*ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल चंद्रपूर ऑर्बिट तर्फे स्वामी विवेकानंद यांच्या १६० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.
National Youth Day by Junior Chamber International Chandrapur Orbit
चंद्रपूर: दरवर्षी स्वामी विवेकानंदांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. स्वामी विवेकानंद हे निःसंशयपणे तरुण पिढीसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत, म्हणूनच त्यांचा १२ जानेवारी हा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे, ज्यात जवळपास ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी आहे. तरुण हे कोणत्याही देशाच्या लोकसंख्येतील सर्वात गतिमान आणि चैतन्यशील भाग आहेत. अशा परिस्थितीत तरुणांचे व्यक्तिमत्त्व घडवून त्यांना विविध राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी करून घेणे आवश्यक आहे.
दि. १२ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रीय युवा दिन व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथे ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल चंद्रपूर ऑर्बिटतर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत आनंदात साजरा करण्यात आला.
स्वामी विवेकानंदांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेसीआय इंडिया झोन 13 चे प्रोव्हिजनल झोन ट्रेनर जेसी विनोद एडलावार यांच्याकडून वेळ आणि प्राधान्य व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
जेसी विनोद एडलावार यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन कामात गोष्टींना प्राधान्य देण्याची कला शिकताना अधिकाधिक साध्य करण्याची प्रवृत्ती कशी असावी हे सांगितले. कोणती कार्ये महत्वाची आहेत किंवा गट तत्सम कार्ये ज्यांना कमी वेळ लागणार आहे ते ठरवा, ती कामे प्रथम घ्या. ज्या गोष्टींना तुमचा जास्तीत जास्त वेळ लागतो त्या गोष्टींसाठी प्राधान्य देण्यास तुम्हाला मदत होईल. हे तुम्हाला तुमची कामाची उद्दिष्टे वेळेवर पूर्ण करण्यास मदत करेल.
डॉ. विनय कवडे जी यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारले, सूत्र संचालन व प्रस्तावना प्रा. योगेश टेकाडे यांनी केले. प्राचार्या कल्याणी पटवर्धन, प्रा. पंकज नांदूरकर, प्रा. सतीश कर्णसे, प्रा. शुभांगी भेंड, प्रा.पल्लवी बोरकर, डॉ.बी. डी.चव्हाण, डॉ.किशोर चवरे प्रा. स्वप्नील बोबडे, सर्व शिक्षक, जेसीआय चंद्रपुर ऑर्बिट चे अध्यक्ष जेएफएस अमित पोरेड्डीवार, जेसीआय इंडिया झोन १३ चे संचालक आणि तत्कालीन माजी अध्यक्ष जेसी हरीश मुथा, जेसी श्रद्धा एडलावार आणि जेसीआय चे इतर सदस्य आणि १०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.