जुन्नर /आनंद कांबळे
जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत शिवजयंती महोत्सव 2023 चे आयोजन केले होते. या महोत्सवात खुल्या गटासाठी पोवाडा गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत तीर्थ क्षेत्र पारुंडे येथील व हिरा इंग्लिश मीडियम स्कूल खानापूर येथे शिक्षण घेत असलेली सई योगेश आनंदराव हीचा प्रथम क्रमांक आला आहे. या स्पर्धेत १०७ स्पर्धकांनी भाग घेतला होता. सई ने तालुका, जिल्हा,राज्य स्तरावर वक्तृत्व स्पर्धा, भजन स्पर्धा, पोवाडा गायन स्पर्धा यात अनेक बक्षिसे यापूर्वी मिळविली आहेत. या पोवाडा गायन स्पर्धेत तिच्याबरोबर पार्श्वगायक म्हणून तिचे भाऊ देखील उत्तम साथ देतात.बक्षीस वितरण प्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, सहगटविकास अधिकारी हेमंत गरिबे, गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे त्याचबरोबर स्पर्धा समन्वयक केंद्रप्रमुख निवृत्ती बांगर, दत्ता शिंदे हे उपस्थित होते.सर्व स्तरातून सई चे अभिनंदन होत आहे.
Sai Anandrao won first place in the Powada Singing Competition in Shiv Jayanti Festival