Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी २०, २०२३

‘त्या’ तक्रारदाराचे तीनही अर्ज निकाली | तहसीलदारांचा खुलासा Tehsildar Khulasa Ballarpur

Ø जाणीवपूर्वक प्रशासनाची बदनामी करण्याचा हेतु, तहसीलदारांचा खुलासा

चंद्रपूर, दि. 20 : शेतजमीन भोगवटदार वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये समावेश करण्याबाबत तक्रारदाराकडून करण्यात आलेले तीनही अर्ज निकाली काढून पंजीबध्द करण्यात आल्याचे तहसीलदार बल्लारपूर यांनी कळविले आहे.


याबाबत सविस्तर असे की, अर्जदार भैय्याजी बाबुराव ढोंगे रा.मानोरा, मौजा निमगाटा मक्ता येथील सर्व्हे 54/2 आराजी 0.52 हे.आर, सर्व्हे न. 56 आराजी 1.10 हे.आर, मौजा निमगाटा मक्ता येथील सर्व्हे न.102/2/ब आराजी 0.48 हे.आर मौजा मनोरा येथील सर्व्हे क्र.325 आराजी 0.20 हे.आर, सर्व्हे क्र.326 आराजी 0.21 हे.आर या शेतजमीन भोगवटदार वर्ग-2 मधून वर्ग-1 मध्ये समावेश करण्याबाबत एकूण 3 अर्ज 15 फेब्रुवारी 2022 रोजी तहसील कार्यालय, बल्लारपूर येथे सादर केले होते. सदर अर्जाच्या अनुषंगाने बल्लारपूर तहसील कार्यालयाने 18 फेब्रुवारी 2022 रोजी तीनही अर्ज निकाली काढून तीन प्रकरणे पंजीबध्द करण्यात आले. तसेच या प्रकरणात तलाठी अहवाल मागवून जाहिरनामा काढण्यात आला.

प्रकरणात अर्जदार यांनी सादर केलेले प्रकरण हे अर्धन्यायीक स्वरूपाचे असून महसूल विभागाने घोषित केलेल्या सेवांमध्ये अर्धन्यायीक प्रकरणांचा समावेश होत नाही. त्यामुळे प्रकरणात सेवा हमी कायदा लागू होत नाही. प्रकरणात तलाठी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अर्जदार यांनी त्यांचा मुलगा बाहेरगावी राहत असल्यामुळे बयान उशीराने/ काही कालावधीनंतर घेण्याबाबत मौखिकरित्या कार्यालयास विनंती केली होती. प्रकरणातील अभिलेख तपासणी अंती मौजा मनोरा येथील सर्व्हे क्र.325 आराजी 0.20 हे.आर, 326 सर्व्हे क्र. 0.21 हे.आर या जमिनीचा वर्ग 1 मध्ये समावेश आदेश निर्गमीत करण्यात आला व त्याबाबतच्या आदेशाची प्रत अर्जदार यांना देखील पुरविण्यात आली.

तसेच 15 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान व यापुर्वी देखील अर्जदार यांना मौजा निमगाटा मक्ता येथील सर्व्हे नं. 54/2 आराजी 0.52 हे.आर जागेसंबंधाने प्रकरणात सादर केलेल्या सन 1954-55 च्या अधिकार अभिलेख पंजीचे अवलोकन केले असता बंदोबस्त क्रमांक 44/2 वर कुळ कायदा कलम 6(1) अन्वये भाऊ वल्द सोमा यांचे कुळ दर्ज असल्याचे दिसून आल्याने, कुळ खारीज केल्याचा आदेशाची प्रत किंवा ज्या हस्तलिखीत सातबारा वर कुळ खारीज केल्याची नोंद आहे, असा सातबारा सादर करण्यास सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र अर्जदाराने अद्यापपर्यंत कुळ खारीज केल्याच्या आदेशाची प्रत सादर केलेली नाही. याबाबत वारंवार तोंडी सूचना देऊनही कुळ खारीज केल्याचे आदेशाची प्रत सादर केली नसल्याने त्यांना पत्राद्वारे कळविण्यात आले. अर्जदार यांचेकडून मौजा निमगाटा मक्ता येथील सर्व्हे नं. 54/2 बाबत सा-याची तीन पट रक्कम भरणा केलेली नाही. उर्वरीत सर्व्हे नंबरच्या सा-यांची रक्कम शासन जमा करून घेतली. मात्र अर्जदार यांनी चुकीची माहिती दिली. मौजा निमगाटा मक्ता येथील सर्व्हे 56 आराजी 0.10 हे.आर, सर्व्हे न.102/2/ब आराजी 0.48 हे.आर ची जागा 16 जानेवारी 2023 भोगवटदार वर्ग 1 मध्ये समावेश करण्यात आला.

तरीसुध्दा अर्जदार हे कोणतीही शहानिशा न करता खोटी तक्रार देवून तहसील प्रशासनाची बदनामी करीत असल्याचे तहसीलदारांनी कळविले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.