Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी २०, २०२३

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कधी साजरा केला जातो? Marathi Language Conservation Fortnigh

21 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम



चंद्रपूर, दि. 20 : राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचं संवर्धन व्हावं या हेतूनं दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. Marathi Language Conservation Fortnigh



मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, मुंबई आणि डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दीक्षाभूमि येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर उपस्थित राहतील. तर प्रमुख वक्ते म्हणून सरदार पटेल महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड हे ‘मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती’ या विषयावर मार्गदर्शन करतील. 
Marathi bhasha samvardhan din


या कार्यक्रमाला विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि मराठी भाषेवर प्रेम करणा-या सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर – म्हैसकर, भाषा संचालक विजया डोनीकर आणि डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजया गेडाम यांनी केले आहे.



राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं, महामंडळं, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व महामंडळं, सार्वजनिक उपक्रम, सर्व खासगी आणि व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा राज्यभर साजरा करावा, अशा सूचना मराठी भाषा विभागानं एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.



‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्तानं राजधानी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रानं संयुक्तरित्या विविध उपक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये ट्विटर मोहिम, लघुपट, मराठी चित्रपट, मराठी भाषेच्या महतीवर आधारित व्याख्यानं ग्रंथ प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा असे कार्यक्रम होणार आहेत.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.