चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील व्याहाड उपवनक्षेत्रातील सामदा बिटात एका व्यक्तीचा बळी घेणाऱ्या तीन वर्षांच्या वाघाला आज बुधवारी (4 जानेवारी 2023) सकाळी बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले आहे. जेरबंद वाघाला ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. Chandrapur Tiger Saoli
सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपवनक्षेत्रातील सामदा बिटात पंधरवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला होता. या परिसरातील निलसनी पेटगाव येथील शेतकरी कैलास खेडेकर याला वाघाने ठार केले होते. त्यानंतरही वाघाचा या भागात धूमाकूळ सुरूच होता. नागरिकांच्या जिविताश धोका लक्षात घेऊन 25 कर्मचाऱ्यांची चमू या वाघावर पाळत ठेवून होती.
आज बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास वाघ सामदा बिटात भ्रमंती करताना आढळून आला. वनपरिक्षेत्राधिकारी विरूळकर यांच्या मार्गदर्शनात शार्प शूटरने त्याला मी शुद्ध केले. त्यानंतर काही वेळानी सुरक्षितरित्या वाघाला जेरबंद करण्यात आले. यावेळी राऊंड आफिसर सूर्यवंशी, मेश्राम, कोडापे, पाटील यांची उपस्थिती होती. पशुवैद्यकीय अधिकारी बशैटी यांनी जेरबंद वाघाची तपासणी केल्यानंतर त्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. जेरबंद वाघाला ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे.
Brahmahapuri forest division in Chandrapur