Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी २०, २०२३

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी पोहचले मनपात; दिल्या महत्वाच्या सूचना | Collector of Chandrapur reached CMC

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी पोहचले मनपात; दिल्या महत्वाच्या सूचना 



चंद्रपूर २० फेब्रुवारी - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरातील झोपडपट्टी धारकांना पट्टे वाटपाचा लाभ लवकरात लवकर होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आढावा बैठकीत दिल्या. (Collector of Chandrapur | municipality)

 चंद्रपूर महानगरपालिका (Chandrapur City Municipal Corporation)राणी हिराई सभागृहात पट्टे वाटप तसेच महानगरपालिका क्षेत्रातील विविध विषयांची आढावा बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती. या प्रसंगी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई, सहायक आयुक्त विद्या पाटील,उपअभियंता अनिल घुमडे, विजय बोरीकर व विभाग प्रमुख उपस्थीत होते.




एकुण ३९ घोषित झोपडपट्टी 

     चंद्रपूर शहर महानगरपालिकाCMC   हद्दीत एकुण ३९ घोषित झोपडपट्टी असून सदर घोषित झोपडपट्ट्यांमध्ये अद्यावत सर्वेक्षणानुसार एकुण ११८८१ झोपडपट्ट्या असून ५९४८९ एकुण झोपडपट्टी धारक (लोकसंख्या) आहेत. मनपाकडून एकुण १४ शासकीय जमिनीवरील झोपडपट्टींचे अभिन्यास मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे मान्यतेकरीता व पट्टे वाटपाचे पुढील उचित कार्यवाहीकरीता सादर करण्यात आलेले आहे. उपरोक्त १४ अभिन्यासांमध्ये एकुण ४८१५ झोपडपट्टी धारक असून त्यापैकी शासन निर्णय दिनांक १७ नोव्हेंबर, २०१८ नुसार प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र झोपडपट्टी धारकांची संख्या ३८० इतकी आहे व त्यापैकी एकुण ८१ झोपडपट्टी अतिक्रमण धारकांची कागदपत्रे पट्टे वाटपाची पुढील कार्यवाहीस मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडे सादर करण्यात आल्याची माहीती याप्रसंगी मनपातर्फे देण्यात आली.  


     जिल्हाधिकारी यांनी बैठकीत मनपाच्या विविध विभागांच्या कामकाजाची माहीती जाणून घेतली तसेच विभागप्रमुखांचा परिचय करून घेतला .आयुक्त विपीन पालीवाल यांनी अमृत योजना व योजनेची प्रगती, मल निःसारण प्रकल्प,प्रधानमंत्री आवास योजना तसेच मनपाने सुरु केलेल्या विविध नाविन्यपुर्ण उपक्रमाची माहिती याप्रसंगी दिली.



 शहरात विविध ठिकाणी योग शिबिरे 

चंद्रपूर महानगरपालिका, पतंजली योग समिती व योगनृत्य परिवाराद्वारे अनुक्रमे २२ व २४ जानेवारी पासुन चंद्रपूर शहरात विविध ठिकाणी योग शिबिरे Yoga camps घेतली जात असुन सिव्हील लाईन परीसरातील हुतात्मा स्मारक येथे नवीन योग शिबिराचे उदघाटन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते आज करण्यात आले.

    या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी निरोगी व स्वास्थ्य आरोग्य ठेवण्यासाठी सकारात्मक विचार, व्यसनमुक्ती,रोग प्रतिकारात्मक शक्ती वाढविण्यासाठी योग प्राणायाम आवश्यक असुन या शिबिरांद्वारे शहरातील नागरीकांचे स्वास्थ्य निरोगी राखण्याचे कार्य केले जात आहे. नियमित योगसाधना करणारे शारीरिक व मानसिक दृष्ट्या स्वस्थ व स्थिर असल्याचे सांगितले.  

    राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र व पतंजली योग समिती - योगनृत्य परीवाराच्या संयुक्त विद्यमाने रोगमुक्त चंद्रपूर अभियानाची सुरवात करण्यात आली आहे. जे नागरीक योग वर्ग व त्याद्वारे होणाऱ्या लाभापासुन वंचित आहे त्या सर्वांसाठी मनपाद्वारे योग शिबिरे घेतली जात आहेत. योग समिती, योगनृत्य परिवार व मनपा यांची संयुक्त योग समितीद्वारे २८ योग वर्ग व २८ योगनृत्य वर्ग असे एकुण ५६ वर्ग घेतले जात आहेत. Yoga camps

    याप्रसंगी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ, वनिता गर्गेलवार, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी भारत, डॉ. शरयु गावंडे,डॉ. नरेंद्र जनबंधु, महीला पतंजली योग समितीतर्फे स्मिता रेभनकर उपस्थीत होते.        Yoga camps



Hon'ble Shri Vinay Gowda G C (IAS)

Email : collector[dot]chandrapur[at]maharashtra[dot]gov[dot]in.

Designation : District Collector.

Phone : 07172-255300.

Fax No. : 07172-255500.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.