सात पुस्तक प्रकाशनासह ६५ कवींनी केले काव्यसादरीकरण
रजत डेकाटे // नागपूर प्रतिनिधी
नागपूर: महाराष्ट्राची राजभाषा मराठीच्या सक्षमीकरणासाठी मागील ६ वर्षापासून शैक्षणिक, कला व साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूरच्या वतीने यंदा वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या औचित्य साधून दि.२७ फेब्रुवारी रोजी 'जागतिक मराठी भाषा गौरव दिन' 'भेट मराठी मनाची' हा राज्यस्तरीय कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, ऊरूवेला कॉलनी, वर्धा रोड, नागपूर येथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. राज्यभरातून आलेल्या ६५ कवींनी आपल्या दर्जेदार रचनांचे सादरीकरण करून मराठीचा जागर घडवून आणला.
'भेट मराठी मनाची' या कार्यक्रमात राज्यस्तरीय कवी संमेलन, मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे पुस्तक प्रकाशन व मराठी भाषा गौरव दिन विशेषांक लोकार्पण सोहळा संपन्न उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अध्यक्ष व उद्घाटक मा. प्रभाकर दहिकर, वन्यजीव मार्गदर्शक, सरंक्षक व समाजसेवक, प्रमुख मार्गदर्शक व अतिथी संपादक मा.सुधाकर भुरके, ज्येष्ठ कवी, नागपूर प्रमुख अतिथी मा. प्राजक्ता खांडेकर, सिनेतारका चित्रपट निर्माती, नागपूर, प्रदीप ढोबळे, व्याख्याते, कवी संमेलनाध्यक्ष: मा. डॉ. संजय पाचभाई, नागपूर, प्रमुख पाहुणे: मा. विजय शिर्के, छ. संभाजीनगर, प्रमुख पाहुणे: नागोराव कोम्पलवार, यवतमाळ प्रमुख पाहुणे: मा. द्रवेश जनबंधू, नागपूर, प्रमुख पाहुणे: मा. संतोष राऊत, गोंदिया, प्रमुख पाहुणे: संग्राम कुमठेकर, लातूर, प्रमुख पाहुणे: रंजना ब्राम्हणकर, गोंदिया व संस्थेच्या सचिव पल्लवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानंतर सर्व अतिथींचा शाल व मानचिन्ह देऊन संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिन विशेषांक २०२३' चे लोकार्पण तसेच मराठीचे शिलेदार प्रकाशनाच्या खालील कविता संग्रहाचे प्रकाशन माध्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यामध्ये १) शर्मिला देशमुख, बीड: या वळणावर, २) सोनाली सहारे, ब्रह्मपुरी : सूर्यविचार, ३) मायादेवी गायकवाड,परभणी: ज्ञानज्योत,ज्ञानस्पर्श, ४) अशोक मोहिते, सोलापूर: काव्यप्रहार, ५) सविता धमगाये, नागपूर: सुगंधी जखमा, ६) वनिता लिचडे, भंडारा: बकीळगंध..एक प्रवास, ७) प्राजक्ता खांडेकर, नागपूर: पारिजात..दरवळ काव्यफुलांची या संग्रहाचा समावेश होता. याप्रंसगी सर्व साहित्यिकांचा कौटुंबिक सत्कार संस्थेच्या सचिव पल्लवी पाटील व अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते शाल, मानचिन्ह देऊन करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेच्या वतीने मा. राम परसिया, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक, मुंबई तसेच कु.हर्षिता पाटील, बाल चित्रकार, नागपूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मराठीचे शिलेदार संस्थेच्या वतीने आजतागायत आयोजित कवी संमेलनाच्या सर्व माजी संमेलनाध्यक्षांचाही याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. पुष्पा डोनीवार, चंद्रपूर, वैशाली अंड्रस्कर, चंद्रपूर व सुधा मेश्राम यांचा समावेश होता.राज्यस्तरीय कवी संमेलनात महाराष्ट्रातील तब्बल ६५ कवी कवयित्रींनी आपल्या बहारदार काव्यगायनाने काव्यरसिकांची मने जिंकलीत. सहा तास चाललेल्या या समारंभाचे बहारदार सुत्र संचालन वैशाली अंड्रस्कर व प्रा.तारका रूखमोडे यांनी केले तर आभार हंसराज खोब्रागडे यांनी मानले. राज्यभरातून आलेल्या सर्व कवींना मराठी भाषा गौरव दिन विशेषांकाच्या पाच प्रती, सन्मानपत्र व मेडल देऊन संस्थेच्या वतीने उपस्थित माध्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.