नागपूर । वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि WCL) च्या मनोज पुनिराम नवले या अधिकाऱ्याच्या घरावर सीबीआयने नागपूर येथील निवासस्थानी छापा टाकला.
CBI Raid Nagpur |
CBI raids WCL officerउमरेड येथील वेकोलिच्या कार्यालयात कार्यरत मनोज पुनिराम नवले यांच्या कार्यालयावरही सीबीआयने छापा टाकला. अवैध उत्पन्न आणि त्यासंबंधी काही महत्त्वपूर्ण संशयास्पद कागदपत्रे सीबीआयला आढळल्याची माहिती आहे. काही वर्षापूर्वी मनोज नवले हे बल्लारपूर-चंद्रपूरच्या वेकोलिमध्ये नियोजन अधिकारी म्हणून कार्यरत होते. नवले कोळसा खदान प्रकल्पाच्या शेत जमिनीबाबतची अनेक प्रकरणे हातळत. त्यामुळे खाणीमध्ये कोणत्या जमीन जाणार याची माहिती त्यांना मिळत होती. त्या आधारावर जमीन धारकांना हेरून त्यांच्यासोबत व्यवहार करीत आणि हजारो रुपयांची लाच घेत होते. त्याबद्दलच्या अनेक तक्रारी सीबीआयकडे आल्या होत्या. त्या आधारे सीबीआयच्या पथकाने पाळत ठेवली. दरम्यान, नवले यांनी मंजुरी दिलेल्या काही जमिनीच्या अधिग्रहण प्रकरणात कोट्यवधीची कमाई केल्याची माहिती पुढे आली होती. चंद्रपूर येथे कार्यरत असताना त्यांच्यावर यापूर्वीही सीबीआयची कारवाई झाल्याची माहिती पुढे आली आहे.