*
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य कडून दिनांक ४ जानेवारी २०२३ ला आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते पुणे येथे हॉटेल सेंट्रल पार्क डेक्कन येथे महिला जनजागर यात्रेची सुरुवात करण्यात होती.
ही यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जनजागर यात्रा केंद्र सरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या महागाई व बेरोजगारीच्या विरोधात ही महिला जनजागर यात्रा काढण्यात येणार आहे.
ही महिला जनजागर यात्रा फरवरी च्या दुसऱ्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यात दाखल होणार आहे त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यात जनजागर महिला यात्रा उत्तमरीत्या यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हाध्यक्ष सौ शाहीन ताई हकीम यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १२.०१.२०१२३ रोजी नागेपली येथे महत्वाची आढावा बैठक संपन्न झाली.
केंद्र सरकारच्या तुघलकी धोरणामुळे सामान्य माणसाचे जीवन जगणे कठीण झाले असून महागाई चा मार सतत त्रास देत आहे.शिवाय बेरोजगार तरुण व तरुणींची संख्या लाखो च्या घरात वाढत आहे त्यामुळे केंद्र सरकार विरोधात आवाज उठविणे अत्यन्त गरजेचे आहे त्यामुळे सर्व महिलांनी मिळून महिला जनजागर यात्रा यशस्वी करावी असे प्रतिपादन शाहीन हकीम यांनी आढावा बैठकीत केले.
सदर बैठकीला अहेरी विधानसभा महिला प्रमुख ज्ञानकुमारीताई कौशी, महिला तालुकाध्यक्ष सारिकाताई गल पल्लीवार,महिला जिल्हा उपाध्यक्ष आरतीताई डुकरे,जिल्हा महिला जिल्हा संघटन सचिव स्मिताताई निमसरकार,महिला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सरलाताई मुळावार,जिल्हा महिला सरचिटणीस जयश्रीताई मडावी,महिला जिल्हा चिटणीस गीताताई दुर्गे, मंगलाताई गोबाडे, समृद्धी ताई चिम्डयालवार, जयश्रीताई चिलेवेलवार,बसंती दास, शिखा सरकार,वर अन्य जिल्हा महिला पदाधिकारी उपस्थित होते.