Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च ०३, २०२३

1 मिस्डकॉल, 2 करोड! 'कोण होणार करोडपती'. लवकरच...सोनी मराठी वाहिनीवर KBC Marathi 2023 Registration

1 मिस्डकॉल, 2 करोड!

आजपासून सुरू होणार 'कोण होणार करोडपती' या खेळात सहभागी होण्यासाठीचे रजिस्ट्रेशन!

70390 77772 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या किंवा SonyLiv ॲपवर रजिस्टर करा.

'कोण होणार करोडपती'.

लवकरच...सोनी मराठी वाहिनीवर...




सोनी मराठीवरील लोकप्रिय शो म्हणून 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाला ओळखलं जातं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य लोकांनां आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते. त्यामुळे या शोची प्रचंड क्रेझ दिसून येते. यातील वेगवेगळे सेगमेंट आणि भेट देणारे पाहुणे कलाकार या कार्यक्रमाची क्रेझ आणखी वाढवायला मदत करतात.दरम्यान या शोचा नवा सीजन आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच अभिनेते सचिन खेडेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

'कोण होणार करोडपती' हा सोनी टीव्हीवरील प्रचंड लोकप्रिय शो आहे. प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहात असतात. या शोच्या मंचावर एकाहून एक भन्नाट स्पर्धक येत असतात. कधी भावुक करणारी कहाणी तर कधी प्रेरणादायी कामगिरी करणारे अनेकजण या कार्यक्रमाचा भाग राहिले आहेत. या शोच्या नव्या सीजनची प्रेक्षकांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. आता लवकरच प्रेक्षकांची ही अपेक्षा पूर्ण होणार आहे. लवकरच या कार्यक्रमाचा नवा सीजन येऊ घातला आहे.


'कोण होणार करोडपती' या खेळात सहभागी होण्यासाठी या क्रमांकावर कॉल केल्यानंतर 'थँक यू फॉर कॉलिंग' असा संदेश येऊन फोन बंद होईल. त्यांनतर काही वेळात आपल्याला एक ऑटोमेटेड कॉल येईल. त्या कॉलवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला द्यायचे आहे.
धन्यवाद!




#कोणहोणारकरोडपती । #KonHonaarCrorepati

#सोनीमराठी | #SonyMarathi

#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
कोण होणार करोडपती रजिस्ट्रेशन 2023
KBC Marathi 2023 Registration date

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.