ब्रम्हपुरी -चार दिवसिय महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी आकाशात पतंगबाजी ने धमाल केली. ब्रम्हपुरी महोत्सव अनेक चांगल्या कार्यक्रमानेगाजत आहे. अशातच मकरसंक्रातीचे निमित्त साधून रशियन चियर्स गर्ल्स च्या उपस्थितीत अनेकांनी आकाशात पतंगबाजी चा आनंद लुटला. रशियन चीर्स गर्लचे मनोमोहक मराठी गीतांवर मराठमोळ्या संस्कृती पेहराव्यातील नृत्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.
ब्रम्हपुरी क्षेत्रातून अधिकाधिक प्रशासकीय अधिकारी घडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील - माजी मंत्री वडेट्टीवार
ब्रह्मपुरी नगरीला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाते. या क्षेत्राचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून या क्षेत्रात सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आरोग्य व समाजकार्याचा वारसा पुढे नेत क्षेत्रातील जनते करिता जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता सर्वतोपरी प्रयत्न चालविले. विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी केवळ नशीब व अंधश्रद्धे च्या नादी न लागता आपल्या कर्तुत्वाच्या बळावर यश संपादन करून प्रशासकीय अधिकारी व्हावे असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आयोजित स्टुडन्ट मोटिवेशन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने कार्यक्रमास मुख्य मार्गदर्शक म्हणून आपल्या ग्रामीण मायबोलीतून विद्यार्थ्यांना खदखद हसवत ज्ञानाचे धडे देणारे वर्धा येथील फिनिक्स अकॅडमीचे संचालक प्राध्यापक नितेश कराळे, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य डॉ नामदेव कोकडे, प्राचार्य देवेश कांबळे, डॉ. राकेश तलमले,डॉ. कुंदन दुपारे, डॉ. मोहन वाडेकर उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना माजी मंत्री वडेट्टीवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ज्ञानाची तिजोरी नेहमी भरत ठेवावी ज्ञान असे धन आहे की ते चोरले जाऊ शकत नाही. अंधश्रद्धा पसरू पाहणाऱ्यावर तीळ मात्र ही विश्वास न ठेवता प्रयत्नांची पराकाष्टा करून जीवनात यश संपादन करावे असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. तसेच ब्रह्मपुरी क्षेत्रातून अधिकाधिक प्रशासकीय अधिकारी घडावे याकरिता ब्रह्मपुरी येथे आठ कोटी खर्चून 22 हजार फूट क्षेत्रफळाची मोठ्या इमारतीची इ लायब्ररी लवकरच विद्यार्थ्यांच्या सेवेत सुरू होणार असून याचा विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होणार.
महोत्सवाचा तिसरा दिवस - खदखद मास्तर कराळेनी दिला यशाचा मंत्र
तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर बोलताना प्राध्यापक नितेश कराळे आपल्या खदखद हसविणाऱ्या विशेष शैली व मराठी मायबोलीतून म्हणाले की,जीवनात सलग 4 दा पदवी शिक्षणात तर 8 दा स्पर्धा परीक्षेत अशा प्रदीर्घ अपयशानंतर ही खचून न जाता सततच्या प्रयत्नातून यश मिळवले. स्पर्धे परीक्षेचे महत्त्व जाणा शिक्षण हे नोकरी मिळवण्याचे साधन नसून अन्याय दूर करण्याचे शस्त्र आहे. अपयश ही यशाची दुसरी पायरी असून प्रयत्नही यशाची चावी आहे. असे अमूल्य मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना लाभले. विद्यार्थ्यांना परिस्थितीचे सततचे रडगाण गात न बसता लढत राहावे असा मूलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी ब्रह्मपुरी मतदार संघातील सावली तालुक्यातील हिरापूर येथील राहुल जवादे यांनी वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावून जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्राध्यापक नितेश कराळे यांचे वडील बाळकृष्ण कराळे यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राहुल मैंद यांनी केले.