रजत डेकाटे/प्रतिनिधी
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या २७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असून, हे अधिवेशन चार आठवडे चालणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी (दि.८) झालेल्या बैठकीत अधिवेशानाचे कामकाज निश्चित करण्यात आले.
अधिवेशन २५ मार्चपर्यंत म्हणजे चार आठवडे चालणार असून, राज्याचा सन २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प ९ मार्चला सादर करण्यात येणार आहे. आजच्या बैठकीत २७ फेब्रुवारी ते २५ मार्चदरम्यान होणाऱ्या विधान परिषद आणि विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.
अधिवेशनाची सुरुवात २७ फेब्रुवारीला राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी “वंदे मातरम्’ नंतर “जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्राचे राज्य गीत वाजविण्यात येणार आहे.

राज्य विधिमंडळ कामकाज समितीची बैठक विधान भवनात पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते बैठकीला उपस्थित होते. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली.
budget-session-of-shinde-government
budget-session-of-shinde-government