यांना वनविभागाने जेरबंद केल्यानंतरही परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे.सकाळी मार्निंग वाकला निघालेल्या वसाहतितील एका पंचेचाळीस वर्षीय इसमावर बिबट्याने हल्ला (Bibat Attacks) करुन जखमी केले.

सदर घटना दिनांक 21रोज मंगळवारला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास वसाहतीत घडली.या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे.सुरेंद्रसींग चव्हाण असे या जखमी व्यक्तीचे नाव आहे. सुरेंद्रसींग चव्हाण हे आपल्या डिएससी येथील कार्टरमधून सकाळी नेहमीप्रमाणे मार्निंग वाकला निघाले असता वसाहतितील मुख्य रस्त्यावर बिबट्याने 

Leopard Attack

त्यांच्यावर हल्ला केला. मोठ्या हिंमतीने त्यांनी या बिबट्याचा प्रतिकार करीत स्वतः ची सुटका केली.त्यांना वसाहतितील निर्माणी च्या दवाखाण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला व पाठीला जखमा झाल्या. या घटनेची माहिती मिळताच भद्रावती वनपरिक्षेत्राचे अधिकारी एच. पी. शेंडे यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळ गाठून घटनेची माहिती जाणुन घेतली व पंचनामा केला. एक महिण्या अगोदर याच वसाहतीत फिरायला निघालेल्या एका महिलेवर एका बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर या परिसरातून दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात आले होते. त्यावेळी वसाहतितील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र या घटनेने परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबटची जेरबंद कारण्याची मागणी नागरिकांनी केली.
Manage Invoicing Smoothly. Get Complete and Detailed Reports on Payables and Receivables. Generate GST Reports GSTR 1, GSTR 3B, GSTR 4. Empanelled by GSTN.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.